Skip to main content

Cold Blooded - ३

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 01/11/2018 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
रोशनीच्या मृत्यूला आठवडा उलटला होता. अद्यापही केसचा तपास फारसा पुढे सरकत नव्हता. तिचा मित्रं रुपेश हवेत विरुन गेल्याप्रमाणे अदृष्यं झाला होता. त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफच होता. रोहितच्या सूचनेप्रमाणे रेशमीने रुपेशचा फोटो त्याला पाठवला होता, परंतु त्याचाही फारसा काही उपयोग झालेला नव्हता. डॉ. भरुचांनी हैद्राबादच्या ज्या लॅबमध्ये रोशनीचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला होता त्या लॅबमधूनही काहीही कळलेलं नव्हतं. रोहितने आपल्या एकूण एक खबर्‍यांना कामाला लावलं होतं, पण परंतु चौफेर शोध घेवूनही रोशनीची पर्स किंवा तिच्या फोनचा अद्यापही पत्ता लागला नव्हता.

गावातली चावडी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/11/2018 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गाव तिथं चावडी असायचीच. चावडीवर गावातले अनेक प्रश्न सोडवले जात. वार्षिक भाडे मिळवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे काही लिलावही चावडीवर होत असत. चावडीवर पंचायत भरायची. पंचायत बोलवणे म्हणजे गावातल्या लोकांची बैठक. आजच्या भाषेत मिटींग. गावात दवंडी देऊन चावडीवर लोक बोलवले जात. गावाच्या भल्यासाठी एखादा निर्णय घ्यायचा झाला तर गावातल्या चावडीवर लोक जमत. चावडीत उलट सुलट चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाई. गावगाड्याचा सर्व प्रकारचा कारभार चावडीत होत असे. चौ – वाडी म्हणजे चारचौघेजण जमण्याचे ठिकाण ते चावडी. चव्हाटी- चावडी.

मी अतिरेकी...

लेखक कलम यांनी गुरुवार, 01/11/2018 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला: वय वर्षे ८: मी तिसरी चौथीत असेन त्यावेळी. पाचव्या दिवशी घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अनंतचतुर्दशीपर्यंतच्या कुठल्यातरी एका रविवारी आई बाबा मला आणि माझ्या भावाला सांगलीला फिरायला आणि देखावे बघायला घेऊन जात. सांगलीत पोहोचल्यावर दुपारी चार वाजता बाबा आम्हाला मसाला डोसा खायला घालत आणि त्यानंतर गणपती मंदिरात जाऊन नंतर सगळीकडचे देखावे बघायला सुरुवात होई. त्या वर्षी पण देखावे बघायला सुरु केल्यावर थोड्या वेळांनंतर मला भूक लागली म्हणून बाबांनी एक किलो पापडी मला आणि भावाला खाण्यासाठी घेऊन दिली. एक किलोचा पूडा हातात आल्यावर आम्हा दोघांची अविरत चरंती सुरु झाली.

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ६: देवगड बीच आणि किल्ला

लेखक मार्गी यांनी बुधवार, 31/10/2018 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
बघता मानस होते दंग ६: देवगड बीच आणि किल्ला देवगडला पोहचल्यामुळे खूप उत्तेजित वाटतंय! माळरानावरच्या सुनसान घरामध्ये उरलेला दिवस गेला. पाच दिवसांमध्ये ४१३ पेक्षा जास्त किलोमीटर सायकल चालवली! सायकलीला खूप धन्यवाद द्यावेसे वाटत आहेत! हे माळरानावरचं घर मुख्य रस्त्यापासून पाऊण किलोमीटर आत आहे आणि आत येणारा रस्ता अगदी कच्चा व खडकाळच आहे. येताना सुरुवातीला तर वाटलं की सायकल हातात धरूनच आणावी. पण इतक्या दिवसांच्या सायकलीच्या सोबतीमुळे विश्वास वाढला होता, म्हणून हळु हळु चालवतच घरी पोहचलो होतो. माझे नातेवाईक उद्या येतील, त्यामुळे घरातही शांतता आहे.

पिंपळ

लेखक शिवोऽहम् यांनी बुधवार, 31/10/2018 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
त्या तीरावर आहे तो पिंपळ पानांतुन ज्याच्या सळसळते ऋतुंची जाग आणि नखांनी ओरबाडतात ज्याला बिलंदर खारी ढोलीतल्या. तळहातच जणू! पिंपळपानं आहेत काही तांबुस कोवळी रेषांतुन जीवन घेऊन ओलंकंच लालसावलेलं, आभा ल्यालेलं प्रकाशाची. जडमूढ मुळांनी धरली आहे माती घट्ट पसरून आपली बोटं लांबचलांब आपोष्णी करायला पृथ्वीच्या गाभ्यातुन! फांद्यांचे बाहू फेकत अस्ताव्यस्त निळावंतीच्या वाणीने सांगतो तो घरट्यातल्या पिल्लांना आणि चोचीतल्या अळ्यांनाही, जन्मजन्मांतरीच्या कर्मकहाण्या वाऱ्यावर दहादिशा होणाऱ्या रुई-म्हाताऱ्यांच्या नी शीळ वाजवणाऱ्या पक्षांच्या. पांथस्थांच्या सावल्या टेकतात त्याच्या बुंध्याशी सुखदु:खांच्या बोला