Skip to main content

कूटकथा: पलीकडचा मी!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/11/2018 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा फोन आला होता काल. पैसे दे म्हणाला! आता काय सांगू तुम्हाला! त्याचे पैसे माझ्याकडून खर्च झाले. ज्या कारणासाठी घेतले होते त्यासाठी ते पैसे वापरले गेलेच नाहीत. दुसरीकडेच खर्च झाले. त्यामुळे त्या पैशांपासून जो फायदा होऊ शकला असता तो झालाच नाही...आणि आहे ते पैसेही गेले! काय करू आता? त्याचंही बरोबर आहे! तो म्हणजे शिरीष! एक वर्ष झालीत त्याच्याकडून पैसे घेऊन! सहा महिन्यांत मी अर्धे आणि एक वर्ष पूर्ण झाल्यावर उरलेले अर्धे असं कबूल केलं होतं! पण एक वर्ष लोटलं पण एक रुपयाही त्याला मी परत करू शकलो नव्हतो मी! मागच्या महिन्यात मात्र त्याने निर्वाणीचा इशारा दिला होता. गुंडांकरावी पिटून काढेल म्हणाला!

Cold Blooded - ६

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 06/11/2018 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या दिवशी सकाळी नऊच्या सुमाराला रोहित हेडक्वार्टर्सला पोहोचला तेव्हा कोहली त्याची वाटच पाहत होते. "सरजी, हा फिंगर प्रिंट्सचा रिपोर्ट! जवाहर कौलच्या घरात सापडलेली ती फिंगर प्रिंट ट्रेस झाली आहे." "प्रिंट ट्रेस झाली?" रोहितने अधिरतेने विचारलं, "कोणाची आहे ही प्रिंट?" "अल्ताफ हुसेन कुरेशी! हा अल्ताफ एक पैसे घेवून खून करणारा सुपारी किलर आहे सरजी! मूळचा तो उत्तर प्रदेशातल्या आझमगड जिल्ह्यातला आहे. तिथे त्याची प्रचंड दहशत आहे. आत्तापर्यंत त्याने सहा खून केले आहेत!

पहिले महायुद्ध! प्रकरण २ भाग १-बेल्जियमवरचा बलात्कार आणि श्लिफेन योजनेची अपरिहार्यता.

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 06/11/2018 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या महायुद्धाला तोंड कसे लागले ह्याचा संक्षिप्त इतिहास आपण पहिल्या प्रकरणात पहिला . ह्या युद्धात सगळ्यात आधी बळी गेले ते बेल्जियम हे चिमुकले राष्ट्र. ह्या बेल्जियम च्या तटस्थ राहण्याच्या हक्कावरूनच- त्या हक्काच्या जर्मनीने केलेल्या पायमल्लीमुळे हे युद्ध युरोपातील देशात लढले गेलेले एक छोटे मोठे युद्ध न राहता ते जागतिक महायुद्ध बनले. पहिले महायुद्ध प्रकरण दुसरे, भाग १ बेल्जियमवरचा बलात्कार आणि श्लिफेन योजनेची अपरिहार्यता. इतिहास काळात बेल्जियमचा भूभाग रोमन साम्राज्यात मोडत असे. त्यापूर्वी त्या भागाला गॉल असे संबोधले जाई.

पडसाद

लेखक शिवोऽहम् यांनी मंगळवार, 06/11/2018 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
मऊ सांजवेळी प्रभा दाटलेली, दिसे आसमंतात आता धुके तुझ्याही मनी तेच कल्लोळते का? जशी मंदिरातील घंटा घुमे! स्फुरे का इथे मंत्र बीजाक्षरांचा जरी अंतरंगी जळे वेदना नुरे शब्दमालेतला प्राण तरिही गमे मालकंसातली सांत्वना सरे शुद्ध भावातली सत्यसाक्षी कळा शब्द गीतात साकारता उदासी उगा आर्द्र चित्ती उरावी नदीच्या प्रवाही दिवे सोडता झंकारता त्या स्मृतींची नुपूरे, क्षणांची द्युती शुभ्र तेजाळते जणू ते दरीतील अंधारलेल्या अरण्यातले क्षीणसे काजवे उरी सावल्यांच्या निखारे व्रणांचे, भृगुच्या पदांचे विरागी टिळे कदंबासही का वृथा मोहवावे अनादि चिरंजीव काही निळे? अता पार्थिवाची सराईत वसने लेऊ कसा?

मला भेटलेले रुग्ण - १८

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 06/11/2018 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .

प्रजासत्ताक दिन परेड - दिल्ली - २६ जानेवारी २०१८

लेखक मोदक यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H प्रजासत्ताक दिन परेड - दिल्ली - २६ जानेवारी २०१८ डिसेंबरमधल्या मॅरेथॉन भटकंतीचे प्लॅन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कधीतरी बनवून झाल्यावर 'आता पुढे काय?' हा विचार सुरू होता. अगदी काहीच प्लॅन झाले नाही, तर बडोद्याला जाऊन उत्तरायण बघायचे, असे ठरवले. तितक्यात लक्षात आले की २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन परेड असते.. ती बघता येईल. मग परेडला लागणार्‍या तिकिटाच्या अनुषंगाने शोधाशोध सुरू झाली. दिल्लीच्या एक-दोन ठिकाणांचा पत्ता मिळाला, पण नक्की माहिती मिळत नव्हती.

गुळपापडीच्या वड्या

लेखक पद्मावति यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H गुळपापडीच्या वड्या नमस्कार मिपाकर मंडळी, बघता बघता दिवाळी आलीसुद्धा! घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळत असेल ना! गोड-तिखट फराळाच्या यादीत मी आज आणखी एका गोडाची भर टाकतेय. म्हटली तर सोपी, म्हटली तर कठीण अशी एक पाककृती आपण बघणार आहोत. सोपी यासाठी की घरात हमखास असलेल्या पदार्थांमधून ही पाककृती बनवता येते. कठीण यासाठी की ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते.

कर्ण आणि कृष्ण

लेखक शैलेन्द्र यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H कर्ण आणि कृष्ण कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे? कृष्ण व्हावे की कर्ण व्हावे? जे आपले असते तेच द्यावे की द्यावे तेही आपले रहावे? रक्तगर्भी वारसा जखमेचा सांभाळून ठेवावा उरात की, स्वतःच्या आशेचेच कवच स्वतःच्या जिवाला शिवावे? परशुरामाचे शाप आळवत खेचावी प्रत्यंच्या रागावून, की कमलकरांनी जग जिंकून पुन्हा कुणाचे रथ हाकावे? तेजाळल्या दुखऱ्या व्यथांचा कुणी सुयोधन बाजार मांडेल की त्याची वाट पाहण्यापेक्षा आपले पार्थ आपण शोधावे? अनाहूत स्वयंवराचा अपमान आयुष्याशी जुग

आंबा काजूकतली

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H आंबा काजूकतली एकदा नेटसर्फिंग करताना 'बिनापाकाची, बिना गॅसची काजूकतली' असे वाचून ती क्लिप उघडली, तर एकदम मस्त रेसिपी मिळाली. त्यात माझे काही बदल केले आणि ही आंबा काजूकतली तयार केली. साहित्य - २ वाट्या काजू, पाऊण वाटी मिल्क पावडर, ३ ते ४ टेबलस्पून दूध, अर्धी वाटी साखर, चमचाभर साजूक तूप, १ लिंबाएवढा आंब्याचा आटवलेला गोळा. आंब्याचा गोळा उपलब्ध नसेल तर नुसती काजूकतलीही करता येईल. तेव्हा साखर पाऊण वाटी लागेल, कारण आंब्याच्या गोळ्यात साखर असते.