कल्ला
मुंबईतनं आलेलो इथे. सगळे बोललेले की लहान गावात कशाला जाताय तुम्ही म्हणून. पण हे काय लहान गाव नाही, आणि मोठं शहरपण नाय वाटत. मालाडला स्टेशनजवळ घर होतं आपलं मस्त. पोरं जास्तकरुन गुजराती. मेहुल, राजेश, निलेश अशी. थोडी आपल्यासारखी. मराठी. परब, कांबळी, करमरकर वगैरे. पण इथे सगळेच मराठी. आणि बोलायला भेंडी एका वाक्यात १-२ शिव्या तर येणार म्हणजे येणारच! शिवाय इथलं घर मोठं आहे. ४ खोल्या आहेत. मस्त एरिया आहे, झाडीबिडी आहे आजुबाजुला. शाळा आहे जरा लांब पण काय फरक पडत नाही.
इथे कोणाला क्रिकेटमधलं काय माहितीच नाही. रिचर्डसनी लिलीची धुलाई केली म्हटलं तर विचारतात त्यो कोण?
मिसळपाव
रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला!