Skip to main content

एक ट्रेन: असहायतेची

लेखक कलम यांनी बुधवार, 05/12/2018 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
गावाबाहेरच्या एका गचाळ भागात एक तितकीच गचाळ वस्ती होती, अगदी रेल्वे लाईनच्या बाजूलाच. रेल्वेमधून लोकांनी फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि कागद वस्तीच्या सभोवताली पसरलेले असत. या सगळ्या मधूनच नेहमी तुंबल्यानं पूर आल्यासारखं एक गटार पण वाहायचं. त्याचशेजारी वस्तीतली काही मुलं उकीडवी बसलेली असत तर बाकीची आजूबाजूच्या उकिरड्यात खेळत बसलेली असत. ह्या घाणेरड्या खोपटांच्या गर्दीतच अगदी शेवटी बाबू आणि लक्ष्मीचं एक खोपटं होतं. बाबू आणि लक्ष्मीचं लग्न होऊन जवळपास १० वर्ष झाली होती. लग्नानंतर पहिल्या वर्षाच्या आतच सुमनचा जन्म झाला.

वाढदिवस

लेखक निओ यांनी मंगळवार, 04/12/2018 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं. इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली. आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले.

यूं ही चला चल राही….भाग - ४

लेखक मालविका यांनी मंगळवार, 04/12/2018 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
14th Novermber, 2018 सकाळी ०६.०० लाच उठलो. आवरून सायकली घेऊन खाली आलो. मस्त गरम गरम चहा प्यायला. तरी निघे निघे पर्यंत ०८.०० वाजलेच. आज चिपळूण (खडपोली)गाठायचं होत. ६२ किमी अंतर मॅप दाखवत होता. काल उतरलेला रस्ता आज चढायचा होता.अगदी सुरवातीपासूनच चढाची सुरवात झाली. आज काय झालं काय माहित पण सकाळपासून दम लागत होता. प्रत्येक चढांत पाणी पिण्यासाठी थांबत होते. खरं तर ते किती बारीक सारीक चढ होते पण मी मात्र मानसिक रित्या दामले होते कदाचित त्यामुळे मागे पडत होते. श्रीनिवास पुढे जाऊन थांबत होता.आज आम्ही कालच्या पालशेत मार्गे न जाता पिंपर,जामसुत, सुरळ मार्गे जाणार होतो. इथून १० किमी अंतर कमी होतं.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ३. इंदापूर ते पंढरपूर

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 04/12/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ३. इंदापूर ते पंढरपूर १४ नोव्हेंबरची पहाट. आज बाल दिन आहे आणि मला पहिल्या बाल गृहात जायचं आहे. आज ह्या सायकल प्रवासाचा तिसरा दिवस आहे! त्यामुळे शरीर काहीसं लयीत आलं आहे. पहाटेच्या थंडीत इंदापूर महाविद्यालयातून निघालो. सकाळी मॉर्निंग वॉक घेणा-यांना रस्ता विचारत पुढे निघालो. कालच्या हायवेच्या तुलनेत इंदापूर- अकलूज रस्ता अगदी शांत वाटला! आता खरंच वाटतंय की, मी ग्रामीण भागात आलोय. लवकरच पुणे जिल्हा संपला. अकलूजला म्हणजे आर्चीच्या गावात पहिला ब्रेक घेतला!

भोपळ्याच्या फुलांची भजी

लेखक जागु यांनी सोमवार, 03/12/2018 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्या दिवसांनी रेसिपी टाकतेय आणि मासे सोडून हिला फुलेच मिळाली का अस तुम्ही मनातल्यामनात नक्की म्हणत असाल ना. येतील येतील माशांच्याही अजून रेसिपी येतील लवकरच. पण बरेच दिवसांचा गॅप आधी पाना फुलांनी भरून काढुयात. मी भोपळ्याच्या वेली लावल्या आहेत त्यावर रोज सुंदर पिवळी फुले फुलत असतात. अजून भोपळे लागले नाहीत व जी फुले येतात त्यांना भोपळे येणार नाहीत कारण येणार्‍या भोपळ्यावरच कळी येते. त्या एक दोन आहेत सध्या. तर अशी फुले सोडून रोज नुसती फुले खुप फुलतात. एक दिवस माझी मैत्रिण साधनाने ग्रुपवर एक सुंदर चायनिज व्हिडिओ टाकला. एक मुलगी परडी घेऊन शेतात जाते ताजी ताजी भोपळ्याची फुले काढुन परडीत टाकते.

सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग

लेखक माहितगार यांनी सोमवार, 03/12/2018 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
इस्लामिक कट्टरतावादाची समस्येस विवीध देश विवीध पद्धतींनी तोंड देत आहेत. चीनमध्ये दहा च्या आसपास मुस्लिम समुह आहेत त्यापैकी उघ्युर बहुल झिंजीयांग प्रांत मुस्लिम बहुल समजला जातो. समजला जातो हा शब्द प्रयोग यासाठी कि चिनी कम्युनीस्ट क्रांती नंतर मुख्य चिनी हान वंशांचे चीनच्या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणावर स्थानांतर करण्यात आले त्यामुळे आता झिंजीयांग प्रांतात देखिल मोठ्या प्रमाणावर हान चायनीज लोकही रहातात. चिनमध्ये सुरवातीपासूनच चीन बाह्य धार्मिक प्रभावांच्या स्थानिकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.

रम्य ही स्वर्गाहून लंका

लेखक आशुतोष-म्हैसेकर यांनी सोमवार, 03/12/2018 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात एखादी गोष्ट पहिल्यांदा घडणार असेल तर त्याबद्दल आपण प्रचंड उत्साहित असतो. प्रथमच परदेश वारीचा योग आला की आपला उत्साह निराळाच. माझ्या नौकरीच्या निमित्ताने मला श्रीलंका दर्शनाची संधी मिळाली होती, त्याच उत्साहात सगळ्यांसारखा मी उत्साहात होतो. पहिल्यांदा विमानात बसणार ते पण थेट कोलंबोच्या म्हणून मी विमान उडण्याच्या आठवडा भर आधीच आकाशात जाऊन पोचलो होतो. श्रीलंका म्हणजे काय, भारताने टाकलेला पोलिओ ड्रोप म्हणून आपण भारतीय हिणवणार. ज्याची गणना आपण रावणाची लंका म्हणून करतो त्या देशाचे चित्र मनात रंगवताना अवघड जात होते.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): २. केडगांव चौफुला ते इंदापूर

लेखक मार्गी यांनी रविवार, 02/12/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: २. केडगांव चौफुला ते इंदापूर १३ नोव्हेंबरची पहाट. आज दुस-या दिवशी केडगांव चौफुल्यावरून निघायचं आहे. चांगला आराम झाल्यामुळे पहाटे फ्रेश वाटतंय. उजाडेपर्यंत तयार होऊन निघालो. इंदापूरपर्यंत आज मस्त हायवे आहे. कालच्या तुलनेत कमी वेळ लागणार. पण सायकल प्रवास अपेक्षेनुसार होत नाहीत! आजही त्याचा अनुभव येणार आहे. निघालो तेव्हा कडक थंडी आहे. ह्या प्रवासात दररोज सुरुवातीला एक- दिड तास मला कडक थंडी लागणार आहे. आणि नंतर दुपारी कडक ऊनही असेल. पहाटेच्या थंडीत हायवेचा आनंद घेत सायकल चालू केली.

कहीं दूर जब दिन ढल जाये

लेखक Anand More यांनी रविवार, 02/12/2018 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
कॅन्सरशी झुंज देत ओंकारने इहयात्रा संपवली. ओंकार माझा शाळूसोबती. घट्ट गूळपीठ ज्या मोजक्या लोकांशी जमलं त्यांच्यापैकी एक. आमची जोडी तशी गमतीदार होती. तो जगन्मित्र, मी घुम्या. तो तल्लख स्मरणशक्तीचा, मी संदर्भासाठी पुस्तक धुंडाळणारा. तो तापट आणि शीघ्रकोपी, तर आता रागवायचा हक्क मला आहे का? याच गोंधळात मी अडकलेला. पण आमच्या दोघांत एक समान दुवा म्हणजे पुस्तकप्रेम. त्याच्या घरी एन्सायक्लोपीडियाचे खंड होते. समग्र पुलं होते. दळवी होते. इतकंच काय तर गादीखाली लपवलेलं आनंदध्वजाच्या कथाही होतं. त्यामुळे किशोरावस्थेतून तारुण्यात आम्ही एकत्र प्रवेश केला. त्याला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता.

यूं-ही-चला-चल-राही भाग - ३

लेखक मालविका यांनी शनिवार, 01/12/2018 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
13 November, 2018 तिसरा दिवस उजाडला.आज कोळथरे ते वेळणेश्वर असे अंतर पार करायचे होते. गूगल मॅप ४५किमी दाखवत होता. मध्ये दाभोळ – धोपावे फेरी बोट होती. धोपावे इथे उतरून वेलदूर – गुहागर मार्गे वेळणेश्वर असा आमचा मार्ग होता. निघू निघू म्हणता म्हणता ०७. ४५ झाले. भावजींनी दोन बाटल्या भरून शहाळ्याचे पाणी दिल होत आणि एक साध्या पाण्याची बाटली होती. सकाळचा चहा पिऊन सर्वाना बाय करून निघालो. जाताना एकदम मस्त वाटत होत. पंचनदी पाठी टाकून दाभोळच्या रस्त्याला लागलो आणि मग सुरवातीला साधा सरळ असणाऱ्या रस्त्याला फक्त चढ एके चढ लागायला लागले. १-१ असा गिअरचा रेशो असूनसुद्धा पॅडल मारायला जड जायला लागलं.