Skip to main content

महाराष्ट्राचे खजुराहो: देवळाणेचे जोगेश्वर महादेव मंदिर (Devlane Tample)

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 08/12/2018 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
बागलाण !! बागांचा आणि जागोजागी असलेल्या लानींचा (पाण्याच्या चारी) हा प्रदेश म्हणजे बागलाण. नाशिक जिल्ह्यातील खानदेशची पारंपरिक मूल्ये जपून ठेवणारा हा तालुका. या बागलाण भमंतीमधे सकाळी बिष्टा, कर्‍हा असे अपरिचित गड पाहून आम्ही दुंधा गडाच्या पायथ्याच्या आश्रमामधे मुक्कामासाठी निघालो. वाटेमधे देवाळाणे गावात एक पाषाणकमल म्हणावे असे मंदिर पहाण्याचे नियोजन होते. थोडेफार या मंदिराविषयी वाचले होते, पण प्रत्यक्ष अनुभुतीने मी अक्षरशः थक्क झालो.

एकच प्याला !!!

लेखक किल्लेदार यांनी शुक्रवार, 07/12/2018 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाचण्यात आलं होतं की तुमचा आवडता मद्याचा प्याला तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडेफार सांगू शकतो... आणि मला एक जुना किस्सा आठवला. मित्राला खोकला झाला म्हणून त्याला घेऊन एकदा ब्रँडी आणायला वाईनशॉप मध्ये गेलो होतो. काउंटरवर ब्रँडी मागतांना, खुद्द गांधींनी केली नसती एवढी याची चुळबुळ चाललेली. बाटली घेऊन पैसे चुकते केल्यावर चेहऱ्यावर जमेल तितकी अजीजी आणून "हमे नशा नही करना है, दवा के लिये ले रहे है" असा डायलॉग जेव्हा त्याने दुकानदाराला मारला, तेव्हा मी मात्र स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. तस्मात...ब्रँडी हे जरा पापभिरू लोकांचं मद्य असावं.

पनिर फ्रँकी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 07/12/2018 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
मुलच काय पण मोठेही रोज तेच तेच चपाती आणि भात खाऊन कंटाळतात. आहो करणार्‍यालाही रोज रोज तेच करायचा कंटाळा येतच असतो पण नाईलाज असतो बरेचदा. कारण नविन पदार्थ करायचा म्हटल की सामानाची जुळवा जुळव, तयारी करावी लागते. मग इच्छा असून पण सामान किंवा वेळ नसल्यामुळे कधी कधी ठरवलेले मनातले बेतच रद्द करावे लागतात. असो तर काय झाल त्या दिवशी असाच मुलिंना कंटाळा आला रोजच्या जेवणाचा मग म्हणाल्या आज काहीतरी वेगळ कर. आता काय वेगळ म्हटल की पहिला मी पुस्तकं काढून बसायचे पण आता घेतला मोबाईल आणि युट्युबवर सर्च केल पोटभरीचेच म्हणजे जेवणासारखे कोणते पदार्थ करता येतील ते.

जीवनशैली ०२ : आयुर्मानावर लक्षणीय परिणाम करणारे महत्वाचे घटक

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 07/12/2018 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना : ही लेखमाला एका शीर्षकाखाली आणण्यासाठी, प्रत्येक लेखाच्या शीर्षकात, "जीवनशैली + (अनुक्रमांक)" हे शब्दगट सामील केले आहेत.

जे सत्य सुंदर सर्वथा....: (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव) ४. पंढरपूर ते बार्शी

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 06/12/2018 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ४. पंढरपूर ते बार्शी १५ नोव्हेंबर. काल सलग दोन दिवस पंक्चर झाल्यामुळे अजूनही अस्वस्थ वाटत आहे. पंक्चर तर मी नीट केलं आहे, पण परत होण्याची भिती‌ आहे. काल रात्री उशीरा झोपूनही सकाळी छान वाटतंय. मुलांचा व पालवीतल्या मंगल ताईंचा निरोप घेऊन निघालो. थंडी अगदी जाणवते आहे. पंढरपूर! गावातून शेटफळचा रस्ता विचारत पुढे निघालो. ह्या प्रवासाचा रूट प्लॅन केला होता तेव्हा दररोज ८०- ८५ किलोमीटर सायकल चालवण्याचं उद्दिष्ट ठेवलं. असा रूट बनवताना अनेकदा अगदी अंतर्भागातून जाणारे रस्ते घ्यावे लागले. आजही मला अशाच रस्त्यावरून जायचं आहे.

कॅशलेस ? एक DW Documentary

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 06/12/2018 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
कॅशलेस विषयावर मिपावर या पुर्वी बरेच गुर्‍हाळ होऊन गेले आहे. युरोमेरीकेत होत असलेल्या कॅशलेस बदलांच्या आढावा घेणारी एक चांगली ताजी म्हणजे अलिकडील डॉक्युमेंटरी युट्यूबवर पहाण्याचा योग आला. बेचाळीस मिनीटांची आहे, विषयात रस आणि वेळ असल्यास अवश्य पहावी. डॉक्युमेंटरीचे युट्यूबवरील डिस्क्रीप्शन खालील प्रमाणे आहे.
Cashless payments are on the rise. They are fast, easy and convenient. Worldwide, cashless transactions have become the norm. But Germany’s central bank and government are still clinging on to cash. Can they stop the move towards a cashless society?

वी आर नॉट मेड फॉर ईच आदर - २

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 06/12/2018 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर रात्र. टीप्पूर चांदणं पडलंय. समोर शरयू नदी वाहातेय. तीचं ते संथ वाहणारं पाणी चांदणं परावर्तीत करतं. वर पाहिलं की चांदणं आणि खाली पाहिलं तरी चांदणं. आपण त्या दोन आकाशगंगांच्या मधोमध उभे असतो. जणू अंतरीक्षात उभे असल्यासारखे या विश्वाचे स्वामी असल्यासारखे. हे दृष्य मी कित्येक वर्षांपासून पहात आलोय. अगदी लहान असल्या पासून.. पहिल्या वेळेस कधी पाहिले ते आठवतही नाही. कदाचित तात दशरथ महाराजानी मला इथे फिरायला आणलं असेल. कौशल्या आईने मला चिऊकाऊच्या गोष्टी सांगत दूधभात भरवला असेल. मनात काहुर माजलं की इथे बसायचं.

आयुबोवेन रत्नद्वीप--समारोप

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 05/12/2018 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळपासून हवा कुंद होती , ढगाळ वातावरण असल्याने पाऊस कधीही पडेल असेच वाटत होते आणि झालेही तसेच.

घार

लेखक जागु यांनी बुधवार, 05/12/2018 16:02 या दिवशी प्रकाशित केले.