Skip to main content

अडनिडी मुलं-२

लेखक जेडी यांनी रविवार, 16/12/2018 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागात काही मुलांच्या हट्टीपणाबद्दल लिहिले, काहींच्या मानसिक प्रोब्लेम बद्द्ल लिहिले... आता पोंगडअवस्थेतेतिल परिस्थिती मधुन उद्भ्वनार्या प्रश्नांविषयी... टिचर वर्गात आली... शिकवायला सुरवात... रोज पंजाबी घालणारी टिचर आज छान, पारदर्शक साडी नेसली होती. मुलं थोडी बावरुन ... आपआपल्या वह्यात डोकं खुपसुन... थोड्या वेळाने टिचर वर्गात फेर्या मारु लागली.. आता मुलांना टिचरला अगदी जवळुन पाहणे शक्य झाले... टिचर ने वहीत डोकावले.. आणि पुढे पाठ वळताच... "कैसी दिख रही रे, मस्त ऐटम, तेरे को कैसी लगती" , एकजण चार पाच लोकांना आवाज जाईल इतपत जोराने ... टिचर ने मागे वळताच.. एक मस्त स्माईल...

अडनिडी मुलं -१

लेखक जेडी यांनी रविवार, 16/12/2018 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेक मागच्या दोन वर्षापूर्वी दहावीला होती . मैत्रिणी इतकंच सख्ख्य असल्यामुळे बऱ्याच हृदयातल्या गोष्टी ती शेअर करते . अगदी मैत्रिणीसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा सल्ला मागते .तिला माहित आहे काहीही सांगितले तरी चालते, ओरडा मिळत नाही मग बरीच देवाण घेवाण होते . ती आणि तिचे मित्र मैत्रिणीविषयी अपार माया आहेच पण काय होणार ह्या अडनिड्या मुलांचे याची चिंता सतत सतावत असते . म्हणून हा थोडासा प्रयत्न . मॉम यु नो , ऑल गर्ल्स क्रेझी अबाउट ..... , ऑल ह्याव क्रश ऑन हिम ,. क्लास बंक करून मुली त्याला बघायला जातात . मी अवाक . पण न जाणवून देता ... एवढं काय आहे ग त्याच्यात? सर्व जणी एवढ्या वेड्या झाल्यात त्या ?

अतृप्त आत्मा 12

लेखक प्रमोद पानसे यांनी रविवार, 16/12/2018 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
नान्याला छळण्यात आम्हाला आता काहीही स्वारस्य उरलं नव्हतं.अपेक्षित दहशत त्याच्या मनात बसलेली असल्याने तो आता आमचं सर्व ऐकायला बांधील होता. नाना नानीची वरात पुन्हा प्रेसजवळ पोहचल्यावर नाना थंडीने आणी भितीने थरथर कापत जीन्यावरुन घरात गेला.आता त्याला आरामाची गरज होती.एकंदर सर्व घटनाक्रमाचा त्याच्या मनावर ताण निर्माण झाला होता .आता पुन्हा जर काही घडते तर तो देखील नानीला विधवा करुन आमच्याबरोबर वावरायला मोकळा झाला असता.आणी आम्हाला ते नको होते. त्याला तात्पुर्त सोडुन आम्ही त्याच्या अॉफीसमधे आता पुढे काय करायचं याचा विचार करीत त्याच्याच खुर्चीत रेलुन बसलो. एव्हाना सकाळ झाली होती.आणी आमचे अस्थि साव

टीना, मोदीजी आणि डिसऍडव्हान्टेज

लेखक mrcoolguynice यांनी रविवार, 16/12/2018 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
अटलजींनी, २ खासदार संख्या असलेल्या भाजपच्या कितीतरी आधीपासून, आणि नंतरही कितीतरी वर्षे, भाजपची धुरा सांभाळली. त्यांनी ८० च्या दशकातच, अनेक तत्कालीन युवा नेतृत्वगुण असलेले उमेदवार हेरून त्यांना ग्रुम केलं. त्यांनी प्रभावीपणे तत्कालीन भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली. ८० च्या दशकात महाजन/स्वराज/राजनाथसिंह (व इतर अनेक) यांचे कर्तृत्व अटल बिहारी वाजपेयी यांनी बरोबर हेरले. भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली. मोदीजींनी गेली काही वर्षे भाजपाची धुरा सांभाळली आहे. गेल्या काही वर्ष्यात भाजपाला केंद्रात व अनेक राज्यात सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.

एस्टी कार्यशाळा भेट-नावनोंदणी सुरु १२ जाने २०१९

लेखक आलमगिर यांनी रविवार, 16/12/2018 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
, मागच्या वेळच्मया एका लेखातून आपण आमच्या ग्रुपच्या एस्टी कार्यशाळा दौर्याविषयी माहिती घेतली होती. तेव्हा बर्याच सदस्यांनी पुढीलकार्यक्रमाची तारीख विचारली होती. तसाच दौरा यावर्षी मध्यवर्ती बस बांधणी कार्यशाळा दापोडी पुणे येथे दि १२ जानेवारी २०१९ रोजी संपन्न होत आहे. या दौर्यात आपण नवीन मानंकाप्रमाणे माईल्डस्टील मध्ये बसची बांधणी कशी केली जाते त्याची माहिती घेणार आहोत. तसेच कार्यशाळेलाही भेट देण्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सशुल्क आहे ( ५०० रुपये फी ) यात सकाळचा चहा नाष्टा जेवण आणी दुपारचा चहा ही समाविष्ट आहे.

लक्ष्मी येण्याची वेळ

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 15/12/2018 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे संध्याकाळी बाहेर ओट्यावर उभा होतो. घराच्या आजूबाजूला मी खूप झाडी लावून ठेवल्यामुळे संध्याकाळी बाहेर डास असतात. हे डास- मच्‍छर संध्याकाळी जास्त प्रमाणात दिसून येतात. दारं खिडक्या उघड्या दिसल्या की ते घरात प्रवेश करतात आणि रात्रभर आपल्याला डंख मारत राहतात. बाहेर ओट्यावर येताच डास घरात येऊ नयेत म्हणून मी बाहेरून घराचं दार घट्टपणे लावून घेतलं. आत डास जाण्यासाठी थोडीही फट राहू नये अशी काळजी घेत मी बाहेरून दाराची कडी लावली. आणि अचानक मला बालपण आठवलं. गावात लहानपणी संध्याकाळी माझ्याकडून चुकून दार लावलं गेलं तर आई म्हणायची, ‘लक्षमी येवानी येळ जयी, दार कसाले लावस रे भाऊ?

DIY - मोबाइल चार्जर एक्सटेन्शन वायर

लेखक कंजूस यांनी शनिवार, 15/12/2018 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
DIY - मोबाइल चार्जर एक्सटेन्शन वायर गाभा : मोबाइल चार्जरला जोडून आलेली वायर फारच तोकडी असते. चार्जिंगच्या मेन्स सॅाकेटजवळच फोन ठेवावा/धरावा लागतो. रेल्वेमध्ये आता खिडकीजवळ चार्जिंग पॅाइंट दिलेला असतो त्याचा उपयोग फक्त जवळच्या प्रवाशास होतो. एकाचवेळी दोनजणांना पॅाइंट वापरायचा झाल्यास अडॅप्टर लागतो.

जोत्यिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट : CM इन वेटिंग

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 15/12/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
अपेक्षेप्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये अनुक्रमे कमलनाथ आणि गेहलोत यांची निवड झाली, काँग्रेस कितीही नवीन रक्ताला वाव देणार असं म्हणत असली तरीही या वेळेस सुद्धा रागांनी सेफ गेम खेळत जेष्ठ नेत्यांना संधी दिली किंवा या नेत्यांनी राहुल गांधींना तसं करण्यास भाग पाडलं. आज पायलट(४२) आणि सिंधिया(४७) यांचं जे वय आहे, साधारणपणे त्याच वयाच्या नेत्यांना भाजपाने मुख्यमंत्री केले होते( देवेंन्द्र फडणवीस आणि अजयसिंह बिश्त उर्फ योगी आदित्यनाथ).

समुद्रसौन्दर्य - लघुलेख

लेखक समर्पक यांनी शनिवार, 15/12/2018 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
लीकडे समुद्रातील दोन अनोख्या गोष्टी अनुभवल्या त्याची ओळख देणारा हा लहानसा लेख.

काजवे आपण सर्वांनीच पहिले आहेत. सूक्ष्म प्रकाशपुंज काळोख्या रात्री चमचमताना फार सुंदर दिसतात. या प्रकाशाचे गुपित दडले आहे त्यांच्या शरीरातील जैवप्रभा निर्माण करणाऱ्या ल्युसीफरीन व तत्सम फोटोप्रोटीन रसायनात. काजव्यांव्यतिरिक्त अन्य काही जीवांमध्येही हि क्षमता असते. यातील बहुसंख्य जीव खोल समुद्रात, जिथे सूर्य प्रकाश पोहोचू शकत नाही अशा खोल पाण्यात राहतात व त्यामुळे निसर्गाने त्यातील काही जीवांना त्या परिस्थितीत जगण्यासाठी हि विशेष क्षमता प्रदान केली आहे.