द टेल-टेल हार्ट : एडगर एलन पो: (अनुवाद)
The Tell-Tale Heart by Edgar Allan Poe
हे अगदी खरंय की मी तेव्हा अतिशय निराश होतो. आताही आहे म्हणा तसा. पण केवळ तेव्हढ्यामुळे तुम्ही काय मला वेडा म्हणणार आहात का? खरं सांगायचं तर या आजारपणामुळे माझी पंचेद्रियं निकामी वा कमजोर न होता अधिकच कार्यक्षम झाली आहेत. त्यापैकी सगळ्यांत सुधारली ती श्रवणशक्ती. मी आता या पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्यादेखील सर्व गोष्टी ऐकू शकतो. इतकंच काय मला नरकातल्यासुध्दा अनेक गोष्टी ऐकू येतात. तरी मी वेडा म्हणे! आता हेच बघा ना, किती शांततेने, चित्त थार्यावर ठेवून मी ही गोष्ट तुम्हाला सांगणाराय ते!
‘ती’ कल्पना माझ्या डोक्यात प्रथम कधी व कशी आली ते सांगणं अवघड आहे.
देवगिरी किल्ला
देवगिरी किल्ला
औरंगाबादपासून जवळच असलेला देवगिरी उर्फ दौलताबादचा किल्ला म्हणजे
महाराष्ट्राच्या शिवपूर्वकालीन दैदीप्यमान इतिहासाचा चालता बोलता साक्षीदारच. हा किल्ला स्थापत्य शास्त्राची एक अजोड अशी कलाकृती म्हणूनही ओळखला जातो. शिवछत्रपतींनी सतराव्या शतकात स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सुमारे पाचशे वर्ष आधी ( बाराव्या शतकाच्या अखेर ते चौदाव्या शतकाच्या आरंभी दशकापर्यन्त) देवगिरीच्या यादवांचे स्वकीय हिंदू साम्राज्य होते. हा देवगिरी साम्राज्याचा काळ म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक सोनेरी पान म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १२
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १२
( Decorate Your Love )
नववर्ष.. प्रेमाचा निरोप..
३१ डिसेंबर.. आजचा दिवस.. सारे जग आज एकवटणार.. नववर्षाच्या स्वागतासाठी.. गतवर्षाला निरोप देऊन..
तोही आज निरोपच देत होता.. तिला.. त्याच्या एकतर्फी प्रेमाला..
सारे जग आज गतवर्षातील कटू आठवणी विसरून नव्या आठवणीसाठी सज्ज होत होते..
पण त्याच्यासाठी तिच्या गतवर्षातील आठवणी ह्या गोड होत्या.. त्या तो कधीच विसरू शकत नव्हता..
पण आजचा दिवस मात्र गोड नव्हता.. कारण आज ती ऑफिस सोडून चालली होती..
ऑफिस सुटल्यावर दुसरीकडे तरी गाठभेट होईलच ह्या आशेवर तो असतानाच त्याला कळले की ती हे शहरच सोडून जाणार होती..
किंचित अस्वस्थ वाटते आहे !
उत्स्फूर्तपणे की कोणी घडवून आणते आहे?
याच विचारांनी किंचित अस्वस्थ वाटते आहे !
उगम असो काहीही घटत्या तीव्रधार घटनांचा
वाहवत रहावे की कोरे? कूट ग्रासते आहे
समर्थन विचारांना वा तीव्र निषेध असू शकतो
समाज माध्यम त्यास्तव का वेठीस जुंपते आहे?
होवो थोडा वा जबरदस्त परिणाम प्रतिक्रियांचा
खारीचा वाटा देता, मन का सुखावते आहे?
काय महत्वाचे, कशास प्राधान्य योग्य द्यावे?
राष्ट्राचे व नागरिकांचे निधान कोणते आहे?
इतके सारे पडले का हो प्रश्न मूढ कोणा? अन्
उत्तर त्यांना का उलटे माझ्याहून मिळते आहे?
घडत्या घटनांनी किंचित अस्वस्थ वाटते आहे
किंचिततेचे तुम्हास का भय भेडसावते आहे?
संदीप लेले
घोटाळा
मी आणि माझ्या पत्नीने काहीतरी मोठा घोटाळा केला आहे असा आरोप करण्यात आला. आरोप करणाऱ्याने आम्हाला फेस टू फेस येण्याचे चॅलेंज दिले. आमच्यात झालेला संवाद खालीलप्रमाणे..
प्रश्न १. तुमचे आडनाव जोशी का आहे?
माझे उत्तर : कारण माझ्या वडिलांचे आडनाव जोशी आहे.
तो: माझा प्रश्न नीट ऐका. तुमचे आडनाव जोशी का आहे?
उत्तर: कारण माझ्या वडिलांचे आडनाव जोशी आहे. आणि मी त्यांच्यापोटी जन्म घेतला.
तो : "तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत नाही आहात. काहीतरी लपवण्याचा डाव दिसतोय. मी असा सोडणार नाही तुम्हाला."
"बरं"
आता तो माझ्या पत्नीकडे वळला.
प्रश्न: साल २०१३ चे कागदपत्रं माझ्या हातात आहेत.
"मोहिम बागलाणची" भाग तिसरा
"मोहिम बागलाणची"
दिवस तिसरा
भिलाई, चौल्हेर, प्रेमगिरी
पुणेकरांना नाशिक तसं थोडं लांबच पडतं. त्यामुळे सहज उठलं आणि नाशिककडचे किल्ले पाहून आलो असं सहसा होत नाही. आता आलोच आहोत तर जास्तीतजास्त किल्ले पाहून घेऊ म्हणून आज ट्रेकच्या आजच्या तिसर्या आणि शेवटच्या दिवशी भिलाई आणि चौल्हेर पाहिल्यानंतर घरी जाताजाता प्रेमगिरी किंवा रामजी पांगेराचा कण्हेरगडही बघून जाऊ असं ठरवलं होतं. असं जमवायचं असेल तर सकाळचा वेळ अजिबात वाया घालवून चालणार नव्हतं त्यामुळे आज थोडं लवकरच आवरलं.संक्रांतीला कल्पकतेचं वाण
उत्तरायणची सुरुवात झाली की, हळदी-कुंकू समारंभाची लगबग सुरु होते. हळदी कुंकूवाची परंपरा जुनी असली तर त्याचं महत्व आजही तितकचं टिकून आहे. हळदी कुंकू लावून तिळगूळच्या लाडवासोबत वाण देण्याची प्रथा अजूनही कायम आहे. हळदी-कुंकु कार्यक्रमाचे धार्मिक महत्व किती ते माहित नाही. पण असे कार्यक्रम सर्वांनाच आवडतात. सर्व महिला मस्तपैकी नटुन-सजुन येतात, गोड गोड गप्पा मारतात, नविन ओळखी होतात, एकाच कॉम्प्लेक्समध्ये असुनदेखील कधी न बघितलेल्या महिला एकमेकींना भेटतात.
यंदा वाणाला दुसरं काही देण्याच्या ऐवजी फुलांची किंवा भाजीपाल्याची रोपे वाटली तर.!
मिसळपाव