श्रावण...
सुप्रसन्न वारा आणि धरणीचा सुवास
प्रफुल्लित मन अन सुखाचा सहवास
हिरवागार सडा शिंपडला भुईवरी
नक्षत्राचे चांदणे अंथरले नभावरी
उडणारे तुषार अन मंजुळ कोकिळ स्वर
पक्षाचा आराव अन मन स्वार ढगावर
हळवा श्रावण, महिन्याचा राजा श्रावण
अनंत निसर्गाची रूपे दाखवतो श्रावण
कणा-कणातील संगीताने मेघ व्यापले
प्रकृतीच्या काव्याने मन तृप्त झाले
निसर्गाच्या किमयेने मन गंधाळले
सर्वांना वसुंधरेच्या रूपाने वेडावले
काव्यरस
"Catch me if you can”
"कंबक्त, कभी बेसूरा गा नही सक्ती."
लता मंगेशकर यांना उद्देशून (त्या वयाने लहान असताना) एका विख्यात संगीतकाराने वैतागून (आदरपूर्वक) टिप्पणी ऊद्गारली होती
असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं.
“तुझं वंय कोवळं आहे,त्यामुळे तुझ्या गळ्याची क्षमता उत्तम आहे,सुरात आणि तारसूरात गायला तुला सहज जमत असणार शिवाय ह्या वयात तुला तल्लख स्मरण शक्ती आहे.
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
अॅक्सिडेंटल प्रॉयमिनिस्टर*****
जनता दल राजवटीमध्ये जसे कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आणि देवेगौडा यांच्या भाळी पंतप्रधान पदाचा मानटिळा लागला.
त्यात मुलायमसिंग, लालूप्रसाद यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि हेगडे,शरद यादव यांचे धोरणी दूरदृष्टी मनसुबे याचा परिपाक म्हणून देवेगौडा यांच्या नावाला फारसा विरोध झाला नाही.
अगदी तसेच कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले (पंतप्रधान होतीलच म्हणून) अश्या फारसं उपद्रवमूल्य नसलेल्या व्यक्तीला (फक्त कॉंग्रेस ला एकनिष्ठ राहिले आहेत हा बोनस गुण) मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले.
आता हे माहीत असलेलेच तपशील पुन्हा
भाई...
आज “भाई एक व्यक्ती कि वल्ली” हा चित्रपट पाहायला जायचा योग्य आला. खरे तर जरा साशंक मनानेच गेलो कारण शिव धनुष्य पेलणे जसे अवघड तसे आभाळाएवढी उंची असलेली व्यक्ती शब्दामध्ये अथवा कलाकृतीमध्ये बंदिस्त करणे अवघडच. चित्रपट पाहायला सुरवात केल्यानंतर मात्र उगाच आलो असे वाटायला लागली कारण काही आठवणी नकोश्या च वाटतात. आज एवढी वर्षे झाली पु. ल. आपल्यात नसण्याला पण अगदी काल-परवाची गोष्ट असल्यासारखी वाटते. नाही नाही मला सिनेमाचे परीक्षण लिहायचे नाही , तशी माझी कुवत ही नाही. परंतु पु. ल. च्याच हरितात्यासारखे काही व्यक्ती आपल्या बरोबर कायम आहेत अश्या वाटतात त्यापैकी एक पु. ल.
प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग २/३
प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ?
भाग २/३
डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे.
मागील भागाचा दुवा -http://aisiakshare.com/node/7041
(10) प्राणायामात मेंदूत नक्की काय होते ?
सर्वसाधारण श्वसन हे अनैच्छिक असते आणि त्याचे नियंत्रण आयुष्यभर मेंदूतील एका छोट्या पेशीसमूहाकडून केले जाते. या पेशीसमूहाचा आकार काही मिलीमिटर इतका लहान असतो. त्यांचे कार्य काही वेळा औषधामुळे बदलू शकते.
'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'
काल 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' पाहिला, एक चित्रपट म्हणून चांगला आहे. भारतीय सैन्यावरचा आदर यामुळे वाढत असला, तरी 'उरी' मध्ये झालेला हल्ला आपल्या इंटेलिजन्स चं अपयश होतं हे खुबीने लपवलं आहे. सर्जिकल स्ट्राईक बद्दल आज मिडियाच्या कृपेने भरपूर माहिती आहे, त्यामुळे यातल्या फॅक्टस कोणी नाकारू शकणार नाही. अभिनयाच्या बाबतीत नेहमीप्रमाणे 'विकी कौशल' ने भारी कौशल्य दाखवलं आहे. चित्रपटातपण नरेंद्र मोदी 'मित्रो' असं कधीपण म्हणतील की काय असं सारखं वाटतं राहते. उरी मधली आवडलेली गोष्ट म्हणजे यात यामी गौतम आणि विकी कौशल याचं कुठेही अफेयर वगैरे दाखवलं नाही.
मिसळपाव