Skip to main content

पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 16/01/2019 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारचा दिवस होता आणि सवयीप्रमाणे इंग्लिश पेपरातले मेगॅ-क्रॉसवर्ड सोडवत बसलो होतो. हे सोडवणे म्हणजे डोक्याचा भुगा होतो. सगळे कोडे कधी सुटत नाही पण निम्मे सुटले तरी मी आनंद मानतो. या कोडयातले एक शोधसूत्र लक्षवेधी होते. ते असे: ‘ओलीस व्यक्तीस तिच्या अपहरणकर्त्याबद्दल वाटणारे प्रेम’ ओळखायचा शब्दसमूह तब्बल १७ अक्षरी (९+८) होता. अन्य उभ्या-आडव्या शब्दांच्या मदतीने त्यातला दुसरा शब्द Syndrome असा सुटला. पण पहिल्यातले फक्त पहिलेच अक्षर S एवढेच कळत होते. खूप वेळ जाम डोके खाजवले पण शेवटी थकलो. पण डोक्यात किडा वळवळत होता आणि जाम अवस्थ होतो. मग गेलो गुगलराजाला शरण.

मोहाचा विळखा भाग १/३

लेखक असहकार यांनी बुधवार, 16/01/2019 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
जगात सातशे कोटीच्या वर लोकसंख्या गेली आहे. २०० देश आहेत. २०० देशात शेकडो कायदेही आहेत. पण सातशेकोटीतली सर्व माणसे इथून तिथून मात्र सर्वत्र सारखीच आहेत असे वाटावे अशा घटना कायम घडत असतात. मोहाचा विळखा घालणार्‍या पॉन्झी स्किम्स ह्या देखील त्यातल्याच एक. पॉन्झी स्किम्स व तिच्या देशोदेशीच्या अवतारांबद्दल सांगण्याआधी एक सांगावं वाटतं. ते वाचकांनी पक्कं डोक्यात कोरुन ठेवावं. कदाचित वेडेपणा वाटेल, हे काय लिहिलंय असे वाटेल. पण नीट वाचा.
फसवणार्‍यांपेक्षा फसले जाणारे जास्त मोठे गुन्हेगार असतात.
; बघा वाटलं ना आश्चर्य? तुम्हाला कधी कोणी फसवलं असेल तर थोडासा रागही आला असेल.

एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर

लेखक सजन यांनी मंगळवार, 15/01/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
पोकर म्हटले कि लगेच डोळ्यासमोर येतो तो ओशन ११ किंवा जेम्स बॉण्डच्या सिनेमांमधून आपल्या समोर आलेला पोकर, वाळवंटातली मायानगरी लास वेगस (Las Vegas) ज्याच्या जीवावर चालते तो पोकर, कोट्यावधींची ज्या खेळात उलाढाल चालते तो पोकर, ज्याच्या अनुशंघाने नकळत ज्याचे समीकरण गुन्हेगारी वर्तुळाशी लावले जाते तो अपनेही आपमें एक गूढ वलय बाळगणारा पोकर. भारतीयांनाही पोकर तसा नवा नाही. घरोघरी दिवाळी-गणपतीत चालणाऱ्या पत्ते-पार्टीज् असो की, रस्त्याच्या बाजूला कोंडाळे करून, तोंडात काडी धरून खेळलेला तीन पत्ती असो, पोकर म्हणजे जुगारच.

बडव्यांची दुनिया

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 15/01/2019 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना जंगलावर राज्य करायचं असेल तर खबरीलाल पोपट पाळून चालत नाही त्यासाठी सिंव्ह पाळावा लागतो हा सिंव्ह आपल्यासमोर उभा आहे फक्त आपल्या किमतीचा भाव जुळावा लागतो -----------कविता ------- धूर दिसे , काहीही नसे पोपट करी जो त्रागा शिकाऱ्यास तो असे भासवे जणू तोच जीवनधागा जंगल मंगल पोपटामुळे पोपट किती रे चपळ हा नसता तर अवघड असते पेलले नसते जंगल बित्तम्बातमी अशी आणतो जंगलाची जणू नस जाणतो पोपट पोपट करी शिकारी काहीच सुचे ना त्याला पोपट मारी अशी फुशारी जणू हाच एकमेव जंगलाला सिंव्ह बिचारा सुखी आपला मालूम नसे हे त्याला शिकार्यासी तो देव मानुनी रोज पूजी तयाल
Taxonomy upgrade extras

सर्कस (कथा)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 15/01/2019 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे त्या एवढ्या एवढ्याश्या पटांगणात एवढी मोठी सर्कस उभी राहील असं कोणालाही वाटलं नव्हतं. तरीही दोन्ही बाजूच्या रस्त्यांना लागून का होईना तिथं सर्कशीचा तंबू दिमाखात उभा दिसत होता. तिकिट काढून आत गेलं की सर्कशीची मांडणी पाहून ती जागा पाहिलेल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नव्हतं. कारण त्या जागेचा संपूर्ण कायापालट झालेला होता. सर्कशीच्या गोल अशा रिंगणाचं व्यासपीठ सोडून बाकीचा जमिनीचा चर खोदून मागे मागे भर टाकून खुर्च्या ठेवण्यासाठी नाट्यगृहासारखा उतार केलेला होता आणि तोही रिंगणाकार. त्या उतारावरच खुर्च्या ठेवून बसण्याची सोय केलेली होती.

धाबा स्टाईल चिकन

लेखक जागु यांनी मंगळवार, 15/01/2019 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच पारंपारीक चिकनपासून थोड वेगळ काहीतरी करू म्हणून आंतरजालावर चिकनच्या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा धाबा स्टाईल चिकन ची रेसिपी दिसली.

मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग १/३ (आकारमानाने पडणारे फरक)

लेखक पुष्कर यांनी मंगळवार, 15/01/2019 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठिका सध्या मी राहतो तिथे उन्हाळा चालू आहे. दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा उलटे चालतात. त्यामुळे सध्या जिकडे तिकडे भसाभस मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या मुंग्यांची मजा बघत बसणे हा एक आवडता छंद झाला होता. घरात कुठे मुंग्या लागल्या असतील तर त्यांची रांग बघत बघत मूळ स्रोत शोधायचा प्रयत्न करणे, रांगेच्या मध्येच बोटाने पुसून त्यांची रांग अस्ताव्यस्त करणे, मुंग्यांच्या भोवती पाणी शिंपडून त्याचं वर्तुळ करणे आणि मुंग्यांना हा भवसागर पार करून जाता येतं का ते पाहणे - असले अनेक उद्योग तेव्हा केलेत!