Skip to main content

MLM (मोहाचा विळखा ३/३ )

लेखक असहकार यांनी रविवार, 27/01/2019 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
मल्टीलेवल मार्केटींग स्कॅम इन्स्टन्ट गोरेपन, इन्स्टन्ट शक्ती, इन्स्टन्ट कॉफी इत्यादीच्या इन्स्टन्ट जमान्यात कोणालाही आपले स्वप्न पूर्ण व्हावे तर ते झटपट, आताच्या आता, इन्स्टन्ट झाले तर आवडेलच. त्यात त्याला फारसे काही करायची गरज नसेल, केवळ जुजबी मिटींग्स अटेन्ड करणे, थोड्याफार लोकांना भेटणे आणि बाकी दिवस, महिने आरामात आपल्या कुटूंबासमवेत घालवणे अशी चमचमीत संधी असेल तर? कुणाला नाही आवडणार. नक्कीच आवडेल. आणि मग अशा इन्स्टन्ट सक्सेसच्या मागे लागणारा तो इन्स्टन्स्ट पैसे घालवून बसणार व मित्रनातेवाइकांशी संबंधही इन्स्टन्ट बिघडवून बसणार हेही आलेच. हे कसे होते?

अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग २

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 27/01/2019 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ०, भाग - १. आणि माझे सर्व लेखन मागच्या भागात आपण सेल्फ अॅनालीसीसची तोंड ओळख करून घेतली. तोंडओळख अशासाठी जसजसे आपण पुढे सरकू, तसतसे चालू विषयाच्या अनुषंगाने आपण सेल्फ अॅनालीसीस का आणि कसा आवश्यक आहे ते पण पाहू.

फिजिक्स चं ग्रामर: कर्ता(Doer), कर्म(Object) आणि क्रिया(Actions)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शनिवार, 26/01/2019 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा विक्रमामधला न्यायनीतीवान प्रशासक जागा झाला होता. झालं काय होतं की त्याच्या राज्यात असलेल्या जंगली प्रदेशांमध्ये आणि त्या लगतच्या शेतीमध्ये आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. आता या आगी कोण लावतं हे कळायला मार्ग नव्हता. म्हणजे हे चुकून होतंय की कोणी मुद्दाम करतंय हे लक्षात येत नव्हतं. शिवाय नैसर्गिक कारणांमुळे सुद्धा ते वणवे लागू शकतात. पण जर कोणी हे मुद्दाम करत असेल तर त्याचा तपास करणं गरजेचं होतं. कोणी(Who) केलं? कुठे(Where) केलं? कसं(How) केलं? त्यातली पद्धत काय, साधनं काय (What)? मुख्य म्हणजे कशासाठी(Why) केलं हे सगळं पहायाची गरज होती. तरंच घटनांच्या मुळाशी जाणं शक्य होतं.

तुझ्या 'सविते'ची ओळ उर्फ भाभीजी

लेखक दमामि यांनी शनिवार, 26/01/2019 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना तुझ्या 'सविते"ची ओळ अवचित दिठी येते 'रानातल्या' निवडुंगा इवलेसे फूल येते.. तुझ्या 'सविते'ची ओळ अवचित दिठी येते खाटल्याच्या खोळातून कामधून उमटते.. तुझ्या 'सविते'ची ओळ अवचित दिठी येते पाखरांच्या थर्थरीने वठली वेल मोहोरते.. 'सविते'ची ओळ तुझ्या पुन्हा पुन्हा दिठी येते पुन्हा पुन्हा भिजवूनिया पुन्हा पुन्हा हुबारते..
काव्यरस

मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग ३/३ (आकारमानाने पडणारे फरक)

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 25/01/2019 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठिका सध्या मी राहतो तिथे उन्हाळा चालू आहे. दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा उलटे चालतात. त्यामुळे सध्या जिकडे तिकडे भसाभस मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या मुंग्यांची मजा बघत बसणे हा एक आवडता छंद झाला होता. घरात कुठे मुंग्या लागल्या असतील तर त्यांची रांग बघत बघत मूळ स्रोत शोधायचा प्रयत्न करणं, रांगेच्या मध्येच बोटाने पुसून त्यांची रांग अस्ताव्यस्त करणं, मुंग्यांच्या भोवती पाणी शिंपडून त्याचं वर्तुळ करणं आणि मुंग्यांना हा भवसागर पार करून जाता येतं का ते पाहणं - असले अनेक उद्योग तेव्हा केलेत!

सोनेरी चकवा.

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 25/01/2019 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
सोनेरी चकवा . अंडे पहिल्यांदा का कोंबडी ? अनुभव हवा म्हणून मनुष्य जन्म घेतो का तो जन्मतो म्हणून त्याला येईल त्या अनुभवाला सामोरे जावे लागते ? दैव बलवत्तर म्हणून त्याला यश मिळते का प्रयत्नामुळे यश त्याच्या हातात येते ? असे कितीतरी प्रश्न मला सारखे पडत असतात. उत्तर नसणारे . किवा आपल्याला हवे ते उत्तर असणारे . पण मी हे प्रश्न तुम्हाला आत्ताच का विचारतोय ? खरे म्हणजे आत्ता मला हा प्रश्न पडलाय की मला सारखे सारखे हे लाकडी बैठे मेज माझ्या स्वप्नात का दिसते ? हो ..हा महत्वाचा प्रश्न आहे. हे लाकडी बैठे मेज माझ्याकडे नाही ... मग मला ते स्वप्नात का दिसते ?

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 25/01/2019 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
२: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

"तू " अधिक " मी " किती ?

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 25/01/2019 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपा प्रश्न होता माझा "तू " अधिक " मी " किती ? तू उत्तर दिलेस "दोन" अंतर्मुख होऊनि शोधू लागलो आपण आहोत तरी कोण ? मला अपेक्षीत “एक " होते आपल्यात मुळी अंतरच नव्हते दोन देण्यामागे कारण काय होते? जर तू माझ्यात होतीस मग मी तुझ्यात का नव्हतो ? आणि मी तुझ्यात नव्हतो तर मी कुठे होतो ? गणित सोपे जरी वाटले दुरून अवघड झाले उत्तरावरून का दिलेस तू विचित्र उत्तर ? कुढत गेलो पुढे निरंतर जवळ घेतला मद्याचा प्याला शोधत गेलो मला स्वतःला {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

चिन्मय

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 25/01/2019 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
चिन्मय चित्रे हा एक स्वछदि मुक्त जीवन जगणारा तरुण होता आई जानकी चित्रे सरकारी कार्यालयात ऑफिसर होती व नुकतीच सेवानिवृत्त झाली होती चिन्मय फेसबुक वॅट्स अप चे मित्रमंडळ या मध्ये रमला होता पार्ट्या सहली खाणे पिणे मजेत आयुष्य जगत होता आयुष्य मजेत जगायचं हे त्याचे जीवन विषयक तत्वज्ञान होता कामिनी साने ची प्रोफाइल त्याने फेसबुकावर पाहिली अन तो बेहोष झाला तिने अप लोड केलेले फोटो तो तास न तास बघत बसत असे कामिनी सौंदर्य वती होती कधी जीन व स्लिव्हलेस टॉप कधी गर्भ रेशमी साडी -तर कधी ड्रेस - असे फोटो ती अप लोड करत असे तिला एकदा रुबरु भेटावे गप्पा माराव्यात डेट वर जावे असा विचार त्याच्या मनात बळ

अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - १

लेखक ज्ञानव यांनी शुक्रवार, 25/01/2019 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग – १अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ० शेअर मार्केटमध्ये सुरुवात करण्याआधी अॅनालीसीस हा प्रकार समजून घेणे आणि तोही फारसा गहन न करता हे खूपच आवश्यक असते. कारण अनालिसिस हा जगण्याचा श्वासच आहे. जर हा श्वास घेणे जमले नाही तर गैरसमजाचा लागणारा दम आपला जीव घेतो हे पक्के गाठीशी बांधूनच सुरुवात करावी. इतर अन्य व्यवसाय धंदे आणि शेअर मार्केट थोड्याफार फरकाने सारखेच असते.