Skip to main content

[शशक' १९] - सोंग

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 13/02/2019 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
देवपूजा झाली. माईंनी देव्हाऱ्यात निरांजन ठेवला. वाटीतले कुंकू कपाळावर लावले. डोक्यावरून पदर घेवून दोन्ही हात जोडून नमस्कार केला. सर्व आटोपून त्या इस्पितळात पोचल्या. मुलगा ICU बाहेर ताटकळत उभा होता. डॉक्टर नुकतेच भेटून गेल्याचे कळाले. "काय रे, काय म्हटले डॉक्टर?" त्यांनी मुलाला विचारले. "Tracheotomy Tube काढली कि जातील दोन तीन दिवसात." पोरगा चिंताग्रस्त होता. डोळ्यात पाणी तरळले होते. "मग कधी काढायची?" अधिरपणा न लपवता माई म्हणाल्या. तितक्यात कोणीतरी भेटायला आले. माई पुढे झाल्या. अथपासून इथंपर्यंत नवर्याच्या आजारपणाची कॅसेट वाजवून माईंनी पदराने डोळे पुसले. दोन हुंदके दिले.

दरवळ (शतशब्दकथा)

लेखक किल्ली यांनी बुधवार, 13/02/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
“तुझा आवडता perfume कुठला?” “मी नाही सांगणार, secret आहे.” “दूरदेशी जातोय, तिथून तुझ्यासाठी सुगंधी भेट आणीन म्हणतो. कधी कधी वाटतं, जाई, जुई, मोगरा, चाफा ही मंडळी नशिबवान आहेत. त्यांना तुझा सहवास कायमच मिळतो. माझ्यामुळे तुझी संध्याकाळ सुगंधी, भारावलेली झाली तर मी कृतार्थ होईन गं!” तिचे मौन बघून काहीश्या निराशेनेच तो तिथून निघाला. ठरल्याप्रमाणे त्याने आकाशात उंच भरारी घेतली. पण दुर्दैव! तो अगम्य उंचीवरून कोसळला! त्या परिस्थितीही, आपण तिच्यासाठी काही आणू शकलो नाही ह्या भावनेने आणि अतीव वेदनेने तो जणू अश्रू बनून कोसळू लागला.

गेम ऑफ थ्रोन्स पार्श्वभूमी

लेखक nishapari यांनी बुधवार, 13/02/2019 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
गेम ऑफ थ्रोन्सच्या कथानकाची पार्श्वभूमी थोडक्यात - वेस्टेरोज या प्रचंड प्रदेशात सात प्रमुख घराणी व त्यांची 7 राज्यं आहेत . ती घराणी म्हणजे बरॅथिऑन , स्टार्क , लॅनिस्टर , टार्गेरियन्स , ग्रेजॉय आणि टली , टायरेल आणि सातवं मार्टेल . मालिकेची सुरुवात होते तेव्हा किंग रॉबर्टस राजा आहे आणि बाकीची सगळी राज्यं मांडलिक .. किंग रॉबर्ट्स हा वंशपरंपरागत राजा नाही .. त्याच्याआधी टार्गेरियन्स या घराण्याची सत्ता होती , पहिल्या एपिसोड मध्ये जे चंदेरी केसांचे भाऊ बहीण व्हिसेरिस व डॅनेरिस भेटतात त्यांच्या घराण्याची .

[शशक' १९] - वेंधळा

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 13/02/2019 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी वेंधळेपणा करतो म्हणे! एखाद्या वेळेस चावी किंवा ग्रोसरी गाडीत राहिली म्हणुन लगेच? त्याने आठवणीने गाडी रिवर्स लावली, वायपर्स उभे करुन ठेवले. शॉवेल आणि ब्रश ट्रंकमधुन घेताना त्याला मागच्या वेळची फजिती आठवली. दोन फुट बर्फ आणि हत्यारं सगळी गाडीच्या ट्रंकेत! रात्रभरात गुडघ्याइतका बर्फ पडला होता. अर्धा तास आधीच उठुन समीर खाली गेला. गाडी स्टार्ट करुन ठेवावी का? एक्झॉस्ट बर्फात ब्लॉक्ड असेल. मागे एकाच्या गाडीत कार्बनमोनॉक्साइड पसरुन गुदमरुन गेला.

दिवस तुझे ते ऐकायचे....

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 13/02/2019 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ बहुतेकांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिनाचीच ओळख करून देत आहे.

सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी....

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 12/02/2019 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
कवी संजीव यांची क्षमा मागून मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ || माया माहेराची बोफोर्स दलालीची... 'इकडून' घातली भर पाचशे कोटींची... गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ || येता निवडणूक साडी नेसावी... आई - भावासाठी मते मागावी... चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया... विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे... वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ || - यतिन भट

[शशक' १९] - लोणचं

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 12/02/2019 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांनी डबे उघडले आणि त्यातले जिन्नस चवीपुरते वाटून घेतले. त्याच्या डब्यात चपातीच्या घडीत लोणच्यातल्या चार मिरच्या होत्या. मित्र म्हणाला, ‘लोणच्यानं मजा आणली! उद्याही घेऊन येना थोडं.’ त्याचा घास घश्यातच अडकला. भरून आलेले डोळे कुणाला न दिसेलसे पुसत म्हणाला, ‘माफ करा मित्रहो! हे लोणचं मी पुन्हा कधीही आणू शकणार नाही.’ दोन आठवड्यांपूर्वी एके सकाळी त्याची आई कार्डिअॅक अॅरेस्टने गेली. भावाघरी धावला तो, पण कुणालाच काही करता आलं नाही. सगळं आटोपल्यावर घर सोडताना, जाण्यापूर्वी चारच दिवस आईने घातलेलं लोणचं प्रत्येकाने छोट्या बरणीतून आठवण म्हणून घेतलं. ते कधीच संपू नये असं त्याला वाटत होतं.

[शशक' १९] - गैरसमज

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 12/02/2019 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रत्येकवेळी काही झालं तरी मीच...." तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तो कडाडला. "काय मी मी लावलंय सारखं.मी हे केलं मी ते केलं. मला जसं जमतय तसं मी करतोय. कधी कसलीच तक्रार करत नाही तुझ्याकडे. तु म्हणालीस म्हणुन चाललोय ना मुलीच्या शाळेत मिटींगला. ऑफिस मद्धे कामाचे डोंगर पडलेत त्याचं आधीच टेन्शन आलंय तरी काही बोललो का ? उतर ईथेच" असं म्हणून त्याने कारचा दरवाजा उघडुन तिला खाली उतरवलं. "प्रत्येकवेळी काही झालं तरी मीच सॉरी म्हणायचं. चुक कोणाचीही असो" तिने मनातल्या मनात मघाचे वाक्य पूर्ण केले.आता त्याचा राग कसा घालवायचा असा विचार करत, तिच्या कामांचा ढीग पूर्ण करायला ती ऑफिसमद्धे निघाली.

[शशक' १९] - तिकीट

लेखक चिनार यांनी मंगळवार, 12/02/2019 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो..प्रदेशाध्यक्ष साहेब..तात्याराव बोलतो" "हा बोला.." "आमच्या तिकीटाचं सांगणार व्हते तुमी?" "तिकीट कन्फर्म आहे तुमचं ह्यावेळी..खोके पाठवा आन तयारीला लागा निवडणुकीच्या" "बरं...करतो व्यवस्था.." काही दिवसांनी.. "प्रदेशाध्यक्ष..गेम खेळू नका आमच्यासोबत..आप्पासाहेबाकडून पन खोके मागवल्याची खबर लागली आम्हाला" "विश्वास नाही का आमच्या शब्दावर?

[शशक' १९] - भेट

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 12/02/2019 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
दरवाजा उघडला. तर हा! समोर गुलाबासकट गुलाबाची कुंडी घेऊन... (हम्मम... मवाली कुठला...) (तेवढ्यात बाबांचा प्रश्र्न..) कोण आहे गं? मी चाचपडत... गोंधळलेल्या अवस्थेत काही बोलणार तोच. बाबा बोलले "रोपटे घेऊन आलाय... हा ये रे! तिकडे गॅलरीत ठेव..." त्यानेच दिलेल्या कुंडीतलं गुलाब त्याच्या उशाशी ठेवून मी निघाले... निघण्यासाठी दरवाजा उडण्या आधी पुन्हा एकवेळ वळुन त्याच्याकडे पाहीलं. तो एकटक माझ्याकडे पाहत होता. आजुबाजुला स्तंब्धता, शांतता आणि व्हेन्टीलेटरचा भीतीदायक आवाज. माझे डोळे बांध फुटावा असे वाहत होते... मी दार उघडला आणि मेंहदी भरलेल्या पावलांनी धावत सुटले...