Skip to main content

ऍव्हेंजर आणि मी..

लेखक चिनार यांनी सोमवार, 22/04/2019 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऍव्हेंजर फॅन कोणी आहे का ? एक प्रश्न आहे गरिबाला... तो ऍव्हेंजर्स एन्ड गेम सिनेमा आलाय तो एकदम फायनल म्हणायचा का? म्हणजे विषय संपला का एकदाचा? पुढचं लिहीण्याआधीच सांगतो, वर्षभराने 'ऍव्हेंजर्स उरलंसुरलं' नावाने सिनेमा येणार असल्यास माझी काहीही हरकत नाही. मी ऍव्हेंजर्स विरोधी नाही. आणि मार्व्हल व्हर्सेस डीसी वगैरे फंदात तर मला मुळीच पडायचं नाही. आमच्यालेखी मार्व्हेल, डीसी म्हणजे शिवसेना-मनसे आहेत. म्हणजे एकाला झाका दुसऱ्याला काढा फरक नाही.

घोळ झाला घोळ

लेखक कहर यांनी सोमवार, 22/04/2019 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ तुला आठवता कागदावरी उतरून आली ओळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ स्पर्शता तुला विसरून गेलो करायची अंघोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ तुझ्या सयीने हृदयाच्या छिद्राचे झाले बोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ तुझ्या अदा टोमणे बहाणे मिसळून झाला कोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ झोप नाही रात्रीला सोबत घुबड नि वटवाघोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ पाहताच तू दुजाकडे उठतात आगीचे लोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ कोरेगाव तू पार्क प

# राजे छत्रपती

लेखक sanket gawas यांनी सोमवार, 22/04/2019 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिवनेरी दारी तोफा कडाकल्या सह्याद्रीच्या कुशीत विजा चमकल्या.... जिजावुंच्या पोटी रत्न जन्मलं स्वराज्याच्या स्वप्नात राजे बाळ रंगल.... हाती घेऊन तलवार करी अन्यायाचा प्रतीकार प्रत्येकी जाहला देवाचा साक्षात्कार...... केली स्वराज्याची स्वारी घेऊनी आर्शिवाद भवानी मातेचा शत्रूंवर बरसला मस्तकी लावूनी टीळा भगव्या रक्ताचा ..... स्वधैर्याने गाजवले द्दिल्लीचेही तख्त कोणत्याही परिस्थितीत झुकले नाही मराठ्यांच रक्त .... जन्मभर फक्त आणि फक्त रयतेसाठी झिजला स्वराज्याच स्वप्न उरी बांधूनी तो एकटाच लढला.... शिव छत्रपती राजा प्रत्येकी मनी बसला असा एक शिवसुर्य रायगडी कुशीत निजला......

Coffee आणि ति २

लेखक sanket gawas यांनी सोमवार, 22/04/2019 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
#Coffee2 आपली भेट ,Coffee आणि बरच काही आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही... कारण आज नव्हतीस तू समोर फक्त भास होता मनाचा सोबत बसलोय तुझ्या हाच प्रयन्त होता स्वतःला समजवण्याचा... स्वतःला तुझ्यात हरवून खूप काही आज बोलायचं होत डोळे बंद करून तुझ्या गप्पांमध्ये स्वतःला गुंतवायच होत.... खरतर आज खूप तक्रारी करणार होतो तुझ्याकडे मागणार होतो स्वतःसाठी हक्काची अशी वेळ तुझ्याकडे... पण समोर होती रिकामी खुर्ची तीहि वाट बघत होती तुझी कदाचीत आज तिलाही परीक्षा घेऊन बघायची होती माझी... हातातला कॉफी चा कप मागत होता काही प्रशांची उत्तरे पुन्हा पुन्हा तुला आठवून मन मात्र आतून रडत होत बिचारे... म्हटल तू

Coffee आणि ति

लेखक sanket gawas यांनी सोमवार, 22/04/2019 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपली भेट ,Coffee आणि बरच काही आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही... ओळख असुनही अनोळखीच वाटत होतो एकमेकांची नजर चुकवून हळूच बघत होतो ... चेहऱ्यावर शांतता पण मनातून भलतेच खुश होतो पहिले कोण बोलेल ह्याचीच वाट बघत होतो.... तक्रारी तर एकमेकांच्या खूपच होत्या पण मनातल्या भावना ओठांवरच थांबल्या होत्या ... लाजुन का होइना,शेवटी सुरूवात तुच केली काॕफी सोबत गप्पांना मजा काही औरच आली... बोलताना कधी म्हणायची तु ,तर कधी म्हणायची तुम्ही खरंतर काय बोलावं यातच फसलो होतो आम्ही .... वाटलही असेल की तुझ्या समोर मी थोडा घाबरत होतो पण काय सांगणार ,बावरलेल्या मनाला मी सावरत होतो .... तुझी मात्र बिनधास्त बडबड

#आई

लेखक sanket gawas यांनी सोमवार, 22/04/2019 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
#आई आई आज तुझ्या आठवणी मध्ये रमून रहावस वाटतं तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावासा वाटतं ..... किती मस्त झाले असते जर गेलेला वेळ परत आला असता तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण पुन्हा जगायला भेटला असता.... लहानपणापासून माझे अडखळणारे पाऊल सांभाळले वाट चुकलो तेव्हा बोटाला पकडून सरळ चालायला शिकवले.... आमच्या भोवती असताना कधीच स्वतःचा विचार तु केला नाही कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर कधीच दाखविले नाही ... कधी कधी वाटतं फक्त स्वतःच्या सुखासाठी घर सोडले म्हातारपणात आधार न देता तुला मी एकट टाकले ... सतत वाट बघत उभी असतेस डोळे लावूनी दारी.. माझही चुकत कारण येतो फक्त पाहुणा बनुनी घरी ....

महागाईच्या गप्पा

लेखक बी.डी.वायळ यांनी सोमवार, 22/04/2019 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमध्ये काल बायका मारत होत्या गप्पा | महागाईचा विषय होता साधा आणि सोपा | काल जेंव्हा बाई मी मार्केटला गेले | भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले| पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी| एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी | एकरुपयाचे लिंबु पाच रुपयाला झाले | कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले | बारा रुपये पाव किलो वांगी व कारले | फ्लावर व कोबी बघुन डोकेच फिरले | पंचविस तीस रुपये किलो होते तेथे गहू | तांदुळ म्हणाला मला हातच नका लावू | शंभर रुपये किलो झाली तुरीची डाळ | भडकलेले होते हरबरे आणि वाल | साखरेचा भाव तर चाळीसवर गेला | तेलाचा डबा पण किती महाग झाला| दुध झाले महाग पन्नास रुपये लिटर | विचारा

ग्रीन बुक : माणूस होण्याचा प्रवास

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 22/04/2019 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास माणसाला खूप काही शिकवून जातो. विशेषतः आपल्या शहराच्या बाहेर, आपल्या राज्याच्या बाहेर, आपल्या देशाच्या बाहेर पडलो की एका वेगळ्याच जगात आपण जातो. जे जात-पात-धर्म-वर्ण या पलीकडे माणुसकी म्हणून एक धर्म आहे, ज्यामुळे आपण जगाकडे वेगळ्याच नजरेने पहायला शिकतो. ज्यात आपल्याला सगळी माणसं सारखीच आहे याची जाणीव होते. Peter Farrelly चा यंदा तब्बल 03 ऑस्कर जिंकणारी डॉक्टर डोनाल्ड शर्ले (मेहेरशाला अली) आणि टोनी लिप (विगो मॉर्टेन्सन) यांची माणूसकी उलगडत जाण्याची कथा म्हणजे ‘ग्रीन बुक’. १९६० च्या दशकात अमेरिकेतल्या प्रसिद्ध पियानो प्लेयर असणाऱ्या डॉ.

मूळ पेशी : रोगोपचाराचे प्रभावी अस्त्र

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 22/04/2019 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ पेशींचे शास्त्रीय नाव आहे Stem cells. वैद्यकविश्वात विविध अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता नियमित होतात. त्याच धर्तीवर निरोगी व्यक्तीतील मूळ पेशींचे देखील प्रत्यारोपण एखाद्या रुग्णात करता येते. रक्ताच्या काही गंभीर आजारांत अशी प्रत्यारोपणे आता नियमित होतात. ‘बोन मॅरो’ चे प्रत्यारोपण हा शब्दप्रयोग आपल्यातील बरेच जणांनी ऐकला असेल. या विषयावर आधारित काही चित्रपट देखील प्रदर्शित झालेले आहेत. गेल्या काही दशकांत विकसित झालेल्या या विज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी हा लेख.

माझं गंधित जग

लेखक अन्या बुद्धे यांनी रविवार, 21/04/2019 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चेहर्यावर नाक फक्त चेहरा बरा दिसावा म्हणून देवाने घाईघाईत चिकटवलं असणार असा माझा समज आहे. वस्तू नाकाजवळ घेतल्याखेरीज मला फारसा वास जाणवत नाही. 'तुला नाक नाही श्वास घ्यायला भोकं दिलीत देवाने' बहीण म्हणायची मला. तरी मला ही इष्टापत्ती वाटते. कारण चांगल्या गोष्टी नाकाजवळ नेऊन मी वास घेतो पण वाईट वास मला त्रास देत नाहीत हे सुखाचं नव्हे का? एकदा कॉलेजमधून दुपारी घरात पाऊल टाकल्याक्षणी 'आजपण बटाट्याच्या काचऱ्या?' म्हणाली बहीण तेंव्हा 'तुला नाक नाही सोंड दिली आहे देवाने' असं तिला म्हणालो होतो मी. असो.. सो असा विचित्रपणा असल्याने माझं गंधाळलेलं विश्व तस लहानसं आहे.