Skip to main content

जिलब्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 04/06/2019 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
का म्हणून दिवसेंदिवस जिलब्या टाकत राहावे ? का म्हणून आपणच समूहा पाकमय करावे ? थोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी कढई नि झारा दिसेल तो हातात घेऊन बसलेला एक साधा खादाड दिसेल एक दिवस तरी बुभुक्षित बनून बघावे भुभुकार करून पाहावे न पटेल तिथे फाट्यावर मारून बसावे रुसेल त्याचे फुगवे निपटावे शांत निवांत राहून जिलब्या धागे वाचावे वाचता वाचता वाचकाने लेखकाचे पेन घेऊ नये साधा वाचक जे जे करतो ते ते मनापासून करावे खदखदून खदखदून हसावे विरोधकांनी पण तोंडात बोट घालावे इतके साऱ्या धाग्यावर मौनावे रमत गमत इन बॉक्स वर राहावे हम, तुम झुम करत टिचक्या मारावे एखादा धागा वाचून प्रतिसादावे न हळूच निसटावे का

संवाद

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 04/06/2019 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
खूप जुना किस्सा आहे.. 1996-97चा.. आमच्याकडे एक माळी होता बागकाम करायला. आई त्याला पगार देत नसे. त्याच्या नावे तिने अकाउंट ओपन करून दिलेलं. त्यात ती भर टाकत असे. एके दिवशी आईने मला सांगितलं, तो बँक जवळ येईल त्याला पैसे काढून दे. मी ठरल्यावेळी तिकडे थांबलो. त्याला यायला उशीर लागला. कंटाळून सिगारेटच्या टपरीकडे गेलो. सिगरेट अर्धी झाली असतानाच तो आला.. आमच्यात झालेला संवाद असा.. थोडं थांब. सिगरेट संपली की जाऊ बँकेत. तुला घेऊ सिगरेट? नको. मी नाय वडत. सिगरेट तमाखू कायच नाय. दिवसभर काम केलं की 200 भेटतात. त्यात दारू सिगरेट साठी कुठे खर्चु? चांगलंय.. हे तुला आता समजतंय हे बरोबर.

आठ चौपन्न

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 04/06/2019 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
आठ चौपनचा सगळा ग्रुप दहा मिनिटं आधीच प्लॅटफॉर्मवर गोळा झाला आणि पेपरांची देवाणघेवाण सुरू झाली. फलाटावरल्या स्टॉलवरच्या पोऱ्यानं पाण्याच्या दोनतीन बाटल्या आणि कचोरीचं पुडकं एकीच्या हाती आणून दिलं तेवढ्यात गाडी फलाटावर येतच होती. हातातल्या पर्स, पिशव्या, छत्र्या सावरत सगळ्याजणींनी एकमेकींकडे पाहून डोळ्यांनीच इशारे केले, आणि झेपावायच्या तयारीत त्या उभ्या राहिल्या... गाडी पुरती थांबायच्या आधीच सगळ्याजणी जागा पटकावून स्थिरावल्या होत्या... पुढच्या दोनतीन मिनिटांत डबा खचाखच भरून गेला आणि पुन्हा इशारे झाले...

एक वादळ शांत होतांना

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 04/06/2019 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा बॉक्सिंग हा शब्द मनात येतो तेव्हा- तेव्हा तुमच्यासमोर सर्वात पहिले नाव येत ते The undisputed heavyweight champion of the world ‘महंमद अली’चं! १७ जानेवारी १९४२ ला केंटकी मधल्या लुइजविल शहरात त्याचा जन्म झाला. त्याचं आधीचं नाव 'कॅशियस क्ले' १२ वर्षाचा असताना त्याची सायकल चोरीला गेली होती, त्याची तक्रार करण्यासाठी तो मार्टिन नावाच्या एक पोलिस ऑफिसरकडे गेला, तिथे त्याचा आवेश पाहून, मार्टिनमामांनी हि उर्जा बॉक्सिंगमध्ये खर्च करायला सांगितली आणि एक जग्गजेत्याचा प्रवास सुरु झाला. त्याचा उर्जेवर आणि चपळतेवर प्रचंड विश्वास होता.

लाल परी

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 03/06/2019 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
दादरच्या रस्त्यावरून संध्याकाळनंतर मुंबईबाहेर जाणाऱ्या एसटीच्या लालपरी रातराण्या पाहिल्या की मला आजही, इतक्या वर्षांनंतरही गावाकडची आठवण येते, आणि मी उत्सुकतेने गाडीचा बोर्ड पाहू लागतो. कधीकधी तो वाचता येत नाही. मग गाडीच्या मागे नंबरखालची अक्षरे शोधतो, आणि देवरूख डेपोची गाडी दिसली की मनानेच गावाकडच्या आठवणींचा, भूतकाळाचा प्रवास सुरू होतो... ... आजही तसेच झाले. देवरूख डेपोची ‘मुंबई-देवळे मार्गे -पाली’ गाडी दिसली, आणि आठवणींचे सारे झरे जिवंत झाले. या गाडीने मी पूर्वी मुंबईहून देवरूखला, देवरूखहून साखरप्याला, पालीहून देवळ्याला, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर असंख्य वेळा प्रवास केला आहे.

सुपरनॅचरल - इंग्रजी मालिका

लेखक nishapari यांनी रविवार, 02/06/2019 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी मालिका : सुपरनॅचरल साधारण वर्ष दिड वर्षापूर्वी सुपरनॅचरल ही मालिका गवसली . प्रत्यक्षात ह्या मालिकेची प्लॉट लाईन काय आहे हे 6 - 7 वर्षांपूर्वीच पाहिलं होतं .. " 2 भाऊ आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पॅरानॉर्मल गोष्टी शोधून काढून नष्ट करण्याच्या आपल्या फॅमिली बिजनेस मध्ये उतरतात " अशी अगदी थोडक्यात माहिती वाचून मालिका पाहण्याची मुळीच इच्छा झाली नव्हती . वर्षभरापूर्वी जेव्हा पाहायचं ठरवलं तेव्हाही साशंकताच होती .. पण 10 - 15 एपिसोड पाहिल्यानंतर या मालिकेच्या प्रेमात पडले .

आई

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 02/06/2019 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्हिसांजेची वेळ. अंधार पडायला सुरुवात झालेली... एका घनदाट जंगलातून मोलमजुरी करून घराचा गाडा हाकणारी एक स्त्री आपल्या तान्ह्याला कडेवर घेऊन झपझप पावलं टाकत पायवाट कापत असते. काळोख मिट्ट व्हायच्या आत जंगल पार करून घर गाठायचं असतं... अचानक वारे वाहू लागतात. आभाळ भरून येतं, झाडं आडवीतिडवी होत एकमेकांना झोडपू लागतात... पायवाटेवरचा पावलापुरता प्रकाशही अंधुक होतो आणि ही स्त्री घाबरते... ती भीती वादळाची नसते. अधाराचीही नसते. ती भीती, कडेवरच्या बाळाच्या सुरक्षिततेची असते... वादळ आणखीनच जोर धरतं.

आई

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 02/06/2019 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्हिसांजेची वेळ. अंधार पडायला सुरुवात झालेली... एका घनदाट जंगलातून मोलमजुरी करून घराचा गाडा हाकणारी एक स्त्री आपल्या तान्ह्याला कडेवर घेऊन झपझप पावलं टाकत पायवाट कापत असते. काळोख मिट्ट व्हायच्या आत जंगल पार करून घर गाठायचं असतं... अचानक वारे वाहू लागतात. आभाळ भरून येतं, झाडं आडवीतिडवी होत एकमेकांना झोडपू लागतात... पायवाटेवरचा पावलापुरता प्रकाशही अंधुक होतो आणि ही स्त्री घाबरते... ती भीती वादळाची नसते. अधाराचीही नसते. ती भीती, कडेवरच्या बाळाच्या सुरक्षिततेची असते... वादळ आणखीनच जोर धरतं.

चित्रपट: The Descendants!

लेखक लई भारी यांनी रविवार, 02/06/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
हॉटस्टार वर काहीतरी शोधत असताना ह्या चित्रपटाबद्दल कळलं. शक्यतो मी गुगल करून अंदाज घेतल्याशिवाय चित्रपट बघत नाही. त्यात 'जॉर्ज क्लूनी(की क्लोनी)' आहे म्हटल्यावर बघायचं ठरवलं. त्याचे थोडेच चित्रपट बघितलेत पण त्याचा अभिनय, संवादफेक प्रचंड आवडलीय. तस चित्रपटात नाट्य खूप नाही आहे आणि बऱ्यापैकी संथ वाटू शकतो. पण त्याच वेळी एकदम तरल आणि मनाला स्पर्शून जाणारा वाटला. हवाई बेटांवर राहणार कुटुंब. नायकाच्या ३-४ पिढ्या आधी हवाई बेटांपैकी एका मुख्य भूभागाचे बऱ्यापैकी अधिकार नायकाच्या(मॅट) पूर्वजांकडे असतात. राजघराणे म्हणा ना. त्यायोगे आताच्या विस्तारलेल्या भल्या मोठ्या कुटुंबाकडे प्रचंड मोठी जमीन असते.

आरश्यातल्या आरश्यात : एक आस्वाद

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/06/2019 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आरश्यातल्या आरश्यात वारले बेवारशी... - मनोहर ओक (‘आयत्या कविता’ मधून) मनोहर ओक यांच्या ‘आयत्या कविता’ या कविता संग्रहातील ही पहिली कविता. एका ओळीची. या एका ओळीच्या कवितेतील शेवटचा ‘बेवारशी’ हा शब्द ओळीत पहिला असता तर ते केवळ एक वाक्यश झाले असते: ‘बेवारशी आरश्यातल्या आरश्यात वारले!’ असे ते वाक्य झाले असते. पण ‘बेवारशी’ हा शब्द ओळीच्या शेवटी गेल्याने या वाक्याला एक लय प्राप्त झाली आहे. मात्र केवळ हा शब्द शेवटी गेल्यानेच लय निर्माण झाली असे मात्र नव्हे. तर या एवढ्याश्या ओळीतच नाद लयीचे सुंदर मिश्रण आहे. म्हणून ही एकच एक ओळ संपूर्ण कवितेची अट पूर्ण करते.