Skip to main content

साग्रसंगीत रगडा पॅटिस

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी गुरुवार, 18/07/2019 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
रगडा पॅटिस रगडा पॅटिस हा काही नवीन पदार्थ नाही. सर्वांना माहित असलेला, चाखलेलाच आहे. पण एकदा जबलपूरला माझं गाणं होतं. तिथं एक राजुरकर म्हणून कुटुंब रहात होतं त्यांच्याकडे मी खाल्लेला रगडा पॅटिस अप्रतिम होता. त्या घरच्या बाईंना मी कृती विचारून घेतली. तेव्हापासून मी तसाच करते. ती कृती तुमच्यासाठी देते. लागणारे जिन्नस: सात ते आठ मध्यम बटाटे, एक ईंच आल्याचा तुकडा, मूठ भरून सोललेल्या लसूण पाकळ्या, कोथिंबिरीची मोठी जुडी.

तुंबाडचे खोत आणि गेम ऑफ थ्रोन्स!

लेखक मालविका यांनी गुरुवार, 18/07/2019 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
तुंबाडचे खोत आणि गेम ऑफ थ्रोन्स! दोन्ही एकमेकांपासून पूर्ण वेगळे आणि तरीही माझे दोन्ही आवडते प्रकार. तुंबाडचे खोत हि कादंबरी जेव्हा मी पाहिल्यान्दा हातात घेतली तेव्हा तिचा आकार बघूनच धास्ती घेतली कि हि मी वाचून पूर्ण करू शकेन का? आणि जेवढा मोठा एक भाग तेवढाच मोठा दुसरा भाग. बाप रे! पण या पुस्तकाविषयी खूप काही ऐकलं होत, वाचलं होत,अगदी वाचण्यासारखं काही इत्यादी सदरातून या कादंबरीचा हमखास उल्लेख व्हायचा. जेव्हा मी हि कादंबरी वाचायला घेतली त्यानंतर मात्र भारावून जाऊन मी एकच काय दुसरा भाग देखील अधीरतेने वाचून संपवला.

पोहे कि शिरा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 18/07/2019 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
--------------- ती आता ६०+ आहे.... लग्ना नंतर काहि दिवसात लक्षात आले की हिच्यात एक १३-१४ वर्षाची परकरी पोरगी लपली आहे जी अत्यंत नाटकी व प्रचंड हट्टी आहे.. तिला कितिही समजावुन सांगीतले तरी ती गोष्टी तीला हव्या तश्याच करते.. मी रांगडा कारखान्यातला माणुस असल्याने फाडफाड बोलायचो जे पटत नाहि ते.... मात्र ति सारे शांतपणे ऐकायची..परीणामस्वरुप.... 'हा म्हणजे तिला फाडफाड वाट्ट्ट्ट्ट्टॆल तसे बोलतो.बोलायचा पोच नाहि त्याला...ती बिचारी गरीब नीमुटपणे ऐकुन घेते" अशी संबंधितात आपली प्रतिमा निर्माण करण्यात मात्र यशस्वी झाली.... बर त्या नाटकी हट्टी मुलिला खुष ठेवण्या साठी गाडगीळांचे दागीने...ऊंची ची साड्

मगं ! आज काय वाचताय ?

लेखक धर्मराजमुटके यांनी बुधवार, 17/07/2019 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे. तर मग ! आज काय वाचलं ?  पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी मराठी अनुवाद : सायली गोडसे प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त ---------------- द लास्ट माईल्स ही एका उदयोन्मुख फुटबॉलपटूची जीवन कहाणी आहे.