नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!!
नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!!
खरं सांगू का माझं नृत्यकलेवर खूप खूप प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही चित्रपटातील कलात्मक नृत्याविष्कार मला आकर्षित करतो. मला असं वाटतं की नृत्य म्हणजे केवळ पदंन्यास किंवा हस्ताविष्कार किंवा चेहेऱ्यावरील भाव दाखवणे नाही; तर केवळ एखाद्या बोलक्या डोळ्यांच्या अभिनेत्रीकडून फारशी नृत्यकला अवगत नसताना देखील एक अजरामर गीत आपल्याला मिळतं. हिंदी चित्रपटांमध्ये अशी अनेक अजरामर गाणी आणि मास्टर पिस आहेत की जे कधी त्यातील नृत्यामुळे तर कधी नृत्यांगनेमुळे सर्वश्रुत आहेत.
मिसळपाव