Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०१९ - झलक चौथी!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 22/08/2019 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
आख्ख्या जगाचा लाडका पाहुणा आणि सगळ्यांनाच आपलासा वाटणारा बाप्पा घरोघरी यायला जेमतेम दहा- बारा दिवस उरलेत. अमंगळाचा नाश करणाऱ्या विघ्नविनाशक गणरायाची आपण सगळेच वाट बघतोय. बाप्पाच्या आगत स्वागतासाठी सगळीकडे जोरदार तयारी सुरू असणार. इथे आपल्या मिपावरसुद्धा आम्ही, तुमच्याच मदतीने, गणरायाच्या स्वागताची एकदम जोरदार तयारी करण्यात गढलोय. एकदम म्हणजे काय, एकदमच गुंतून गेलोय कामामध्ये! सगळं वेळेत पूर्ण व्हायला हवं ना! पण पुन्हा कामात गढून जाण्याआधी तुमच्यासाठी ही आणखी एक किंचितशी झलक. तुम्ही ओळखू लागा बघू, कोणी काय लिहिलंय ते.

खय्याम ... एक आदरांजली

लेखक अमर विश्वास यांनी बुधवार, 21/08/2019 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
खय्याम ... एक आदरांजली जिस सुबह की खातिर जुग-जुग से, हम सब मर-मर के जीते हैं जिस सुबह की अमृत की धुन में, हम ज़हर के प्याले पीते हैं इन भूखी प्यासी रूहों पर, एक दिन तो करम फ़रमायेगी वो सुबह कभी तो आयेगी ... पडद्यावर राज च्या मिठीत हुंदके देणारी मला सिन्हा ... जणू आपल्या स्वत:लाच समजावणारा... भविष्याचे आशादायी चित्र उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा राज कपूर , साहिर चे बोचरे शब्द .. मुकेश चा आवाज ... यासगळ्याला संगीतही तसेच तोलामोलाचे हवे. खय्याम या कसोटीवर पुरेपूर उताराला. संपूर्ण गाण्यात कुठेवी तालवाद्य नाहीत. कारण तालावर ठेका धरायची ही वेळच नाही.

श्रावणसरी

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 21/08/2019 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
।। श्रावणसरी ।। भिजून गेल्या फांद्यांवरती, बसूनी सहजच गाती पक्षी, अलगद जाई वाऱ्यावरती, सप्तसुरांची मोहक नक्षी । सुईसारख्या चोचींमधुनी, दशदिशांना निरोप जाती साद घालती कोणा कळेना, दूरदूरची ओवून नाती । फुलांफुलांचे श्वास टिपुनी, दूरदूर हे वायू वाहती, परागमोहित किटक येऊनी, मकरंदाची गाणी गाती । वसुंधरा ही नटुनीसजुनी, पशुपक्ष्यांना ठेवी भुलवुनी, भेट घेण्या तिच्या नायका, सकलसृष्टीला जाई घेऊनी । त्यांस मिळाले निरोप नकळत, तरी अजुनी दर्शन नाही, एका सरीचीच मिठी देऊनी, पुन्हा पुन्हा तो निघून जाई। त्याच मिठीने शहारते ती, गर्भधारणी हरितमोहिनी, क्षणाक्षणांची प्रसवशालिनी, स्वर्गसुंदरी ओजमानिनी । ऐश्वर्

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३५

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 21/08/2019 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
भरलेली सभा! मान्यवर आसनस्थ होते. द्रोणाचार्य उठले तेव्हा सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. स्पर्धा काय असेल, यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. "ही स्पर्धा समजा अथवा गुरु आज्ञा, पण माझ्यासाठी ही गुरुदक्षिणा असेल!" मुठीत धरून सगळे ऐकत होते.... "तुम्हाला पांचाल नरेश द्रुपद राजाला हरवून त्याला बंदी बनवायचे आहे." दुर्योधनच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. 'राजाला हरवायचे आहे? .....आणि हे पांडव स्पर्धा जिंकतील ? हे पाच जण?' त्याला हसू आले. 'ही गुरुदक्षिणा तर आम्हीच देणार तुम्हाला, गुरु द्रोण!

N.H.4 (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 20/08/2019 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र बरीच चढली होती. चंद्राची छोटीशी कोर आकाशात चमकत होती. अंधार दाटून आला होता. रात किड्यांच्या किर्र आवाजाने वातावरण भारून गेल होत. आणि या शांत वातावरणात त्याचा ट्रक वेगाने पुढे जात होता. पुणे राष्ट्रीय महामार्गावरून त्याचे येणे जाणे नित्याचे असल्याने, ट्रक चालविताना तो बेफिकीर होता. त्याच्या चेहर्‍यावरून तो बेफिकीरपणा जाणवत होता. शांत शीळ वाजवीत गाडीचे गोल स्टेअरिंग त्याने पकडले होते. स्टेअरिंग डावी  उजवीकडे वळवताना त्याला मजा वाटत होती. तो मजेत वाहने चुकवित वेगाने मुंबईकडे निघाला होता. अठरा- एकोणीस वर्षाचा त्याचा क्लिनर बाजूच्या सीटवर घोरत पडला होता.

नभ मेघांनी आक्रमिले

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 20/08/2019 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझे बोटीवरचे अनुभव तुमच्याबरोबर शेअर केले. माझी मुलगी पुनव वैमानिक झाल्यामुळे (स्वीट टॉकरीणबाईचा 'पहिली फ्लाइट - जरा हटके! हा लेख तुम्ही वाचला आहेच.) तिचे अनुभव आणि या नव्या विश्वाबद्दल वेगळी माहिती माझं जीवन समृद्ध करत आहे. वेळोवेळी मी तुमच्याबरोबर शेअर करीन. वैमानिकाच्या जॉबला ग्लॅमरचं वलय फक्त 'बाहेरच्यांना' दिसतं. स्वत: वैमानिकाला मात्र त्या आयुष्याचे वेगवेगळे आयाम अनुभवायला मिळतात आणि सोसायला लागतात. जर वैमानिक स्त्री असेल तर जास्तच. त्यात ग्लॅमरला अजिबात स्थान नसतं! प्रत्येकाच्या शरीराला एक ताल असतो.

मंदीत संधी

लेखक रानरेडा यांनी मंगळवार, 20/08/2019 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
मंदीत संधी लेखक हेमंत वाघे. मी दुबईला जंबो इलेक्ट्रोनिक्स म्हणून कंपनीत काम केले होते . हि मनु छाब्रिया म्हणून एक अत्यंत श्रुड आणि धाडसी माणसा ने स्थापन केलेली कंपनी होती ,( मी होतो तेंव्हा तो मेला होता ) हा मनु कर चुकवून दुबईला पळाला होता व तिकडून तो त्याच्या भारतातील काही कंपनी चालवायचा ! ( तो दुबई मध्येच मेला ) त्याची एकदा एका अति सिनिअर स्टाफ ने त्याची गोष्ट सांगितली होती . जंबो इलेक्ट्रोनिक्स हा सोनी जंबो चा फार फार मोठा डिस्ट्री ब्युटर होता ( बहुदा जगातील सर्वात मोठा ) आणि मोठ्या कम्पनी प्रोडक्शन प्लान करताना डिस्ट्री चा सल्ला घेतात .

काल्पनिका

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 20/08/2019 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पक : एक काल्पनिका. भगवान ब्रह्मदेवास एकदा घाईघाईने पृथ्वीवर जायचे होते. एका पुण्यात्म्याच्या महानिर्वाणाचा मुहूर्त जवळ येत होता, त्याला सन्मानाने स्वर्गलोकी आणण्याचे काम इंद्रदेवाने ब्रह्मावर सोपविले होते. सारी तयारी करून ब्रह्मदेव विमानतळावर आले. पुष्पक तेथे सज्जच होते. ब्रह्मदेव विमानात बसले आणि सारथ्याने पुष्पकाची आरंभकळ दाबली. पण दुर्दैव. विमान सुरू झालेच नाही. गरूडही गप्प उभा होता. चालकाने पुन्हा प्रयत्न केला. तोही फसला. खूप वेळा प्रयत्न करूनही पुष्पक स्टार्ट होत नसल्याने वैमानिक हताश झाला. ब्रह्मदेवही काळजात पडले..

द सियालकोट सागा

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 20/08/2019 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.

.. शी मस्ट बी राइट !

लेखक उन्मेष दिक्षीत यांनी सोमवार, 19/08/2019 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार रात्र स्थळ :- घर (आमचं) ..... ती : नाही! मी चालले आहे झोपायला, तुझं संपलं की ये. मी : थांब की. ११ वाजलेत फक्त ती : ....... मी : ओके, जा ------------------------------------------------------------ साधारण १५ मिनिटांनी, मी (डिश हातात) : श्रद्धा ss.. !? ती : काय ? मीठ कुठाय ? मिळत नाही आहे ! .... , इकडं ये जरा.. ती आली. मी : थांब जरा, तुला आता डेमो दाखवतो, दर वेळी नेमकं काय होतंय वस्तू शोधताना ते बघ आता (आमच्या श्रद्धाचा वस्तूंच्या जागा बदलत राहणे हा एक छंद म्हणा, किंवा "स्थायी" भाव म्हणा, तो आहे ) मी (ड्रॉवर उघडत ) .. हे बघ, इथं ? नाहीये. (कट्ट्यावर ) इथं? नाहीये ..