Skip to main content

पोळ्यानिमित्त...

लेखक फुटूवाला यांनी शनिवार, 31/08/2019 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर कालच या आठवणींना उजाळा आलेला पण इथं लिहायचं राहून गेलं. लहानपणी म्हणजे ४त असताना आमच्या घरी जानी गाय होती. माझ्या गावापासून ११ किमीवर बहिणीचे गाव होते. त्यांच्याकडे दुभते जनावर नसल्याने वडिलांनी त्यांना दिलेली. पण गाय इतकी खतरनाक होती की चुकून जरी सुटली तर थेट माझ्या घरी पोहोचून जायची. तीच वासरू नसताना सुद्धा. तीनचार वेळा असं झाल्यावर राहूदे म्हणून नंतर तिकडे पाठवलीच नाही. नंतर तिने एका खोंडाला जन्म दिला. आम्ही त्याच नाव दगड्या ठेवलं. शाळेत दुपारी १२ वाजता १५ मिनिटाची सुट्टी असायची तेव्हा मी येऊन त्याला वैरण हिबाळून पळायचो. दुपारी जेवायच्या सुट्टीत त्याला वैरण+पाणी.

मनिषा

लेखक तमराज किल्विष यांनी शनिवार, 31/08/2019 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
मनिषा मनिषा म्हणजे मनी माझ्या जवळच्या नात्यातील मुलगी. गोरीपान, हसली की गालावरची खळी फार सुंदर दिसायची. त्यात तिच्या दातावर एक दात आलेला आणि वरच्या ओठावर उजव्या बाजूला मोठासा तिळासारखा ठिपका. काळेभोर डोळे नि काळेभोर लांबसडक केस. माझ्या पेक्षा वयाने सहा-सात वर्षे लहान. असेच एकदा कोणीतरी वडीलधारे म्हणाले यांची जोडी छान दिसेल. हे ऐकून ती इतकी सुंदर लाजली की बस. मलाही ती आवडत होतीच, पण आता मनोमन मीही तिला आयुष्याचा जोडीदार मानायला लागलो. कधी तिच्या घरी जाणं झालं तर लाजून हसायची , पण बोलायची मात्र मुळीच नाही. माझ्या वाऱ्यालाही थांबायची नाही. ती जवळ येताच माझ्या हृदयात धडधड वाढायची.

मंदीतली पौर्णिमा...।

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 30/08/2019 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
पश्चिमेला पौर्णिमेचा चंद्र शाळेत पाय घासत जाणाऱ्या उत्साही मुलांसारखा रेंगाळत होता. समोरून पूर्वेकडे भास्करजी वेळेआधी हजर राहणाऱ्या , डोळ्यांनी सकाळपासूनच आग ओकणाऱ्या मुख्याध्यापकांसारखे घाईघाईने उगवत होते. चंद्राला अजून आभाळातच ढगांवर लोळायचे होते. एखाद्या समारंभाकरता शाळेत रंगीत कपडे घालून येण्याची परवानगी असते तो दिवस मुलांमुलींकरता फारच संस्मरणीय असतो तशीच काहीशी मनःस्थिती महिन्यात एकदाच संपूर्ण कलांनी झळकणाऱ्या चंद्राची होती.

मक्याच्या दाण्यांची भाजी

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी शुक्रवार, 30/08/2019 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : सोपी पण चविष्ठ अशी होते ही भाजी. मी आजच केलीये. म्हणून शेअर करते आहे. पटकन आणि छान होणारी. मक्याचे काढलेले दाणे, नेहमीचे फोडणीचे साहित्य, चणाडाळीचे पीठ, एक मध्यम चिरलेला कांदा, वाटलेले ओले खोबरे, मीठ. काढलेले मक्याचे दाणे मिक्सरला जर्रा फिरवून घ्यायचे. जास्त फिरवले तर लगदा होतो. नुसतं एकदोनदा फुर्र फुर्र केलं तरी पुरे. एका दाण्याचे चार तुकडे होतील इतपत भरड करायचे. जर जास्त पीठ झाले तर भाजीचा बेत कॅन्सल करून उपमा करावा. फिरवताना पाणी घालायचं नाही. थोडं पाणी वाटताना सुटतं. तेवढं पुरे. फिरवून घेतलेले दाणे कुकरला लावायचे. मी वरण भातावरोबरच लावते तिसर्‍या पुडात.

सफर लडाखची भाग २- द्रास आणि रक्षाबंधन

लेखक हकु यांनी शुक्रवार, 30/08/2019 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
१७ ऑगस्टच्या सकाळी लेह ला निलेश च्या घरी उतरलो. निलेश नुब्रा व्हॅली मधल्या प्रतापपूरला गेला होता. तो दुपारी आला. पहिला दिवस पूर्णपणे झोपण्यात आणि निलेश शी गप्पा मारण्यात मजेत गेला. समुद्रसपाटीपासून जवळजवळ साडेअकरा हजार फूट उंचीवर असल्यामुळे लेह च्या हवेत प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन ची कमतरता आहे. जसजसं उंच जाऊ तसतसं हवेतलं प्राणवायूचं प्रमाण कमी कमी होत जातं. त्यामुळे अश्या ठिकाणी नवख्या व्यक्तीला मळमळ, चक्कर येणे, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे निदान २४ तास तरी पूर्णपणे आराम आवश्यकच असतो. आपल्या शरीराला तिथल्या हवेशी जुळवून घ्यायला हा एवढा वेळ द्यावा लागतो.

श्रावणातल्या कहाण्या

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 30/08/2019 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणातल्या कहाण्या आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार! या शुक्रवारची आणि श्रावणातल्या रविवारची आठवण कायम मानत घर करून आहे; श्रावणामध्ये घरच्या देवांची पूजा झाल्यानंतर आजी दर शुक्रवारी जीवत्यांची पूजा करून त्यांची कहाणी वाचायची; आणि रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी वाचायची. या कहाण्या ऐकायला  घरात असणाऱ्या सर्वांनी बसलंच पाहिजे असा तिचा नियम होता. मी, भाऊ, बाबा, आई एवढंच नाही तर अगदी आमचे माळी मामा, ड्रायव्हर दुबेजी, घरी कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई सर्वांना हातावर तांदळाचे तीन दाणे घेऊन देवासमोर बसायला बोलावलं जाई.