Skip to main content

थुंकणार्‍याची मानसिकता

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 13/12/2019 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक व्यापारी संकुल, सरकारी कार्यालये या सारख्या इमारतींमधे आपण जिन्याच्या कोपर्‍यात,लॉबीच्या कोपर्‍यात, लिफ्ट मधे कोपर्‍यात अशा ठिकाणी लोक थुंकलेले दिसतात.अगदी सुसंस्कृत गृहसंकुलात देखील ही दृष्य कधी कधी दिसतात. पानटपरीच्या आसपास तर विहंगम दृश्य असते. ’रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून’ हे कवीला अशी दृष्ये पाहूनच सुचले असावे. पान गुटका तंबाखू वगैरे खाउन किंवा न खाताही थुंकणार्‍या लोकांचे प्रमाण भारतात खूप मोठे आहे. परदेशातून आलेल्या पाहुणे हे जेव्हा पहातात त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या देशाची प्रतिमा अत्यंत मागासलेला देश अशी होते.

गावाकडची मजा-बालकथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 12/12/2019 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडची मजा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मी गावाला चाललो होतो. एसटीमधून. डुलक्या घेत. पण माझ्या मनाला त्या अर्धवट झोपेतही बरं वाटत नव्हतं . तुम्ही म्हणाल,गावाला जायचं म्हणजे मजाच की ! मी गावाला चाललो होतो, ते सहल म्हणून नाही. मजा म्हणून नाही. तर कायमचा ! मी पुण्यासारख्या शहरात राहत होतो . माझी शाळा , माझे शाळेतले मित्र, माझे वाड्यातले मित्र या सगळ्याला मी आता मुकणार होतो. अन गावाकडे ?... काय माहिती ! मी गावाला पहिल्यांदाच चाललो होतो.

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/12/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.

(विरह - एक वेगळा दृष्टीकोन X शब्दकथा) -

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 12/12/2019 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा रात्रीचे तीन वाजले होते, त्याच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती. बायकोची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला....., अजून का बरे फोन नाही आला? नक्कीच फ्लाईट डिले असणार.... कारण आपली बायको आपल्यावर किती जास्त प्रेम करते हे त्याला माहीत होते. किती काळजी करतो आपण? काही नाही येईल नक्की फोन.....

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग ३

लेखक अहम्_लिखामि यांनी गुरुवार, 12/12/2019 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले भाग प्रकाशित केलेले आहे भाग ३ या अश्या गोकुळात ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही ८ भावंडं जमायचो. दुपारी बदाम सात चा कार्यक्रम ठरलेला असायचा, हरेल त्याने ४ वाजता येणारी कुल्फी खाऊ घालायची. खाऊ घालायची म्हणजे काय तर स्वतः सगळ्यात शेवटी खायची सगळ्यांना आणून दिल्या नंतर कारण पैसे तर आजोबाच द्यायचे. या बदाम साथ च्या खेळात माझ्या सारख्या प्रामाणिक खेळाडूंना जिंकायचा काहीही मार्ग नव्हता हे मला कळले जेंव्हा मोठ्या मामीच्या चटई खालून २ राजे अचानक बाहेर आले. तो पर्यंत राजा आला कि सगळ्यांना कळेल कि अश्या पद्धीतींनी मोठ्यांनी आवाज काढायचा असाच वाटायचं.

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग २

लेखक अहम्_लिखामि यांनी गुरुवार, 12/12/2019 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग प्रकाशित केलेला आहे तर हे माझ्या आजीचं घर नेहमी गजबजलेले असायच, मामा, मामी, २ मामे भाऊ असा सतत वावर असायचा. मी आणि धाकटा भाऊ citizens नसलो तरी permanent residency visa वर असायचो. मामी आणि आई दोघीही नोकरी करत असल्यामुळे, दिवसभर आमचा पसारा उचलायला आजीच असायची. आम्ही चौघेही वेगवेगळ्या कारणांमुळे आजी च्या fav लिस्ट मध्ये होतो. मोठा मामे भाऊ पहिला "नातू" म्हणून कौतुकाचा, मग मी काळी बेंद्री असली तरी शांत आणि खूप पुस्तकं वाचते म्हणून, धाकटा मामे भाऊ मृदू स्वभावाचा म्हणून (मोठ्यानि नाकात नऊ आणले कि हा भाऊ देव वाटायचा मला पण) आणि माझा भाऊ शेंडेफळ नातू, म्हणून भाव खाऊन जायचा.

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग १

लेखक अहम्_लिखामि यांनी गुरुवार, 12/12/2019 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
तितली रानी तितली रानी मुझको दे दो अपने पर पर लगाके उड जाऊंगी अपनी नानी के घर मुलगी हे म्हणायला लागली आणि मला आईच्या घराच्या ऐवजी माझ्या नानीचं घर आठवायला लागलं. लहानपणीच्या खूप आठवणी या औरंगाबाद मधल्या घरा भोवती आहेत हे जाणवल. माझ्या आजीचं नाव विमल आणि आजोंबांचं नाव वासुदेव म्हणून घराचं नाव गोकुळ असा ठेवलेलं आणि नाव पुरक असायला पाहिजे म्हणून कि काय पण वासुदेवांना ८ नातवंड. (या हिशोबानी माझ्या दुसया आजोंबांच्या घराचं नाव हस्तिनापूर असायला पाहिजे होतं कारण तिकडे आम्ही ५ जण. असो.) तर गोकुळ हे त्या वेळेस च्या पद्धती प्रमाणे मोठ्या जागेवर बांधलेलं ऎसपैस घर.

रसरशीत बालुशाही ...

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 12/12/2019 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकर्स , खूप दिवसांनी पाककृती विभागात लुडबुड करण्याचा योग आला ,थोडं भीत- भीतच ही रेसिपी बनवण्याचं धाडस केलं होत.

"पोर"खेळ

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी बुधवार, 11/12/2019 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल गावांची शहरे झाली, घरांच्या इमारती झाल्या, कौले जाऊन स्लॅब आला आणि जग कुठच्या कुठे गेले. पण, काहीही बदलो, चिमुलवाडा आणि त्यातली माणसं मात्र जशीच्या तशी उरलीयेत. दारातल्या गावठी कुत्र्याची चेन आता लॅब्राडोरच्या गळ्यात, तर माऊ, काळूच्या जागी पर्शियन मांजरांनी शहरात ठाण मांडले आहे. आता हे जुन्या गावचे सगळे मोती, टॉम वा माऊ, काळू चिमुलवाड्याचे आश्रित झालेत! आजूबाजूचे गावकरी आता शहरवासी झाले असले, तरी आमच्या चिमुलवाड्यावर घरे आणि देवळे यांखेरीज आणखी कुठलीही वास्तू कोणास दृष्टी पडायची नाही. कोणा बिल्डर लोकांची अजून चिमुलवाड्यावर नजर पडली नाही ही त्या देवकीकृष्णाची मेहेरबानीच म्हणावी लागेल!

"तो" आणि "ती"

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी बुधवार, 11/12/2019 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबर महिन्यातल्या कडक उन्हाचे दिवस होते. म्हाळ महिना चालू होता. परोब काकांकड़े आज म्हाळ करण्याचे ठरले होते. देवळातल्या साधले भटास लागणारे साहित्य आणि बाकी भट आणण्याची जबाबदारी दिली होती. घरात सगळीकडे लगबग सुरु होती. घराच्या उजव्या बाजूला, परसात ४ चुली तयार होत्या. कुमार मिलिंद त्यात जाळ करण्यासाठी घरातल्या शेगडीवरून पेटती कट्टी झेलवत झेलवत आणत असता त्यातील एका किटाळाणे साधले भटाने आणलेल्या एका भटाच्या धोतराला खिंडार पाडून खळबळ माजवली. धोतर पेटायच्याच मार्गावर होते !