बोलती बंद
- डॉ. सुधीर रा. देवरे
चाळीसगावच्या काकांना फोन करावा, असं मला दोन तीन दिवसांपासून वाटत होतं. असं अचानक आठवण येण्याचं कारणही समजत नव्हतं. आज रविवार. वेळ आहेच आता दुपारी तर करूया फोन असं वाटून फोन लावला. रेकॉर्ड ऐकू आली, ‘या नंबरची सेवा तात्पुरती बंद आहे.’ दोन तीन वेळा प्रयत्न केला. तेच तेच ऐकू यायचं. आधी मराठी मग हिंदी नंतर इंग्रजी. नंबर बंद. करू नंतर म्हणून डोक्यातून विषय बाजूला केला.
यालाही दोन तीन दिवस झाले म्हणून पुन्हा एका संध्याकाळी फोन करून पाहिला. आताही नंबर बंदच. बायकोला सांगून ठेवलं, ‘चाळीसगावचा फोन लँडलाईनवरून ट्राय करत रहा.
मिसळपाव