Skip to main content

सनकी भाग ७

लेखक शब्दांगी यांनी बुधवार, 22/01/2020 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
काया ऑफिस मध्ये गेली तिने फेंट गुलाबी कलरचा शॉर्ट असा वनपीस घातला होता. तो ड्रेस तिला खुलून दिसत होता. ती कॅबिनमध्ये जाऊन बसली ना बसली तो पर्यंत इंटरकॉम फोन वाजला तिने जरा वैतागुणच तो उचलला. रिसेप्शनिस्टने सांगीतले की रिचा सरनाईक मिटिंगसाठी आलेत मॅडम. कायाने तिला पाठव असे सांगीतले. रिचा नॉक करून कायाच्या कॅबिनमध्ये गेली.काया रिचाला नखशिखांत न्याहाळत होती. रिचाने स्काय ब्लू कलरचा शर्ट व नेव्ही ब्लु कलरचा मिनी स्कर्ट घातला होता. तिचे गोरे पाय अगदी उठून दिसत होते. लांब सडक केस गालावर रूळत होते. तिने केलेला लाईट मेकअप तिचा चेहरा आणखिनच खुलवत होता.

एक उनाड भटकंती (सुरुवात)

लेखक श्वेता२४ यांनी बुधवार, 22/01/2020 17:00 या दिवशी प्रकाशित केले.



आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आलेल्या बाळानुसार आपण आपले सर्व आयुष्य जुळवून घेतो. झोपणे,उठणे, खाणे , पिणे या सर्वांबरोबरच अजुन एक बंधन येते ते फिरण्यावर. कुठेही जायचे म्हणले की, बाळाचा जामानिमा सोबत घेऊन जायचा कंटाळा येतो. शिवाय त्याला अंगावर घेऊन फिरायला लागते त्यामुळे हात दुखतात ते वेगळेच.



बोर्डाची परीक्षा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 22/01/2020 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
बोर्डाची परीक्षा बालकथा - वयोगट मोठा -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मँगो मस्तानी पिताना माझ्या डोळ्यांत पाणीच आलं !... तुम्ही म्हणाल कसं काय ? मँगो मस्तानी तिखट होती का तिचा घोट घेताना ठसका लागतो ? थांबा , तुम्हाला अख्खी स्टोरीच सांगतो. दहावीची प्रिलिम झाली , रिझल्ट लागला आणि मी स्वतःच दचकलो. मला पासष्ठ टक्के पडले होते. फक्त. तसे ऐंशीपर्यंत पडायला हवे होते. तेवढा मी आहे बरं का ! हे झालं माझं . पण आमचे बापूसाहेब !

दोसतार - ३४

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 22/01/2020 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही सगळे शिक्षक होऊन शाळा चालवणार. वैजुच्या सूचनेचे टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत केले. मस्त कल्पना होती. सगळ्यानाच आवडली. कोणी कोणता तास घ्यायचा याच्या सूचना येवू लागल्या. माधुरी गाण्याचा तास घेणार होती. आपी गणीताचा, सुधीर इंग्रजीचा, अजित इतिहासाचा, महेश भौतीक शास्त्राचा. टम्प्याने तर आपण शाळेची तास संपल्या नंतरची घंटा वाजवणार असल्याचे जाहीर केले. शाळा सुटे पर्यंत आठवी ब चा अर्ग त्या दिवशी शाळा चालवणर असल्याचे सर्व शाळाभर झाले होते.
शिक्षक दिन पुढच्या आठवड्यात होता. मुख्याध्यापक सरांनापण ही कल्पना आवडली.

भाग ९ अंधारछाया प्रकरण ८. समजा मीच या फुल्या काढायचे ठरवले, घरात कोणी नसताना! तर मी काय करेन? ठीक आहे, काजळाची डबी घेतली. कशाने काढेन मी अशा फुल्या? काहीतरी काडी बिडी हवी! येस काड्यांची पेटी हवी!

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 21/01/2020 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारछाया भाग ९ - प्रकरण ८

अंधारछाया

आठ मंगला कॅलेंडरचा नोव्हेंबर महिना फाडला. बेबीला येऊन आता दोन आठवडे झाले. डिसेंबरचे एकतीस दिवस. डिसेबर महिन्याचे पान फाडून नवे कॅलेंडर लावीन तेंव्हा काय झाले असेल? करायला घेतलंय हे आपण, पण निभेल ना असे मनात सारखे वाटे! मग ह्यांनी सांगितल्याचे आठवे. ‘मंगला, एक लक्षांत ठेव आपण तिच्या चांगल्यासाठीच करायला जातोय ना मग होऊ दे काहीही. तू सर्व भार स्वामींच्यावर सोपव. जपावर विश्वास ठेव.