तिरुपती दर्शन भाग ३
दिवस ६/०३/२०२०
सकाळी ६ वाजण्याच्या ठोक्याला तिरुपती स्टेशन वर आमच्या गाडीचे आगमन झाले. प्रचंड अशा गर्दीमधून वाट काढत आम्ही स्टेशन च्या बाहेर पडलो. आमच्यातील दोघा तिघांनी तिरुमला येथे पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सगळ्यांनीच पायी जायचे असे निश्चित केले. आमच्या रूमचे कोणतेही बुकिंग नव्हते, रूम खाली तिरुपती येथे करावी की वरती तिरुमला येथे करावी हे काही ठरत नव्हते.
मिसळपाव