प्रिंटर आणि मी!
माझं आणि प्रिंटरचं काय वैर आहे माहिती नाही.पण मी प्रिंट दिली अन प्रिंटरजवळ गेल्यावर ती आलेली दिसली असं कधीच होत नाही. त्या लॅनचा तरी प्रॉब्लेम असेल किंवा आतमध्ये आधीपासूनच कागदं तरी अडकलेले असतील किंवा प्रिंटर हँग तरी झालेलं असेल! एकतर मी बसतो तिथून प्रिंटभर कोसभर लांब आहे. अश्यावेळी आपण दहा-बारा प्रिंट्स देऊन प्रिंटरजवळ गेल्यावर तो मक्ख चेहऱ्याने आपल्याकडे बघताना दिसला की माझा तिळपापड होतो.
"अरे बाबारे, कंपनीत आम्ही आहोत ना मक्ख, आम्ही आहोत ना मठ्ठ !! तुला काय गरज आहे माणसात यायची !"
आता हे रोजचंच असल्यामुळे सवय झालीये. पण कधी कधी आपल्याला जेन्युईन अर्जन्सी असते.
मिसळपाव