Skip to main content

खरा गुन्हेगार (एक रहस्य कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 29/06/2020 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
खरा गुन्हेगार (एक रहस्य कथा) मी केतन!  केतन देशमुख. आज मी पूर्णपणे तटस्थ राहून, ती घटना सांगणार आहे. ना मला कोणाबद्दल आकस आहे. ना कोणाबद्दल ममत्व. या घटनेत गुंतलेल्या प्रत्येक पात्रापासून मी एकदम अलिप्त आहे. तसे ते मला परके आहेत, पण व्यावहारिक पातळीवर मात्र ते माझे मालक आहेत. मी त्यांचा पूर्णवेळ कामगार आहे. त्या पात्रातील एकाचा खासगी ड्रायवर असल्यामुळे, त्यांचा आणि माझा खूप जवळचा संबंध आलेला आहे. ते ऐकून चौघे आहेत. आणि त्यांचे निःपक्षपातीपणे परीक्षण करणारा मी चौथा आहे. खरतर त्यांचा मी खासगी ड्रायवर असलो तरी, त्यांच्या खासगी गोष्टीत नाक खुपसण्याचा मला बिलकुल अधिकार नाही.

व्हिलेज डायरी

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 29/06/2020 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
इतरवेळी करतो तसा जनरल डब्यातून कोकणरेल्वेचा प्रवास यावेळी मुददामून टाळला, हा इतरवेळचा प्रवास म्हणजे धावत जात गाडी पकडणं नव्हे किमान कोकणरेल्वेसाठी तरी नाही….म्हणजे अजून इतरवेळचा प्रवास म्हणजें काय तर….इथं जर रात्री अकराची मंगलोर गाडी आणि त्यातही जनरल डबा ठाणे रेल्वेस्टेशनवरुन पकडायचा असेल तर लोक नंबर कधी लावतात फॅल्टफार्म नंबर पाच वर…… आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता….

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १८ - पुनर्जन्म

लेखक मूकवाचक यांनी सोमवार, 29/06/2020 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात पुनर्जन्माविषयीचा रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: देहाचा मृत्यु झाल्यावर जीवात्म्याची (individual soul) गती पुढे कशी असते या विषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यासाठी बहुतांशी सगळ्याच धर्मांनी आपापल्या सिद्धांतप्रणालींची निर्मिती केल्याचे दिसून येते.

मला भेटलेले रुग्ण - २२

लेखक डॉ श्रीहास यांनी रविवार, 28/06/2020 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १७ - विश्वनिर्मिती संबंधित सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 28/06/2020 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणापासून 'अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह' हा विभाग सुरू होतो. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात विश्वनिर्मिती संबंधित विविध सिद्धांतप्रणाली तसेच जगाच्या सत्यत्वाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: अध्यात्मिकतेशी संलग्न असलेल्या सैद्धांतिक प्रणालींमधे रमण महर्षींना 'न के बराबर' इतकेच स्वारस्य होते. 'स्व' विषयीचे सजग भान जागृत ठेवणे ही साधकांच्या जीवनातली सर्वोच्च प्राथमिकता व्हावी ही एकमेव गोष्ट महर्षींच्या दृष्टीने सगळ्यात मोलाची होती.

गुलाबी कागद निळी शाई....3 मायना

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 28/06/2020 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कागद निळी शाई..2 काहूर Hi.. कसला स्मार्ट आहेस तू. ओळखशील आणि तेही इतक्या पटकन, असं वाटलंच नव्हतं. अर्थात खूप आत कुठेतरी तू ओळखावं असंही वाटत होतंच म्हणा! U know? माझ्या आयुष्यातील हे पहिलं पत्र, तू पाठवलेलं. आणि तेसुद्धा प्रिय न all असं सगळं लिहिलेलं. (मायना म्हणतात नं त्याला??) So cute! तुझी presentations सुद्धा इतकी मस्त असतात ना. इमेल सुद्धा( btw आत्ता सुचलं म्हणून सांगतेय, आपण एकमेकांना पत्रच लिहायची, email ping WhatsApp वगैरे काही नाही. चालेल?? सॉल्लिड मज्जा येईल ना?) तर काय सांगत होते?

ती आली तर

लेखक मनोज यांनी शनिवार, 27/06/2020 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
रंग किती गगनात पसरले ती आली तर मेघ कसे हलकेच बरसले ती आली तर उभा असा मी बस थांब्यावर जाण्यासाठी कुठे जायचे तेच विसरले ती आली तर नजर अशी नजरेस मिळाली जादू झाली भले भले ते ना सावरले ती आली तर मंजुळ संगीत अवचित कसे ऐकू आले पैंजण छनछन तिचे वाजले ती आली तर मी रसिक फारसा नाही ती दाद द्यायला वाह का आपसूक उमटले ती आली तर मोहक मुखडे तिच्या सारखे किती पाहिले का क्षणभर ते हृदय थांबले ती आली तर

दोसतार - ५७ ( अंतीम भाग)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/06/2020 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री झोपताना बरेच वेळ झोपच येत नव्हती. डोळे मिटले की डोळ्यासमोर मुलांनी गच्च भरलेले मैदानच येत होते. मॅच हरलो तरी खूप मजा आली. मुख्याध्यापक सरांनी सहावी ब आणि आमच्या टीमला त्यांच्या घरी चहा चे निमंत्रण दिले. सर्वांचे अभिनंदन केले. पुढचे बरेच दिवस मॅच शिवाय वर्गात दुसरा विषयच नव्हता.
मागील दुवा http://misalpav.com/node/47081 वार्षीक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला की पुन्हा एकदा यवतेश्वराची सहल करायचीय. सगळ्यांना घेऊन. एल्प्या टंप्या योग्या राजा मंदार , महेश आंजी , गौरी , संगीता , दाम्या , अज्या , सुन्या सगळ्यांनी जायचय.

((मित्र घरी जायला निघतो तेव्हा))

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 26/06/2020 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थातच इथुन मित्र घरी जायला निघतो तेव्हा, अगदी शेवटचा म्हणुन ठेवलेला पेग..सगळाच्या सगळा..एका दमात पिऊन टाकतो..

जब I met मी :-3

लेखक Cuty यांनी शुक्रवार, 26/06/2020 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी घरात सर्व मुलांमध्ये मोठा. माझ्यामागे पाठच्या दोन बहिणी आणि सर्वात धाकटा भाऊ. वडिल कामगार. त्यामुळे परिस्थिती बेताचीच. त्यामुळे थोडा जाणता होताच जबाबदारीची जाणीव होऊ लागलेली. मग फक्त अभ्यासावरच सर्व लक्ष केंद्रित केलेले. त्यातून पहिल्यापासूनच शाळेत हुशार असल्याने, मार्क्सही चांगले पडत गेले.बारावीनंतर चांगल्या साईडला अॅडमिशन मिळाले, तेही फ्री सीट मध्ये. माझ्या शिक्षणाचा म्हणावा असा काहीच खर्च आला नाही. नंतर कर्ज काढून उच्चशिक्षणही पूर्ण केले. नोकरीला लागून दोन वर्षातच मी सर्व कर्ज फेडले. तोपर्यंत बहिणी लग्नाच्या झाल्या होत्या.