सुंदर महाराज
**********************
गल्लीतल्या त्या साईमंदीराच्या पुढच्या बाजूच्या बैठया चाळीत बाजूने मोठासा नाला जातो…. सततचा बगळ्याचा वावर एखादया ओढयाला लाजवेल असा… सतत पाणी वाहत असतं निवातं….. इतकं असूनही त्या परिसरात कधीही मच्छर, डास यांचा त्रास जाणवत नाही, का तर? कारण एकच, तिथं कधीही कोणत्याही वेळी धुपारे घालणं चालू असतं. कोण करतं हे? सुंदरमहाराज. इतरवेळी मस्त शर्ट-पॅन्ट घालून स्कूटीवरुन अख्खं मुंबई शहर फिरणारे पण मग संसारासाठी रोजगार आवश्यक, त्यामुळे जशी सूर्याची पाठ फिरली की भगवी लुंगी नेसत घरात प्रवेश करत आपल्या कामाला लागतात.
गूगल फोटोज वरून फोटोंचा बॅकअप कसा घ्यावा.
तुम्हाला फोटो काढायला आवडतात?
तुमच्या अँड्रॉइड किंवा आपलं फोनमध्ये काढलेले फोटोज कायम स्वरूपी आपल्यासोबत राहावेत असे तुम्हाला वाटते?
तुमचा फोन हरवला/खराब झाला तर हे सगळे फोटोज कसे मिळवायचे हा प्रश्न तुम्हाला पडतो का?
तुम्ही तुमचा फोन बदलला तर तुमचे महत्वाचे फोटो नव्या फोनमध्ये कसे घेता येतील?
या सगळ्या प्रश्नांवर उत्तर म्हणून गूगलचे एक ऍप आपल्याला वापरायचे आहे आणि आज आपण त्याच ऍप बद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊया Google Photos Backup च्या मदतीने हे कसे शक्य आहे या प्रश्नांची सोपी उत्तरे.
स्मृतीची पाने चाळताना: चार
आयुष्यातील बराचकाळ गावमातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या नितळ सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. पाऊस हळवा कोपरा धरून हृदयात विसावलाय. कधी धोधो कोसळणारा, कधी रिमझिम बरसणारा, कधी चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले.
पुस्तकांची मांदियाळी
- डॉ. सुधीर रा. देवरे
अलीकडे प्रचंड प्रमाणात पुस्तकं प्रकाशित होत असतात. अगदी तालुक्याच्या ठिकाणी आणि गावागावातही रोज अनेक प्रकाशन संस्था स्थापन होत असूनही त्या कमी पडतात म्हणून अनेक लेखक (लिहिणारा तो लेखक या अर्थाने) स्वखर्चाने आणि स्वत: स्थापन केलेल्या प्रकाशनाच्या नावाने पुस्तकं प्रकाशित करत आहेत. नक्की आकडा सांगता येत नसला तरी महाराष्ट्रात रोज कमीतकमी पंचवीस पुस्तकं प्रकाशित होत असावीत. या हिशोबाने महिण्याला सातशे पन्नास तर वर्षाला नऊ हजार पुस्तकं प्रकाशित होत असावीत. इतकी पुस्तकं कोणताही एक वाचक वाचू शकत नाही.
हागिया सोफियाचे निमीत्त
येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन आहे. त्या निमीत्ताने बर्याच जुन्या गोष्टी उगाळणे होईल. त्यात एक तुलना तुर्कस्थानातील ताज्या हागिया सोफिया धर्मस्थळ घडामोडीशी करण्याचा मोह अनेकांना आवरणार नाही आहे.
काय आहे हे हागिया सोफिया प्रकरण ?
एका वाक्यात सांगायचे झाले तर, एक मूळचे प्राचिन ख्रिश्चन धार्मिक स्थळ ज्याचे एका मध्ययुगीन तुर्कस्थानी आक्रमक सत्तेने उघड हडेलहप्पीने मस्जिदीकरण केले, जे सेक्युलर दबावाखाली मागची ८६ वर्षे संग्रहालय स्वरुपात होते ते मस्जिदी ऊपयोगास पुन्हा नुकतेच खुले केले गेले, जे अंशतः आंतरराष्ट्रीय चर्चेचे कारण बनले.
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ५ )
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ४ )
बाजीनी तातडीने खिंड गाठली आणि मोर्चे लावायला प्रारंभ केला. खिंडीच्या दोन्ही उतारावर घनदाट झाडी होती. काही मावळ्यांना गोफणगुंडे घेउन वाटेच्या थोड्या ऊंचीवर बसवले.गोफणीसाठी दगड ? ते तर भरपुर होते. जरा पुढे धनुष्यबाण घेतलेले मावळे थोड्या जास्त उंचीवर बसले.इथून गनीम आरामात बाणाच्या ट्प्प्यात येणार होता. खिंड जेमतेम रुंदीची आणि चिंचोळी होती, एकदोन जण उभारले की प्रत्यक्ष यमही पलीकडे जायचा नाही. इथे बाजी, फुलाजी हातात पट्टे घेउन उभारले.
मिसळपाव