Skip to main content

माझा अनुभव

लेखक सुमेरिअन यांनी गुरुवार, 27/08/2020 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, गेली ८ वर्षे मी मिपावर वाचनमात्र आहे. पहिल्यांदाच लिहितो आहे. साधारण ३ वर्षांपूर्वी मी पुण्याहून ह्यूस्टन (टेक्सास, USA) ला शिफ्ट झालो. माझे इकडे आल्यानंतरचे अनुभव इथे मांडतो आहे. हा लेख तुम्हाला थोडा तुटक वाटण्याची शक्यता आहे. यातल्या काही गोष्टी तुम्ही अगोदर ऐकल्या असतील, पण काही निश्चितच नवीन असतील. हि नवीन माहिती थोडीशी वेगळी आहे(इथे राहणाऱ्या लोकांसाठी पण). ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल असं मला वाटतं, म्हणून हा पहिला वाहिला लेखप्रपंच. मिपावर एकाहून एक जबरदस्त लेखक आहेत.

कथा - पिवळा गुलाब

लेखक केदार पाटणकर यांनी बुधवार, 26/08/2020 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
पिवळा गुलाब रवी कॉलेज पोर्चमधे पोचला. पोचताक्षणी कोप-यावरच्या गुलाबांनी रवीला वातावरणाची जाणीव करून दिली. कोप-यातल्या टेबलवर गुलाब विकायला एक तरूण बसला होता. रवी मुख्य आवारात पोचला. पहिला तास सुरु झाला. दुसरा संपला, तिसराही संपला. तासांना त्याचं लक्ष नव्हतं. आज वर्गात ब-यापैकी गर्दी होती. सगळे तास संपले. आज जेव्हा रवी वर्गात शिरला तेव्हा मनालीने त्याच्याकडे पाहिलं होतं. रवीनेही तिच्याकडे पाहिलं होतं. प्राध्यापक कॉमन रुममधे गेले. मुलंही बाहेर पडली. सगळ्यांची गर्दी त्या गुलाब विकणा-या माणसापाशी झाली. मुलं येत होती, गुलाब घेत होती.

अभिनय जुगलबंदी - एक दृष्टिक्षेप

लेखक केदार पाटणकर यांनी बुधवार, 26/08/2020 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाज हा चित्रपट १९४९ मधे प्रदर्शित झाला. त्यात राजकपूर व दिलीपकुमार एकत्र होते. अभिनयाची जुगलबंदी चांगली रंगली. या चित्रपटाला सत्तर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त, दोन दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी असलेल्या काही मोजक्या चित्रपटांवर एक दृष्टिक्षेप. हिंदी चित्रपटांना चांगल्या अभिनयाची परंपरा आहे. एकापेक्षा एक तगडे अभिनेते रुपेरीनगरीत होऊन गेले. काही चित्रपट असे आहेत की, त्यात दोन उत्तम अभिनेत्यांची समोरासमोर जुगलबंदी रंगलेली आहे. अंदाज मधे राजकपूर व दिलीपकुमार एकत्र होते. राजकपूरला शोमन म्हणून ओळखले जाते. महान अभिनेता असे त्याचे नाव घेतले जात नाही.

श्रीगणेश लेखमाला २०२०- स्नानांतर

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 26/08/2020 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 प्रसंग अगदी काल घडलाय असा डोळ्यासमोर आहे... "बाबू, ई नदिलोनि पवित्र जलालधु स्नानम चेसरा... जलालो मुनीगी रा.." नदीकाठावरच्या आणि पलीकडे गुडघाभर पाण्यात उभ्या आईच्या मातुल कुटुंबातील नातेवाईक मंडळींनी कृष्णेच्या 'पवित्र' पाण्यात मी स्नान करावे, असा एकच धोषा लावला होता.

बाहेरील रुपाला आतील विषयाइतकेच महत्त्व

लेखक केदार पाटणकर यांनी मंगळवार, 25/08/2020 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी आताआतापर्यंत अशी समजूत होती की, कसे दिसता यापेक्षा कसे आहात हे महत्त्वाचे आहे. काही प्रमाणात हे खरे आहे. काही प्रमाणात खोटे. खोटे अशाकरता की, आपण सगळे राहतो अशा समाजात ज्यात डोळे आहेत. कोणतीही गोष्ट कशी आहे याची जाणीव होण्यापूर्वी डोळे ती पाहतात. पहिली प्रतिमा डोळ्यात उमटते. म्हणजेच, दिसणे महत्त्वाचे आहे. हे दिसणे छान असेल तर पुढे जाण्याचा निर्णय लवकर होतो. कोणताही व्यवसाय किंवा कार्याचे क्षेत्र बाहेरून कसे दिसते, यावर त्याचे यश काही प्रमाणात अवलंबून असते. व्यवसाय बाहेरून चांगला दिसत गेला तर त्याच्या यशात कमीतकमी दहा टक्के वाढ नक्की होते.

सायकलचा प्रवास

लेखक श्रीगणेशा यांनी मंगळवार, 25/08/2020 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
१९९७. पोलिस लाईन मध्ये राहणाऱ्या मित्राकडे किती भारी सायकल आहे याचं वर्णन बऱ्याच वेळा ऐकवून झालं होतं. एम एस ई बी तील दोन, वाड्याकडील आणि पेठेतील एक, अशा सर्वच मित्रांकडे एव्हाना सायकली अधून मधून दिसायला लागल्या होत्या. कधीतरी एखादी चक्करही मिळायची पण स्वतःची सायकल असली तर मनसोक्त हिंडता येईल असं नेहमी वाटायचं. झालं, शेवटी सायकल घेण्याच्या माझ्या हट्टाला घरातून हिरवा कंदील मिळाला आणि मग काय, सायकलच्या चर्चांना उधाण आलं. मित्र, शेजारी अशा सर्वांकडून माहिती गोळा करायला सुरुवात झाली. बी एस ए, हरक्युलस, ऍटलास, एम टी बी अशी नावं आपणच ठेवलीत, अशा थाटात चर्चा रंगू लागल्या.

इनस्क्रिप्ट टंकन

लेखक टीपीके यांनी मंगळवार, 25/08/2020 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे १९८६ साली भारत सरकारने भारतीय भाषांसाठी संगणक कळफलक प्रमाणीत केला. त्याचे नाव इनस्क्रिप्ट. पुढे १९८८ आणि १९९२ साली त्यात सुधारणा केल्या. त्या काळी युनिकोड वगैरे नव्हते. पुढे युनिकोड आले त्यातही भारतीय भाषांसाठी सुधारणा झाल्या. परंतु तो पर्यंत भारतीय भाषांसाठी लिखाण करण्यासाठी अनेकांनी अनेक अप्रमाणित पद्धती विकसित केल्या होत्या जसे गमभन, बोलनागरी इत्यादी. अशीच आणखी एक सोय म्हणजे गुगल इनपुट टूल्स. AI आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाषांसाठी बनवलेली प्रणाली, जी अर्थातच प्रमाणित नाही दुर्दैवाने आजही भारतीय भाषांमध्ये टंकणे कठीण पडते कारण प्रमाणीकरणाचा आणि त्याच्या प्रसाराचा अभाव. तसेच भारतात मिळणाऱ्या संगणकांचे कळफलक हे अमेरिकन असतात व भारतीय इनस्क्रिप्ट अक्षरे त्यावर नसल्याने प्रसारही होत नाही. सुदैवाने युनिकोड मुळे जगातील सर्व भाषांना संगणकावर स्वतःची एक प्रमाणित लिखाण पद्धती तयार झाली आहे ,आज सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स युनिकोड सपोर्ट करतात तसेच त्या त्या भाषांमध्ये लिहिण्याची सोयही देतात. परंतु भारतीय भाषांमध्ये तरी हे लिहिणे अजून तितकेसे रुळले नाही. आपल्याला मराठी वर्णमाला येत असेल तर हे टंकणे शिकणे फार सोपे आहे. रोज अर्धा तास या हिशेबाने ४-६ दिवसात बऱ्यापैकी जमू शकते. अर्थात टंकणे गुगल इनपुट टूल्स इतक्या वेगाने होत नाही परंतु या (गुगल इनपुट टूल्स) पद्धतीत काही स्पेसिफिक शब्द लिहिणे जरा कठीण जाते वेळी इनस्क्रिप्ट माहिती असणे फायद्याचे ठरते. रच्याकने गुगल इनपुट टूल्स पण इनस्क्रिप्ट ला सपोर्ट करते. तर आज ह्या पद्धतीने काही कठीण शब्द कसे लिहायचे हे बघू. खरे तर मी माझ्या सोयीसाठी ह्या नोट्स तयार केल्या होत्या कारण मला ही माहिती कुठेच मिळाली नाही, खास करून मराठीतले विविध र चे प्रकार इत्यादी. इतरांनाही याचा फायदा होईल असे वाटल्याने इथे देत आहे. अजूनही कोणता शब्द तुम्हाला लिहिता येत नाही असे वाटत असेल तर प्रतिसादात विचारू शकता, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.

हल्लीचे काही वार्ताहर

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 25/08/2020 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्या व माध्यमांच्या विश्वासाहर्तेनी एकदम तळ गाठला आहे. छापील व डिजीटल माध्यमांचा पैसा कमावणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. ह्या कारणामुळे वाहिन्यांचे व माध्यमांचे काम चालवण्यासाठी व पैसा मिळवण्यासाठी कोणत्या बातम्या कशा द्यायचा ह्याचे धोरण आखले जाते. ते बातम्या देत नाहीत तर त्यांच्या आवडत्या राजकीय पक्षाला साजेसं जनमत तयार कसे करता येईल त्या दृष्टिकोनातून बातम्यांची निवडकरून लोकांपर्यंत पोहोचवतात. असली माध्यमे व वाहिन्या PR Agency सारखे काम करतात. हे झाले माध्यमांचे. त्यात नोकरी करणाऱ्या वार्ताहरांची कथा तर अजून आगळी आहे.

आली आली गौराई

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 25/08/2020 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण महिन्यातले रिमझिम पावसासोबत केलेले उपास,व्रतवैकल्य, मंगळागौरीचा घातलेला पिंगा, झिम्मा, फुगड्या संपल्या कि सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे महाराष्ट्रात बहुतांश घरात महालक्ष्मी-गौरी बसवल्या जातात. गणपती बसल्यानंतर गौरी च्या रूपाने माहेरवाशिणीच घरी येतात. त्या आल्यानंतर त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात केल्या जातं. वऱ्हाडात त्यांना 'महालक्ष्मी' तर उर्वरित महाराष्ट्रात 'गौरी' नावाने ओळखतात, तर कुठे त्याना जेष्ठा-कनिष्ठा सुद्धा म्हंटले जाते. महालक्ष्म्या जेव्हा घरी येतात तेव्हा जेष्ठ घरधनीण सवाष्णी तिला घरात आणते.

सच बोलू तो

लेखक Govind यांनी मंगळवार, 25/08/2020 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
  गोष्ट आमच्या लहानपणी घडलेली आहे. मी तेव्हा सहावीत असेन.आमचा मित्र फिरोज आणि त्याच्या घरातील हा किस्सा आहे. फिरोजचा अब्बा म्हणजे मोतीलाल हा एक अट्टल बेवडा होता. तो चोवीस तास नशेत असायचा. जेव्हा शुद्धीवर यायचा तेव्हा बायकापोरांना एवढ्या तेवढ्या कारणावरून बदडणे हा त्याचा छंद होता. त्याला कुठलंही कारण पुरायचं. म्हणजे अगदी शेजारच्या घरातील कुत्रा जरी भुंकला तरी तो तेवढ्या कारणावरून बायकोला मारहाण करी. त्यामुळे ती बिचारी सदाची घाबरलेली असे. नवर्‍याला वर डोळा करून बोलायची सोय नव्हती. नाहीतर मग बेदम मार खावून पुन्हा वर तलाक द्यायच्या धमक्या मिळत.