"मित्रा"स पत्र...!!
*"मित्रा"स पत्र...!!*
आज *"रवि"* वार, माझा आवडता वार. रोजच्याप्रमाणे सकाळी, पक्षांच्या किलबिलाटाने लवकर जाग आली. लोळत बसण्याचा कंटाळा आहेच मला. पटकन चहा घेऊन तुझ्या आठवणीने माडीवर गेले. आजही तुझं दर्शन नशिबात दिसेना... मस्त ढगाळ हवा होती. गार वाराही सुटला होता... काय रे हे.....? किती वेळ वाट पाहू..? दोन दिवस झाले आपली भेटच होत नाहीये. नुसत्याच मनात आठवणी दाटून येत आहेत. डोळ्यासमोर येतोय तुझा तेजस्वी चेहरा.. सकाळी भेटतोस, तेव्हा नं तू अगदी नुकत्याच न्हाऊ-माखू घातलेल्या लहान बाळासारखा निरागस, लालचुटूक दिसतोस.. तेव्हा मला खूप आवडतोस.. पण आज मात्र....
मिसळपाव
दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्यावर गेलो होतो, तेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प खाडीच्या पलीकडे दिसत होता. या प्रकल्प परिसराला भेट देण्याचे तेव्हाच नक्की केले होते. आज सायकलिंग करत जैतापूरला जाण्यामुळे माझ्या बकेटलिस्ट मधील एक इच्छा पूर्ण होणार होती.
सकाळीच राजापुरातील वाल्ये गावातून सुरुवात करून कोंडये घाटी रस्ता निवडला.