तुतनखामुन
विश्वास
*विश्वास*
तो कोसळतो, सहस्त्रधारांनी
अविरत अखंड आपल्याच नादात..
तीच्या डोळ्यातली वेदना...
माझा डबा
माझा डबा
आपलं बायकांचं कसं असतं ना..अपल्या घरातल्या चमच्यांपासून डबे, वाट्या, ताटं, ताटल्या सगळ्यांत जीव गुंतलेला असतो. त्यातून सगळं स्वतः घेतलेलं असलं तर जास्तच आणि माहेरहून मिळालेलं असेल तर मग विचारायलाच नको.
आणि ह्यातलं काही कोणाला दिलं गेलं तर परत मिळेपर्यंत जीव कित्ती कासावीस झालेला असतो नाही? झालं असं..
आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. थोडक्यातच करायची, म्हणून जवळचेच मित्र मैत्रिणी बोलावले होते. सगळं व्यवस्थित पार पडलं. मैत्रिणीच्या मुलाला शिरा खूपच आवडतो म्हणून तीने माझ्या अत्यंत लाडक्या अशा थोड्याशा वेगळ्या आकाराच्या डब्यात भरून नेला.
घरटं
घरटं
त्या दिवशी खिडकीतुन बाहेर सहज लक्ष गेलं तेव्हा जाणवलं...समोरच्या झाडावर फांद्यांच्या बेचक्यात घरटं दिसतय कोणाचंतरी..मोठ्या खोल बशीसारखं होतं ते वाळलेल्या काड्या- कुड्यांचं. दिवसभरात मुद्दाम अधुनमधून बघितल्यावर एक-दोनदा कावळा (किंवा कावळी) त्या घरट्यावर बसलेला दिसला. म्हणजे या वेळी कावळ्याने बांधलं वाटतं घरटं..चिमण्यांची असतातच घरटी, एक-दोनदा बुलबुल आणि सूर्यपक्ष्याचं पण घरटं होतं या झाडावर. चला म्हणजे आता एक छान चाळा मिळाला . अधुनमधून निरिक्षण करण्यात छान वेळ जाईल. उन्हाच्या शांत दुपारी हा निरीक्षणाचा छंद खुप आनंद देतो मनाला.
पाऊस
पाऊस
हवेतला उकाडा भयंकर वाढला होता. धरती उन्हाच्या सततच्या मा-याने प्रमाणा बाहेर तापली होती. सारी सृष्टी पहिल्या पावसाची चातकासारखी वाट पहात होती.
अखेर त्याची येण्याची चाहुल लागली.
दुपारपासूनच मळभ दाटून अंधारून आल होतं. हळुहळु गार वारा सुटला.. पाचोळा, केर सैरावैरा पळू लागले. झाडं आधी हळुच मग वा-याच्या रेट्याने जोरजोराने डुलू लागली.
प्लास्टिकच घर
आमच्या घरापलीकडे एक भलमोठ नवीन तीन मजली घर बांधला आहे. तिथे एक परिवार राहयला आल आहे. बाहेरुन तर एकदम मस्त दिसत घर,अचुक रंगसंगतीने रंगवल आहे.अंगणात सुरेख छोटीशी बाग आहे. त्या बागेत मोगरा, गुलाब, जाई, रातराणी, जास्वंद,अनेक फुलाची झाडं आहे. मधल्या मजल्यावर छोटीशी Gallery आहे तिथे कुंडीत रोपे लावलेली आणि त्या कुंड्या लटकवल्या. हवेच्या तालात त्या सुरात हालत असत. फाटकाच्या आत नेहमी एक महागडी कार उभी असते. त्यांच्याकडे एक कुत्रा ही आहे.
एकंदरीत खुप श्रींमत लोक राहयला आलेत. नुस्त बाहेरुनच इतकं सुंदर घर तर मग आतुन किती सुंदर असेल.मला ते घर आतुन पण बघायची तीव्र इच्छा झाली.
शब्द
शब्द.....
शब्द हा शब्द छोटा ,शब्दाला अर्थ मोठा
शब्दच देती आसू, शब्दच देती हासू
शब्दच उडवती खटका, शब्दच करवती सुटका
शब्दाने वाढतो मान,शब्दाने जाते शान
शब्दाने होतो खुलासा, शब्दाने मिळ तो दिलासा
शब्दाने मिळते धैर्य , शब्दाने स्फुरते शौर्य
शब्दाने मिळते भिक्षा, शब्दाने मिळते शिक्षा
शब्दाने फुलते धाम,शब्दाने फुटतो घाम
शब्दाने मिळते माया, शब्दाने प्रफुल्लित काया
शब्दाने येते विरक्ती, शब्दाने होते भक्ती
शब्दाने मिळते ज्ञान , शब्दाचे ठेवावे भान
शब्दात असावी गहराई ,शब्दात आसावी नरमाई
शब्द चांगले ठेवा टिपून ,शब्द वापरा जरा जपून
शब्दावर द्यावे ध्यान, शब्द वापरा छान
डॉ.राजा सोवनी
मानगड (Mangad )
मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीनंतर शिवाजी महाराजांना राजधानीच्या दुर्गाची जागा बदलण्याची आवश्यकता वाटली. राजगडावरुन राजधानी रायगडावर हलवली गेली. पण यामध्ये राजधानीच्या मुख्य गडाला भक्कम संरक्षण आवश्यक होते. अर्थातच यासाठी निसर्गाने पुरवलेल्या सुरक्षेबरोबरच मानवनिर्मीत दुर्गांच्या चिलखताची आवश्यकता होती. रायगडाभोवती आधीच काही दुर्ग उभारलेले होते.यात चांभारगड, सोनगड हे दुर्ग होतेच. पण आणखी एक प्राचीन दुर्ग रायगडाच्या घेर्यात होता. रायगडावर उत्तरेने हल्ला होउ नये म्हणून वायव्य दिशेला मानगड मजबुत केला.
मिसळपाव