Skip to main content

खुसखुशीत कोंबडी

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 15/10/2020 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे जेवण - दक्षिण अमेरिकन/ टेक्सास पद्धतीची खुसखुशीत कोंबडी चांगले आंबट ताक , काली मिरी, मीठ यात थोडा मैदा + थोडे मक्याचे पीठ कालवावे आवरणासाठी पाहिजे असल्यास लसूण - कोंबडी चे तुकडे ( त्वचेसकट) वरील आवरणात घोळवून घावी - ओव्हन १८० अंश सेल्सियस ला तापवून चांगले खुसखुशीत होई पर्यंत हे तुकडे भाजून घयावे - सोबतीला , पालक, रॉकेट अशी थोडी तुरट सलाड त्यात ग्रीक किंवा फ्रेंच ड्रेससिंग ( किंवा नुसते पांढरे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस + मीठ + ऑलिव्ह तेल ) - वरती सार क्रीम ( आंबटसर लोणी ) आणि भारतीय वळण म्हणून त्याबरोबर आज कोमट अशी मस्त सोलकढी ...

पाऊस...

लेखक श्रिया सामंत यांनी गुरुवार, 15/10/2020 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक आलास आणि सगळं काही चिंब करुन टाकलंस तु येशील याचा अंदाज होता खरंतर पण तरीही अवचितच आलास खिडकीच्या काचेतून पलीकडे बघत होते मी तुला कोसळताना आणि माझ्या लक्षात आलं की मी तर फक्त पाहतेय मी दुसरीकडे बघितलं तेव्हा मला तो दिसला पावसात भिजताना त्याला बघून माझ्याच डोळ्यात पाणी आल्याचं जाणवलं कडा ओलावल्या आणि मन पुन्हा आठवणींपाशी गेलं न भिजूनसुद्धा भिजवून टाकलंस तू ते म्हणतात ना बुंदे कुछ यूह गिरी की कुछ खयाल भिग गये पावसात भिजणारा तो आता दिसत नाहीये खाली मला आणि मी मगाशी लावलेले पडदे बाजूला सारले वीज चमकली आणि क्षणभर का होईना पण प्रकाशुन गेलं सारं YouTube वर स्वानंद किरकिरेंचं बावरा मन ला
काव्यरस

‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ च्या निमित्ताने

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/10/2020 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशनाकडून 25 सप्टेंबर 2020 रोजी ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्या निमित्ताने हा लेख): ‘ज्यांच्या चेहर्‍यासमोर प्रतिक्रिया मागणारे कॅमेरे नसतात!’ अशा ‘जगातील भल्या बुर्‍या घटनांची नोंद घेणार्‍या सर्व सहृदय माणसांना...’ हा ग्रंथ (‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’) अर्पण केला आहे. सर्वसामान्य माणसाच्या वेदना वेशीवर टांगून त्यांना न्याय मिळावा म्हणून 2012 साली ब्लॉग लिखाणाला सुरुवात केली. (आणि म्हणूनच या ग्रंथाचीही आज निर्मिती झाली.) ब्लॉगमधून लिखाण करताना साहित्यिकापेक्षा सामाजिक होण्यात जास्त आनंद मिळतो!

आणखी काय हवं?

लेखक Pratham यांनी बुधवार, 14/10/2020 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा पावसाचे पाणी व मातीचा सुगंध बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज गरम चहा बरोबर आवडते पुस्तक बोला आणखी काय हवं?

चारोळ्या

लेखक राजा सोवनि यांनी बुधवार, 14/10/2020 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
वाटे व्हावे उन्ह,फुलवावी धरा सारी वाटे व्हावे मेघ तृप्त करावी धरा सारी वाटे व्हावे मलय शितल करावी धरा सारी वाटे व्हावे कवि आनंदवावी धरा सारी. वाटे उडावे इंद्रधनु शोधाया वाटे उडावे दवबिंदू शोधाया वाटे उडावे मधुबिंदू शोधाया वाटे उडावे मन: शांती शोधाया काव्य हे स्फूराया हवे हास्य हे फुटाया हवे विचार हे प्रगटाया हवे भाव हे फुलाया हव

चारोळ्या

लेखक राजा सोवनि यांनी बुधवार, 14/10/2020 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य शोधण्या हवे मन कोमल हास्य शोधण्या हवे मन निर्मल प्रेम शोधण्या हवे मन गंभीर दुःख झेलण्या हवे मन खंबीर डाॅ.राजा सोवनी.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३)

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 13/10/2020 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागाच्या लिंक अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २) अफझलखानाचे नियोजनः- अफजलखानाने मे महिन्यात पुण्याजवळ शिवाजी राजांना त्वरित लढाईसाठी बाहेर काढण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. जून महिना सुरू झाला आणि शिवाजी महाराज राजगड येथे राहिले.

करोनात्रस्त त्रागा

लेखक आनन्दा यांनी मंगळवार, 13/10/2020 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरे यांची क्षमा मागून, चाल - मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो करोनामुळे काही लोक पूर्ण घरात बसून आहेत, सगळी काळजी घेत, आणि काही लोक सगळे नियम धाब्यावर बसवून फिरतायत, त्यावरून झालेला वैताग आता कवितेतून व्यक्त होत आहे मी नाकावरती दहा मुखवटे आवळतो तो उघड्या नाकपुड्यानी गावातून फिरतो मी दाव्याच्या बैलापरी झालो बंदी तो उनाड रेड्यापरि धावे स्वच्छंदी मी दाव्यावरती पाय गंजवित बसतो तो उघड्या नाकपुड्यानी गल्लीत फिरतो डोळ्यात माझिया पोलीसांची भीती असते डोक्यावर हेल्मेटही चिलखती तो त्याच पोलिसांनाही खुन्नस देतो तो उघड्या नाकपुड्या आम्हाला हसतो मी शिंकेच्या आवाजाला घाबरतो अन दारे खिडक्या लावून घरा

हळवं मन

लेखक VRINDA MOGHE यांनी मंगळवार, 13/10/2020 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
"सम्या, अरे गधड्या ! आवरलं कि नाही अजून तुझं ?" नंदिनीचा आवाज आता आणखीनच वाढला. एकतर सकाळची धावपळ सुरू होती तीची. आणि समीरचं अगदी हळुहळु रेंगाळत आवरणं चालू होतं. त्याची आज नेमकी शाळेची रिक्षा येणार नव्हती म्हणून त्याला शाळेत सोडून मग परत घरी येऊन बाकी कामं आवरून तीला ही साडेआठला ऑफिसला निघायचं होतं. आलोक सकाळी सातलाच पोळीभाजीचा डबा घेऊन गेला होता आज त्यालाही लवकर जायचं होतं एका क्लायंटला भेटून मग पुढे ऑफीसला जायचं होतं. नंदिनीने अजून बाकी पोळ्या करून.. समीरच्या डब्यासाठी भाजी घालून एक रोल मग एक तुप साखरेचा रोल असं त्याला हवं तसं घालून तीने डबा भरला. त्याची वाॅटरबॅग भरून दप्तराजवळ ठेवली.

वाढदिवस..

लेखक आजी यांनी मंगळवार, 13/10/2020 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
मला या वयातही वाढदिवस साजरा करणं फार आवडतं. तो अगदी थाटामाटात,सर्व जवळच्या व्यक्तींना बोलावून,घरीच मस्त पार्टी करुन साजरा करायला मजा येते. माझ्या लहानपणी मुलांचे काय कुणाचेच वाढदिवस साजरे करण्याची पद्धत नव्हती. नवे कपडे नाहीत, केक नाही, बुके नाही, हाॅल सजवणं नाही, गोडधोड नाही, अगदी साधा शिरा सुद्धा नाही. खेळगड्यांना बोलावणं नाही, गालाची पापी घेणं नाही. काही काही नाही. वाढदिवसाला सकाळी उठून, आंघोळ करून घरातल्या मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घेणं कंपलसरी असे. त्यानंतर माझी आई मला जवळ घ्यायची. तिच्या पदराचा, कुशीचा स्पर्श छान वाटायचा. मग ती माझं औक्षण करायची.