Skip to main content

कावळ्या

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 23/10/2020 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
"रायगडाच्या घेर्‍यात" या मालिकेनंतर आपण जावळीतील चार गडांची माहिती घेणार आहोत. यापुर्वी जावळीची माहिती या धाग्यावर लिहीलेली आहे. जावळी तसेच यापुर्वी जावळी परिसरातील एका गडाची माहिती घेतली आहे. चंद्रगड ते आर्थरसीट ट्रेक आता या मालिकेत कावळ्यागड्,मोहनगड्,मंगळगड उर्फ कांगोरी आणि प्रतापगड यांची माहिती घ्यायची आहे. आज त्यातील पहिला किल्ला कावळ्या.   पावसाळ्यात वरंधा घाट हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे.

स्मरणरंजन

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 23/10/2020 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
                          स्मरण रंजन. रेडिओ (३)      'पगला कहीं का !' लंका. लंकेची ओळख अगदी लहानपणापासून. रामाच्या गोष्टीतून. रावणाची लंका. त्याने सीतेला पळवल्यावर जिथे ठेवले ती लंका. हनुमंताने जाळली ती लंका. रामाने समुद्रावर सेतू बांधला ती लंका. रावणवधानंतर बिभिषणाकडे सोपविली ती लंका.    पूढे पं.भीमसेनजींच्या गाण्यात तिचे भारी कौतुक ऐकले.

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग ४

लेखक नयना माबदी यांनी गुरुवार, 22/10/2020 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
26 जुन 2012 आज सकाळी आरामात 8 वाजता उठलो. आश्चर्याची गोष्ट अशी की अंग जराही दुखत नव्हते. रात्री आम्ही एवढे थकलेलो होतो की वाटल उद्या काही खर नाही आपल पण आम्ही सर्वजण एकदम ठिक होतो. चहा-नाश्ता करुन आम्ही 10 वाजता जम्मु कटराकडे प्रस्थान केले. काश्मीरमधे निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे.

एक तरी गज़ल अनुभवावी # ०२

लेखक अमर विश्वास यांनी गुरुवार, 22/10/2020 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
गालिब - गुलज़ार - जगजितसिंग या आधीचे भाग एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना एक तरी गज़ल अनुभवावी # ०१ --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- होगा कोई ऐसा भी कि 'ग़ालिब' को न जाने शाइर तो वो अच्छा है पर बदनाम बहुत है एका गझलेत गालिब ने स्वतः विषयी लिहून ठेवलं आहे "गालिब" ला ओळखत नाही असे कोणी आहे का?

स्मरणरंजन २

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 22/10/2020 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण रंजन रेडिओ (२)   गुजरा हुआ जमाना.. अकराव्या वर्षी बीडला शिक्षणासाठी. काकांकडे. तिथे मोठा रेडिओ 'मर्फी'. रेडिओ पेक्षा त्याची गोड बाळाची जाहिरात जास्त प्रसिद्ध. रात्री उशीरा, 'आपली आवड'. सर्वांचीच. सुमारे वर्षभर ' देहाची तिजोरी', 'मला हे दत्त गुरू दिसले,' 'मी डोलकर' ,' वादळ वारं सुटलं रं' , इ.गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. बहुधा शनिवारी सकाळी भावसरगम. नवनवीन भावगीते. महान संगीतकार कै.श्रीनिवास खळे यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी  याच कार्यक्रमात दिली. शुक्रतारा मंदवारा... आकाशवाणी च्या राष्ट्रीय प्रसारणात  आठवड्यातून एकदारात्री  शास्त्रीय संगीता चा कार्यक्रम.

प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी बुधवार, 21/10/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे २२.०६.२०१९ . काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात. मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली.

तीन चारोळ्या..

लेखक विदेश यांनी बुधवार, 21/10/2020 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
नको तुझ्या दु:खाचे वर्णन करूस माझ्यासमोर कधी - शोध सुखाचा माझा चालू ना पाहिले जे कधीच आधी .. . टाकून गेलीस एक कटाक्ष जाता जाता तिकडे- घालून गेलीस मनात चांदण्यांचे सुगंधी सडे इकडे.. . माझ्या मनाच्या अंगणात अक्षरांच्या चिमण्या चिवचिवतात - टिपून शब्दांचे दाणे कविता बनून किलबिलतात.. . . . विदेश

एक तरी गज़ल अनुभवावी # ०१

लेखक अमर विश्वास यांनी बुधवार, 21/10/2020 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे भाग एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना ___________________________________________________________________________________________________________________________ हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया वर्ना हम भी आदमी थे काम के इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब' कि लगाए न लगे और बुझाए न बने वो आए घर में हमारे ख़ुदा की क़ुदरत है कभी हम उन को कभी अपने घर को देखते हैं

स्मरणरंजन

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 21/10/2020 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरणरंजन रेडिओ (१) बचपन के दिन. माझा जन्म खेड्यातला .आडगाव. जि.बीड. वयाच्या दहा/अकरा वर्षापर्यंत तिथेच वाढलो. कळायला लागल्यापासून घरी रेडिओ. आजोबांच्या बैठकीत एका कोनाड्यात.फिलीप्स कंपनीचा  सुबक. बॉक्स आकाराचे एवरेडी बॅटरी वर चालणारा. ईंग्रजी नाईन चे आकड्यातून उडी मारणारी मांजर. बॅटरी वर्षभर चालायची. मग तालुक्याचे गावाहून (माजलगाव)दुसरी आणायची.  जुनी बॅटरी अंगणात  फोडणे हा माझा  कार्यक्रम. त्यात, पितळी पट्ट्याचे चौकटीत , कोळशासारख्या पदार्थाच्या टोस्ट च्या आकाराच्या वड्या . त्या फोडल्या वर पाणी निघे. पितळी पट्टया सोनार घेउन जाई. फुकट.

पाणिनी ह्यांचे संस्कृत

लेखक साहना यांनी बुधवार, 21/10/2020 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
“We can now assert, with the power of hindsight, that Indian linguists in the fifth century B.C. knew and understood more than Western linguists in the nineteenth century A.D. Can one not extend this conclusion and claim that it is probable that Indian linguists are still ahead of their Western colleagues and may continue to be so in the next century? Quite possible; all we can say is that it is difficult to detect something that we have not already discovered ourselves.” - फ्रिट्स स्टाल ( UC बर्केली चे प्राध्यापक) दोन विद्यार्थी पाठशाळेंत व्याकरण शिकत होते.