बॉईल्ड अंडा भुर्जी
तुम्हाला कधीमधी मस्त तिखट, झणझणीत, spicy खाण्याची इच्छा होते. नवरात्र आत्ताच संपलेले असतं. गेले काही महिने घरचचं खाल्लेलं असत, बाहेरच चमचमीत खाण्याची इच्छा असूनही खाता येत नसतं, अश्या वेळेस काय करावं असा यक्षप्रश्न तुमच्यासमोर असतो !
अश्यातच घरात काही अंडी असतात. उकडलेली अंडी,भुर्जी, ऑम्लेट, हाफ फ्राय हे सगळं खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी वेगळं खायला पाहिजे, पण काय हा प्रश्न कायम असतो. मग तुम्ही you tube वर जातात, तिथे काही व्हिडिओ पाहतात. तिथेही तेच तेच असतं. मग तुम्हाला डेक्कन किंवा स्वारगेटला भुर्जीपाव च्या गाडीवर खाल्लेल्या तिखट boiled भुर्जी ची आठवण येते.
मिसळपाव