Skip to main content

अनटायटल टेल्स ५

लेखक मकरंद घोडके यांनी शुक्रवार, 20/11/2020 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
सुरवात अशी काही नाहीच मधेच हे रस्त्याच्या कडेला उगवलेलं आहे झाडासारखं! त्याला भिकारी पण म्हणता येत नाही कारण त्याचं ते स्वतंत्र पणे कमावून खात आहे. त्याला फ्रीजमध्ये ठेवलेले नंतर खाऊ म्हणून ठेवलेले शिळे पदार्थ ठाऊक नाहीत! आवडीने चवीने खाईल असा पदार्थ आहारात नाही की चार पैसे गाठीला बांधून ठेवावेत अशी मध्यमवर्गीय की काय असते ती बैठक त्याच्या विचारात नाही! मग का जगत सुटलंय हे खाजेसारखं? माहीत नाही! मग काय चाललंय काय हे! चैतन्यदायी रस्ते असले काय किंवा थुलथूलीत रोडवणारा मोठा महामार्ग असला काय?

स्मृतींची चाळता पाने --अनगाव-२

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 20/11/2020 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग स्मृतींची चाळता पाने -अनगाव अनगावच्या शाळेतील माझ्या मैत्रिणी म्हणजे शेजारीच राहणाऱ्या मंदा/उषा लेले, सुशी साठे,लीला ओक वगैरे वर्गातील मुली.गावात मला सगळेजण बाईंची मुलगी म्हणूनच ओळखत असत.आईशिवाय आमच्या शाळेत लीलाताई गोडबोले, फडकेबाई,केतकर मास्तर असे चांगले शिक्षक होते. शाळा मराठी ७वी पर्यंतच होती.

व्यक्ताव्यक्त

लेखक Shrinidhi यांनी गुरुवार, 19/11/2020 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्त करणे की अव्यक्त राहणे? व्यक्त होत असतानाच अभिव्यक्ती खरी की... अव्यक्ताची अभिव्यक्ती खरी....,जी डोळ्यांनी साधली जाते,की कधी कशाने च नाही! व्यक्त जर सत्य तर अव्यक्त हे हे असत्य? की अव्यक्त हे जास्त सकस,समृद्ध,सर्जनशील,शुभंकर? सगळेच अव्यक्त हे व्यक्त करण्याच्या पलीकडले की वपु म्हणातत,तसे ते सर्वकष? सगळे अव्यक्त हे वैश्विक असते की प्रत्येकाच्या मनो विश्र्वा नुसार सापेक्ष! कदाचित आईन्स्टाईन च्या ऊर्जेच्या अक्ष्याय सिद्धांतानुसार....प्रत्येकाच्या व्यक्त आणि अव्यक्त हे समसमान आहेत?..…neither created nor destroyed..... की व्यक्त अव्यक्त चे नाते हे न्यूटन च्या तिसऱ्या नियमानुसारआणि

२. एका क्षणात विदेहत्व : इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स !

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 19/11/2020 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता किंवा सिद्ध ! जगात यापरता तिसरा पर्याय नाही. इन फॅक्ट, जर तुम्ही स्वतःला सिद्ध मानत नसाल तर स्वतःला व्यक्ती मानण्याखेरीज इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यत्र-तत्र-सर्वत्र सिद्धत्वंच सारे विश्व व्यापून आहे त्यामुळे इथे बाय-डिफॉल्ट, प्रत्येक जण सिद्धच आहे पण एखादं-दुसराच स्वतःच्या सिद्धत्वाची घोषणा करतो हा जगातला सर्वात मोठा विस्मय आहे.

दंतकथा

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 18/11/2020 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
परवाची गोष्ट ,अगदी परवाची.दातांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो.अर्थात दाताची तक्रार होती म्हणून.एरवी डॉक्टरांकडे कोण कशाला जाईल. तसे दाताचे डॉक्टर माझे मित्र आहेत. पण मी रिकामा असलो तरीकामाच्या वेळेला उगीच गप्पा मारायला गेलो तरी ते बिझी असल्याने मला तिथे दात करोत (स्वतः चे)बसावे लागेल. संध्याकाळी सात साडेसात ची वेळ.दवाखान्यात बर्यापैकी गर्दी होती . प्रतिक्षालयात अंदाजे पंधरा,वीस लोक ।रुग्ण (दंताळू) व सोबतचे( सांभाळू ) धरुन .दोन तीन चिमुरडे पण होते . चेहऱ्यावर च्या करुण भावा वरून रुग्ण कोण ते सहज ओळखू येतं.

चहाच्या पलीकडे

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 17/11/2020 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
।। चहाच्या पलीकडे...।। "व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।" अर्थात महर्षी व्यास यांनी सर्व जग म्हणजे जगातील सर्व विषय उष्टे ( हाताळलेले ) आहेत. थोडं उलटं जाऊन आपण असं म्हणू या की साऱ्या जगाने चहा उष्टावलेला आहे. तो आवडणारे आहेत, नावडणारे आहेत , त्याबद्दल तटस्थ आहेत. पण चहा माहीत नाही असा जगी कोणीही नाही. चहाबद्दल लिहायचे तर कोणी त्याच्या इतिहासाबद्दल, भूगोलाबद्दल लिहिल. ज्यात तो सर्वात आधी कोण प्यायलं, कसा प्यायलं, मग त्याचा प्रचार व प्रसार कसा झाला. त्याचे प्रकार किती, त्यांची माहिती कशी, त्याला लागणारं हवामान, तो कुठे उगवतो, कसा तयार होतो, कसा पाठवला जातो वगैरे वगैरे.

सहजच...

लेखक भटक्य आणि उनाड यांनी मंगळवार, 17/11/2020 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
सहज त्या दिवशी तू फोटोसाठी पोज़ काय दिलीस, नकळत माझ्या ह्रदयाची तार छेडुन गेलीस.. कस् सांगू तुला काय झक्कास दिसलीस तेव्हा, असाच मला छळायचा तुझा छद जगावेग.ळा.. काढलेस जरी असले फोटो तर प्लीज़ दाखवू नकोस मला, ते क्षण मिस केल्याचा त्रास होतोय मनाला.. कधी वाटल नव्हत की तू मला अशी भेटशील, भेटली ती भेटलीस पण माझ ह्र्दय घेऊन गेलीस.. बस जरा तिथेच स्टेज वर दिलखुलास आवाजचे सूर छेड, मनासारखे तुझे फोटो काढायचेत हवाय त्यासाठी थोडासा वेळ.. तुझे फोटो ठेवणार मी देणार नाही कुणाकुणाला, किती हटटी आहे तुझ्यासाठी एकदा सांगायचय तुला...

एका सैनिकाची परीक्षा.. मातृभूमीच्या प्रेमासाठी...

लेखक भटक्य आणि उनाड यांनी मंगळवार, 17/11/2020 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुला कसँ सांगू आई, आज माझी परीक्षा आहे या रणागणावर उरलेला मी शेवटचा सैनिक आहे, खूप दिवस झाले होते इथे येऊन सगळे कनटाळले होते सराव करून करून या असल्या वातावरणात आम्ही काय काय नाही केल ऊन थंडीमुळे आमच्या रक्ताच पाणी झाल सगळ्याना वाटत होत की आता हे संपाव हसत खेळत आपापल्या घरी जाव पण बहुतेक हे आमच्या नशिबात नव्हत दुर्दैवाने कालच रात्री हे रणागण पेटल... अचानक हल्ला झाला, गोळयाचा पाउस पडला, बॉम्ब पडले, धुरात काहीच दिसेनास झाल, सुरुवातीला बरेच पडले पण बाकीच्यानी सांभाळल, पण अपुर्‍या शक्तिवर आम्ही किती सावरायच? शेवटी तेच झाल जे अपेक्षीत नव्हत, एक एक करत सगळ्याच आयुष्य थांबल... आता इथे फक्त एकटा मी

सैतान

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 17/11/2020 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
देव मदतीला धावून आल्याचं ऐकलंय पण सैतान ??? १८ नोव्हेंबर १९६२ मध्ये खरोखर एक सैतानच आपल्या मदतीला धावून आला. मेजर शैतान सिंघ भाटी. नेफामध्ये चिनी सैन्य दैत्यासमान आपला भूभाग गिळंकृत असताना लडाखमध्ये मात्र चिन्यांनाच या सैतानाने धडकी भरवली. रेजांग ला सारख्या अतिशय खडतर प्रदेशात तुटपुंजी युद्धसामुग्री आणि फक्त सव्वाशे जवानांसह मेजर शैतान सिंघ यांनी तब्बल तेराशे चिन्यांच्या तेराव्याची सोय केली. चुशुलच्या साधारण १२ किमी दक्षिणेला ही पावन-खिंड (रेजांग ला) आहे. चुशुल येईस्तोवरच आपली हाडं खिळखिळी झालेली असतात. पुढे पुढे तर रस्ता असा नाहीच. नजर धावेल तिथवर खडकाळ मैदानं आणि डोंगर.

आत्मारामाची दीपावली..!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 16/11/2020 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मारामाची दीपावली..!! अंधारातून प्रकाशाकडे, जाणारी ती वाट, जीवनात आली, मंगलमयी पहाट.. किती काळ आसूसून, पाहतेय मी वाट, अंतरीच्या गाभाऱ्यात "त्याला", माझ्या शरणागतीचा पाट.. समर्पणाचा स्नेह, सद् भावनांची उटी.. अभ्यंगसमयी अशी, "त्याच्या" चरणी मिठी.. सोsहं ची सनई, अन् श्वासांचा धूप, भाव,भक्ती, प्रेमाचा, नैवेद्यही खूप.. शेजारी उभा गातसे, नामस्मरणाचा भाट.. "त्याच्या" दीपावलीचा असा मोठा थाट..!! आशा अपेक्षांचे फटाके, अहंकाराचा जळो भुईनळा, पंचप्राणांची पणती, आत्मारामाचा दीपसोहळा.. आत्मारामाचे औक्षणी, मन भारावून जाई, "त्याच्याशी" अद्वैत जाणता, नित्य दीपावली होई... जयगंधा.. १६-११ २०२०