Skip to main content

क्रिकेटची आवाजकी दुनिया

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 14/12/2020 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
इयम आकाशवाणी| संप्रतिवार्ता श्रुयन्ताम| प्रवाचक: बलदेवानन्द सागरः "उठा बाळा... साडेसहा वाजून घेले बघ!" एsssss आघाडा दुर्वा फुलैsssय्यो.... सकाळची ६ वाजून १६ मिनिटं झालेली आहेत... आता ऐकूया "उत्तम शेती" ह्या सदरात उसावर पडणार्‍या तांबेरा रोगाच्या उपायांची माहिती... "कार्ट्या उठ नाहीतर शाळेला उशीर होईल" "पाचच मिनिटं गं आई" ह्यानंतर... र. ना.

बोल्शेविक अमेरिका बळकावताहेत

लेखक गामा पैलवान यांनी सोमवार, 14/12/2020 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, नुकत्याच नोव्हेंबर २०२० मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप भरघोस मतांनी निवडून आले आहेत. मात्र जो बिडेन यांच्या नावावर खोटी मतं मोजली गेल्याने त्यांना विजय मिळाल्याचं मानलं जातंय. ही मतमोजणी इलेक्ट्रॉनिक होती. डॉमिनियन नामक कंपनीने ही मतदान यंत्रे बनवली. ही यंत्रे विश्वासार्ह नाहीत असं बरेच जण म्हणतात. भरीस भर म्हणून टपालमतांचा घोटाळा आहेच. निवडणुकीत घोटाळे झाल्याचे असंख्य पुरावे आहेत.

अज्ञात ज्ञात पंढरपूर १ चंद्रभागा मंदिर

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 12/12/2020 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञात ज्ञात पंढरपूर १ चंद्रभागा मंदिर पवित्र अशा पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना नदीमध्ये वंदन करून झालेवर चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० हुन अधिक टाळकरी गोलाकार उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर. मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही.

मी आणि माझा न्यूनगंड - 2

लेखक आनन्दा यांनी शनिवार, 12/12/2020 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
हो मला माझ्या न्यूनगंडाचा अभिमान आहे!! चक्रावलात? चक्रावण्यासारखेच आहे. मोठाच विरोधाभास आहे ना? पण विश्वाच्या पसाऱ्यात मी इतका क्षुद्र आहे की मला न्यूनगंड आलाच पाहिजे. जगात जे शून्य आहे तेच जरी माझ्यात असले, तरी मेंदूच्या रासायनिक अभिक्रिया आणि त्यातून उठणारे हार्मोन चे कल्लोळ यातून अजूनतरी मी मुक्त नाही.. साक्षीभाव श्रेष्ठ की आनंद श्रेष्ठ हे अजूनही मला कळले नाही. काहीवेळा वाटते की साक्षीभाव आला की आनंद आपोआप येईल , तर कधी वाटते साक्षीभाव हे आनंदाचेच बाय प्रॉडक्ट आहे. शेवटी मी म्हणजे कोण? हा देह? नाही नाही मग या देहातील अस्तित्व? अस्तित्व म्हणजे काय? ज्यामुळे देहाला देहत्व येते..

रेइश मागुश/रीस मागोस/रइस मॅगोज/Reis Magos fort आणि ग्यास्पर दियश ( Gaspor Dios )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 11/12/2020 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक पर्यटक गोव्याला गेले कि आग्वादला भेट देतात, मात्र याच परिसरातील नितांत सुंदर रिस मागोला मात्र क्वचितच भेट दिली जाते. रीस मागोस किंवा रेईस मागोस हा कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा गिरीदुर्ग आहे. एखादा किल्ला कसा ठेवावा किंवा एखादा किल्ला कसा जतन करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यातील हा रेइश मागुश किल्ला.

कविता

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 10/12/2020 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
मनमोहन कृष्ण येतो स्वप्नी मधुर पावा मनात गुंजतो. होते मी हि राधा वेडी. अंगणी चाफा डोलू लागतो !! चाफ्याच्या मधूर सुगंध लहरी , दरवळती दूर दूर रानी वनी गंधाने त्या वेडा होऊन कृष्ण येतो माझ्या स्वप्नी...!! चाफा माझा सोनसळी सुगंध अनुपम जगात , जीवा शिवाची भेट घडवतो, राधा कृष्णाच्या रूपात !! -वृंदा

सामान्य माणूस....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी गुरुवार, 10/12/2020 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य माणूस... वर्गात लोकं म्हणती स्कॉलर, जपतो आमची स्वच्छ कॉलर, सहसा नशिबी नसतात डॉलर, खिशात फक्त ओंजळभर चिल्लर... रांगोळीत आमच्या सजते, आकांक्षांची नक्षी, स्वप्नांच्या झाडावर रोज, नव्या इच्छांचे पक्षी... मनातल्या नकाशावर, आयुष्याची रूपरेखा, वाळूत काढतो रेषा, ते आम्ही पांढरपेशा... सुख दुःखाच्या प्रसंगी, आम्हा सोडत नाही चिंता, डोळ्यासमोर सतत फिरतो, महागाईचा वरवंटा.. कोणतीही असो दशा, आम्ही सोडत नाही दिशा, कर्तृत्वाला झळाळी देते, आमच्या मनातली आशा.. गरजा कंठशोष करून सांगतात, तू क्षणभर नको थांबूस, छातीवरलं बिरुद अभिमानाने मिरवतो, "मी सामान्य माणूस"....! जयगंधा... १०-१२-२०२०.

अक्षयपात्र

लेखक अमलताश_ यांनी गुरुवार, 10/12/2020 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःशी कणभर असताना दोन्ही हातांनी मणभर द्यायची इच्छा असते तेव्हा तो भेटतो. कणभराने तृप्त होतो. अक्षयपात्र तिच्या काळजाचं झालेलं असतं . खळाळत उधळत वाहतो प्रेमाचा झरा आटत नाही. लाघवी हसरा चेहरा डोळ्यात तेवत राहतो विझतच नाही. अव्यक्ताचं हे महाभारत पेलायला पुन्हा कृष्णसखाच लागतो. कृष्णसखा भेटतो. फक्त त्यासाठी त्या अनवट वाटेवरची द्रौपदी व्हावं लागतं .

शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती

लेखक जानु यांनी बुधवार, 09/12/2020 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे. शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही.