Skip to main content

मॅरेज सर्टीफिकेट

लेखक सरिता बांदेकर यांनी गुरुवार, 07/01/2021 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
मॅरेज सर्टीफिकेट सौ सरिता सुभाष बांदेकर आज समीरने घरी आल्या आल्या सांगितले ,” ऊद्या मी घरीच आहे.माझा डबा करू नकोस.” राधा विचारात पडली , अरे हा बरा आहेना सकाळी तर म्हणत होता की वीकएंडला ॲाफिसला जावे लागेल आणि हे काय मध्येच?? “काय रे सगळं ठीक आहे ना समीर??” “होय गं काही प्राब्लेम नाहीय हे घे तोंड गोड कर.”समीर म्हणाला “अगं कंपनी मला २ वर्षांसाठी अमेरिकेला पाठवतेय . मला ऊद्या सगळी कागदपत्रं गोळा करायची आहेत. म्हणून ऊद्या घरीच राहून ते सगळं करणार.” राधाचा मूडच गेला. “दोन वर्ष???समीर तुला नाही वाटत का दोन वर्ष हा खूप मोठा पिरियड आहे.

आज काय घडले ... मार्गशीर्ष व. ९ कोरेगांव येथील इंग्रज-मराठे यांचे युद्ध !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 07/01/2021 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले ... मार्गशीर्ष व. ९ कोरेगांव येथील इंग्रज-मराठे यांचे युद्ध ! marathe ingraj शके १७३९ च्या मार्गशीर्ष व. ९ रोजी कोरेगांव येथे इंग्रज आणि मराठे यांचा संग्राम झाला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठेशााहिस अनिष्ट अशी ग्रहदशा सुरू झाली होती.

अवघे भरून आले..

लेखक राघव यांनी बुधवार, 06/01/2021 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
सोडून सांजवेळी जाता कुणीतरी ते घर मोकळेच होते.. अवघे भरून आले.. विसरावयास बसता आठव अचूक भिडतो अवकाश पोकळीतील, अवघे भरून आले.. मायेस ओतणारी.. ती ऊब सांत्वणारी.. अवघे सरून गेले.. अवघे भरून आले.. होता मनात बहुदा तो शब्द ओळखीचा.. निरभ्र अभ्र सारे अवघे भरून आले.. -- त्या थोटकात पुन्हा हिरवाच कोंब होता.. नाविन्य पालवीतून अवघे भरून आले! -- -- त्या संध्याकाळी अचानक काहीतरी निसटून गेल्याची भावना झाली.. ती हुरहुर अगदी टीपेची होती.. जशी आली तशीच गेली..! अत्यंत गहिरं आणि जड असं काहितरी मनाला भिडलं होतं हे मात्र खरं. डोळे मिटून थोडावेळ बसलो होतो.

शिक्षणाचे मानसशास्त्र: परीक्षार्थी शिक्षण - जमेची बाजू

लेखक राजा वळसंगकर यांनी बुधवार, 06/01/2021 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात Teaching to the test किंवा परीक्षार्थी शिक्षणाचे दोष बघण्याचा प्रयत्न केला. पण शास्रोक्त (scientific) आणि न्याय (logical) विचार करून निर्णयाकडे यायला हवे आणि त्या निर्णयाला सारासार (practical and pragmatic) विवेक बुद्धीची जोड हवी. शिक्षणाचा हाच तर अंतस्थ हेतू आहे ना? (Critical thinking). परीक्षा पद्धतीवर जास्त लिहिले आहे, पण परीक्षार्थी शिक्षणावर माझे विचार कुठून येतात हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

सार्वजनिक परीक्षा पद्धतीची सुरुवात

परीक्षार्थी शिक्षण पद्धत ही सार्वजनिक निवड/पात्रता परीक्षेच्या अनन्यसाधारण महत्वामुळे अस्तित्वात आली हे सांगायला नको, पण सुरुवात इथून होते.

जयामावशी गेली!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 06/01/2021 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
सुचना- नुकत्याच आलेला अनुभव जसाच्या तसा मांडला आहे. मिपाच्या धोरणात बसत नसेल तर लेख उडवुन टाकावा. -------------------------------------------------------------- तसा अंदाज आला होताच सगळ्यांना हळुहळु. गेले ६ महिने डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या वार्‍या चालु होत्या. लिव्हर् वर २ गाठी झाल्या होत्या आणि जास्त वय व अशक्त प्रकृतीमुळे फार स्ट्राँग औषधे देता येत नव्हती. शुक्रवारी फोन आलाच मावसभावाचा की आईला पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागत आहे आणि लक्षणे काही ठिक दिसत नाहित तेव्हा फेरी मारुन जा. शनिवारी सकाळी पुण्याहुन निघालो आणि दुपारपर्यंत ठाण्याला पोचलो. सामान ठेवुन तडक हॉस्पिटलमध्येच गेलो.

आज काय घडले... मार्गशीर्ष व. ८ पं. मालवीय यांचा जन्म !

लेखक Ashutosh badave यांनी बुधवार, 06/01/2021 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... मार्गशीर्ष व. ८ पं. मालवीय यांचा जन्म !पंडित मालवीय शके १७८३ च्या मार्गशीर्ष व. ८ रोजी प्रसिद्ध हिंदु विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांचा जन्म झाला. यांचे मूळ घराणे मालव प्रांतांतील. माळवा सोडल्यानंतर प्रयाग क्षेत्री या धराण्याने आपले आस्तित्व कायम केलें.

आज काय घडले.... मार्गशीर्ष व. ७ हनुमंताचे वृत्तांत-निवेदन !

लेखक Ashutosh badave यांनी बुधवार, 06/01/2021 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
हनुमान रॅम भेट मार्गशीर्ष व. ७ ला श्रीहनुमान रावणाच्या लंकेमध्ये असणाऱ्या सीतेचा शोध लावून परत रामरायापाशी आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला. लंकेंत रावणाच्या अंतःपुरांत असणाऱ्या अशोकवनांतील सीतेचा शोध मोठ्या युक्तीने हनुमानाने लावला आणि तिला रामाची सर्व हकीकत सांगितली. रामास सांगण्यासाठी तिचाहि निरोप घेतला.

"शिकायचं कसं" ते शिकूया

लेखक उपाशी बोका यांनी मंगळवार, 05/01/2021 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन वर्ष आलं की आपण उत्साहाने संकल्प करतो की आता नवीन काही तरी शिकूया. म्हणजे नवीन काहीतरी शिकायचा उत्साह एरवीसुद्धा अधून मधून येतच असतो, पण नवीन वर्ष म्हटलं की तो उत्साह जरा जास्तच असतो. पण होतं काय की आपण २-४ दिवस शिकायला बसतो, मग काहीतरी महत्वाचे काम येते किंवा कंटाळा येतो, मग आजच्या ऐवजी उद्या करू असे वाटते आणि ते काम रंगाळत जाते आणि मग शेवटी बंदच पडते. असे होऊ नये, म्हणून मी काय करतो ते मांडायचा हा प्रयत्न. SMART Goals स्मार्ट गोल्स सर्वात आधी मी काय शिकायचे ते ठरवतो आणि त्यासाठी SMART Goals ही पद्धत वापरतो.

इकडचं तिकडचं

लेखक मालविका यांनी मंगळवार, 05/01/2021 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरीची सुरवातीची वर्ष मुंबई पुण्यात घालवली. मग काही वर्ष परदेशात काढली. आता इकडे गावी येऊन सेटल झालेय. पण कधी ना कधी काही घटना घडतात आणि जुन्या आठवणी येतात. आठवणी म्हणण्यापेक्षा ते ठिकाण आठवतं. आणि साहजिकच इकडचं नि तिकडंच असं होत राहतं. आता आजचच घ्या ना. इकडे दोन दिवसापासून मळभ आलय. प्रकाश दिसतो म्हणून सूर्य उगवला म्हणायचा इतकं मळभ येतंय. सकाळी सायकल चालवायला गेले तेव्हा मळभ तर होतच पण हवा पण एकदम कोरडी होती. जरा देखील वारा नाही कि काही नाही. जणू सगळ्या वातावरणाला एक प्रकारची मरगळ आलेय. मला अगदी पटकन परदेशाची आठवण आली. तिकडे ढगाळ वातावरण हे कायमचंच. सनी वेदर म्हणजे लॉटरी.