Skip to main content

संपादकीय अग्रलेखः मिसळ की भेसळ

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 19/09/2007 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व पात्रे काल्पनिक. (असे आपले म्हणायचे.) संपादकत्व स्वीकारुन आम्हाला बरेच (म्हणजे २) दिवस झाले आहेत. पण एकही लेख आमच्या अनुमतीची वाट पाहत शेपूट हलवत बसलेला नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही ताडकन भानावर आलो. आणि ह्या पदात वाटते तितकी मजा नाही हे जाणून घेऊन संकेतस्थळाचे सदस्य लोकशाही मार्गाने आमच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करण्यापूर्वी आम्हाला संपादकपद मिळाल्याची निळसर सुगंधी आठवण लिहून ठेवायचे ठरवले. या आठवणीचे ब्याकग्राऊंड तुम्हाला माहीतच असेल. किंवा नसले तर हा परिच्छेद वाचल्यावर माहीत होईल. मराठी संकेतस्थळांवरील आमच्या वावराला बरेच दिवस होऊन गेले होते.

आयुष्य असेच आहे

लेखक रंजन यांनी बुधवार, 19/09/2007 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य असेच आहे विस्तीर्ण पानासमान वाचता न येई कोणा त्यावरील आयुष्यरेषा .... नकाराच्या गावामध्ये होकाराची वाट व्हावी अंधाराच्या रात्रीतून किरणांना जाग यावी .... काय म्हणू आकळेना वाळवीला वाढणार्‍या अडगळ विसरली.. करे बुद्धीवंता इशारा
Taxonomy upgrade extras

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक - एक अस्सल लेख

लेखक सन्जोप राव यांनी बुधवार, 19/09/2007 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
चित्तर यांचा 'मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक' हा लेख वाचून आमची संतापाने लाही लाही झाली आहे. एकतर अशा लेखाची मूळ कल्पना आमची. त्यात तात्या अभ्यंकरानी गडबडीने या विषयावर लिखाण केले तेंव्हा आम्ही कसेबसे शांत बसलो पण आता या मूषकदौडीत चित्तर हेही उतरले, एवढेच नव्हे तर या विषयावर आपलेही लिखाण सुरु आहे अशी सर्किट यांनी धमकी दिल्याने आम्हाला हा आक्रमक पवित्रा घेऊन या विषयावरील प्रताधिकार सिद्ध करण्यासाठी हा लेख लिहिणे भाग पडत आहे. (सर्किट यांनी आता सन्जोप राव यांच्या छायेतून बाहेर पडून स्वतःची 'शैली' निर्माण करणे आवश्यक झाले आहे.

मिसळ आणि भेळ

लेखक महेन्द्र यांनी बुधवार, 19/09/2007 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
सन्माननिय मिसळ कट्टेकरांनो कृपया मिसळ आणि भेळ यातील वेगळे पण विशद करण्याचा प्रयत्न करा सर्व महानुभावांनी आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती

खिडकीकडून खिडकीकडे

लेखक रंजन यांनी बुधवार, 19/09/2007 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे आपले असेच आहे खिडकीकडून खिडकीकडे.. कधी इकडे कधी तिकडे बेन्चावरून बेन्चावरती माझ्या खिडकीचा फडफडे डोळा कितिदा समोरच्या स्क्रिनवरती मनात हलणारी पिंपळपालवी बसलेली विजेच्या लोळावरती पक्क्या गुंतल्या जुनाट गाठी काळ्या गढूळ डोहाच्या काठी अंधारडोह बसला जसा पाठी प्रकाशदीप जातो बुडीत खाती खिडकीकडून खिडकीकडे जुन्या पारावरून पारावरती झोकांड्या खात चालणे आता बेन्चावरून बेन्चावरती
Taxonomy upgrade extras

बोबडे हे बोल माझे..

लेखक अशोक गोडबोले यांनी बुधवार, 19/09/2007 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आत्ताच टीकाकार - १ यांनी माझ्या 'विहंगगीत' या रचनेला सुमार असे म्हटले आहे. मी या टीकेचे स्वागत करतो. टीकाकार -१ यांनी केलेल्या सुमार या परिक्षणामुळे माझ्याच रचनांबद्दल मला विचार करावासा वाटला आणि सहजच या चार ओळी सुचल्या त्या इथे लिहीत आहे. टीकाकार - १ यांचा मी आभारी आहे! शब्द माझे सूर माझे वाकुडे गाणेही माझे परि सांभाळून घ्या हो बोबडे हे बोल माझे.... धृ गीत माझी प्रीत माझी रीतही माझी जुनीच ताल माझा चाल माझी शाल माझी कांबळीत आजही आकाश गाते चांदण्याचे गीत माझे परि सांभाळून घ्या हो बोब हे बोल माझे...
Taxonomy upgrade extras

१६०००

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 19/09/2007 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई शेअर बाजारातील संवेदी निर्देशांकाने सक्काळी सक्काळी १६००० पार केल्याचे पाहिले. इथे बाजारगप्पा मारूया.

विहंगगीत.

लेखक अशोक गोडबोले यांनी बुधवार, 19/09/2007 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
विसरून पार गेलो, मीही असे लिहीत आकाश अक्षरांचे दिनरात रंगवीत शब्दातल्या कळ्यांना नव्हते फुलायचेच पण आतच वसंता बसलोच आळवीत केव्हातरी यशाची येई झुळूक मंद स्वच्छंद लेखनाचे तारू तरंगवीत शाली नकोत आता ना पुषगुच्छ हार घेई लपेटुनी मी मधुचांदणे पुनीत झेपावतो कळेना कोठे शकुंत आता अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात त्या अनुभवामृताला सीमा असीमतेची मी नादरूप वेडा सगुणी सणासुदीत बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

लोगो बदल

लेखक जगन्नाथ यांनी बुधवार, 19/09/2007 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
लोगो बदलता येईल का? डोक्यात "मिसळपाव"चा विचार घोंघावत असला की सकस, प्रौढ, वैचारिक, प्रगल्भ अाणि शिष्टसंमत वगैरे काहीही लिहिता येत नाही . . .