हस्ताक्षर..
जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने लिहिलेलं काहीतरी..
मी लिहायला सुरवात केल्यावर 'काहीतरी लिहिणं' ते 'काहीतरीच लिहिणं' या प्रगतीला फार वेळ लागला नाही. मग 'काहीच्या काही लिहिणं' या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरु झाली.
पण स्वतःच्या अद्वितीय अक्षरांमुळे ते हस्तलिखित कोणालाही दाखवायच्या लायकीचे नसायचे.अद्वितीय अश्यासाठी की एकदा काढलेले कोणतेही अक्षर मी परत कधीही तसेच्या तसे काढू शकत नाही. दरवेळेला अक्षराच्या स्वभावाचे आणि आकाराचे विविध कंगोरे कागदावरच उलगडून दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. त्या अर्थाने माझं लिखाण खरंच 'युनिक' आहे. लोकं आकडेमोड करतात तशी मी अक्षर'मोड' करतो.
मिसळपाव
