Skip to main content

आज काय घडले... पौष शु. ११ केशवचंद्र सेन यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
keshavchandra sen शके १८०५ च्या पौष शु.११ रोजी थोर पुरुष, उत्कृष्ट वक्ते, श्रेष्ठ कार्यकर्ते आणि विख्यात लोकसेवक केशवचंद्र सेन यांचे निधन झाले. यांचे घराणे कट्टे बंगाली वैष्णव होते; यांच्या आजाचे नांव रामकमल असून प्यारीमोहन व शारदासुंदरी ही यांच्या मातापितरांची नावे होती.

आज काय घडले.... पौष शु. १० चिमाजीअप्पांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले.... पौष शु. १० चिमाजीअप्पांचे निधन ! शके १६६२ च्या पौष शु. १० रोजी बाळाजी विश्वनाथांचे दुसरे पराक्रमी चिरंजीव चिमाजीअप्पा यांचे निधन झाले. वडिलांच्याबरोबर हे दिल्लीला गेले होते. थोरल्या बाजीरावांनी मोंगलाविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले, तेव्हा हे माळवा प्रांतांत मुलुखगिरीवर होते. चिमाजीअप्पांचे नाव वसईच्या युद्धामुळे अमर झाले आहे. सन १७३१ पासूनच पोर्तुगीझ व मराठे यांचा बेबनाव वाढीस लागला. शेवटी सन १७३८-३९ साली मराठयांनी वसईचा संग्राम चांगलाच गाजविला. वसईवर विजय मिळत नाहींसें पाहून मोठ्या वीरश्रीने चिमाजी बोलले, “वसई ताब्यांत येत नाही. माझा हेतु तर ती घ्यावी असा आहे.

आज काय घडले ... पौष शु. ८ पानपतचा अखेरचा संग्राम !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले ... पौष शु. ८ पानपतचा अखेरचा संग्राम ! शके १६८३ च्या पौष शु. ८ या दिवशी पानिपतचा शेवटचा घनघोर संग्राम होऊन सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा अंत झाला व लढाई थांबली. या दिवशी सूर्योदयापूर्वी मरूं वा मारूं या भावनेने मराठ्यांची सेना वीरश्रीने मैदानावर आली. श्रीमंत भाऊसाहेब व विश्वासराव घोड्यावर बसून निशाणाकडे निघाले. सर्वांच्या अंगांत त्वेष संचारत होता. लढाईचे तोंड भारी लागून मारामारी, खणाखणी, एक प्रहरपर्यंत चालू होती. भाऊसाहेब व विश्वासराव बारा वाजण्याच्या सुमारास घोड्यावर स्वार होऊन स्वतः हल्ल्यात पुढे झाले.

आज काय घडले... पौष शु|| ७ दुसरा बाजीरावाने इंग्रजासवे वसई येथे तह केला

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
vasaich taha शके १७२४ च्या पौष शु. ७ रोजी प्रसिद्ध असा वसईचा तह होऊन त्या दिवशी बाजीराव इंग्रजांना सर्वस्वी गुलाम बनला व मराठी राज्याच्या काळजीची इंग्रजांच्या मध्यस्थीने अनेक शकले झाली. यशवंतराव होळकराने पुण्यावर चाल केली तेव्हां दुसरा बाजीराव रायगड, महाड या ठिकाणी निघून गेला.