सासवड सायकल राईड( १० जानेवारी , २०२१ )
सासवड सायकल राईड( १० जानेवारी , २०२१ )
आज सकाळी पुण्यावरून सासवड सायकल राईड साठी निघालो आतापर्यंत दोन वेळा माझी सासवड राइड हुकली होती त्यामुळे या वेळी मात्र कोणतेही कारण न देता सासवड राईड करायचीच असे मी मनाशी ठरवले होते. काल दिवसभर खूप पाऊस पडल्यामुळे हवेमध्ये गारवा होता. पहाटे पाचला मी सुरुवात केली स्वारगेटच्या समोर एका ठिकाणी चहा घेतला, पुण्यात एक बरे आहे चौका चौकात चहाची अहोरात्र सोय असते. त्यानंतर कॅम्प, गोळीबार मैदान, AFMC कॉलेज, रेस कोर्स ग्राउंड मागे टाकत हडपसरला पोचलो तिथली हॉटेल अजूनही उघडली नव्हती त्यामुळे नाश्ता वगैरे काही मिळाला नाही.
मिसळपाव