Skip to main content

आज काय घडले... माघ शु.३ शनिवारवाड्याचे वैभव !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
shanvar wada शके १६५१ च्या माध शु. ३ रोजी पुणे येथे पहिल्या बाजीरावाच्या कारकीर्दीत प्रसिद्ध अशा शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. बाजीराव मधून मधून पुण्यास येत असे तेव्हा त्याचा मुक्काम कसब्यांत धडफळे यांच्या वाड्यांत असे.-" शके १६५० मध्ये पुरातन नदीकिनारा कोटकिल्ले, हिसार मोगलाई ठाणे होते.

आज काय घडले... माघ शु. २ उमाजी नाईक फांसावर !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
umaji naik शके १७५३ च्या माघ शु. २ रोजी जेजुरीच्या खंडोबाचा प्रसिद्ध भक्त आणि विख्यात क्रांतिकारक रामोशी उमाजी नाईक यांस फाशी दिली गेली शके १७१३ मध्ये पुरंदर शेजारच्या भिवंडी गांवी उमाजीचा जन्म झाला. सन १८०२ च्या वसईच्या तहानंतर पेशवे आणि रामोशी मंडळी यांचे बिनसले. रामोशांची वतने जप्त झाली.

आज काय घडले... माघ शु. १ " अधर्माने राज्य टिकत नसते !"

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
angad shosthai माघ शु. १ या दिवशी श्रीरामचंद्रांनी राजधर्मास अनुसरून व बिभीषणाची संमति घेऊन सामोपचाराचे शेवटचे बोलणे करण्यासाठी अंगदास रावणाकडे पाठविलें. लंकेभोवती वेढा कायम केल्यावर रामचंद्र आपल्या सहकाऱ्यांसह सुवेलपर्वतावर चढले व तेथून त्यांनी लंकेचे निरीक्षण केले.

आज काय घडले.... पौष व. ३० दोन जन्मठेपींची शिक्षा!

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
sawarkar शके १८३२ च्या पौष व. ३० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दुसऱ्या खटल्याचा निकाल लागून त्यांना दुसरी जन्मठेप-काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मायदेशी सावरकर आले ते नाशिकच्या तुरुंगांतच अटकेत राहिले. जॅक्सनच्या खुनामुळे सरकार बिथरून गेले होते. सेशल ट्रिब्यूनलपुढे खटल्याचे काम सुरू झाले.

आज काय घडले... पौष व. १४ सुभाष 'चंद्रा'स ग्रहण?

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
shubhashchandra शके १८६२ च्या पौष व. १४ रोजी वंगभूमीचे सुपुत्र सुभाषचंद्र हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचा पुकारा सर्व देशभर झाला. १६ जानेवारीपासून मौन धारण करून ते आपल्या खोलीत चिंतनात मग्न झालेले होते. व्याघ्राजिनावर बसून 'गीता', 'चंडी' व इतर धर्मग्रंथांचे पारायण करीत ते संन्यस्त वृत्तीने वागत होते. दि.

आज काय घडले... पौष व. १३ शहाजहान बादशहाचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
shahanjahan शके १५८७ च्या पौष व. १३ रोजी मोगलांचा पांचवा बादशहा शहाजहान याचे निधन झाले. शहाबुद्दीन मुहमद किरान उर्फ शहाजहान हा जहांगीर ऊर्फ सलीमचा जोधपूरच्या राजकन्येपासून झालेला पुत्र होय. सन १६२८ मध्ये हा गादीवर आला.

आज काय घडले... पौष व. ११ न्या. रानडे यांचे निधन

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष व. ११ न्या. रानडे यांचे निधन शके १८२२ च्या पौष व. ११ रोजी हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध समाजसुधारक, विख्यात राजकारणी, दूरदृष्टीचे विवेचक व स्वतंत्र भारताचे द्रष्टे न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे यांचे निधन झाले. राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक, आर्थिक इत्यादि अनेक क्षेत्रांत माधवरावांनी मार्गदर्शन केले. हिंदी अर्थशास्त्राचे ते तर जनकच होते. आयुष्यातील शेवटच्या दिवसांतहि यांचे लक्ष सार्वजनिक कार्यात गुंतून.राहिले होते. लाहोरच्या सामाजिक परिषदेस जातां आले नाही म्हणून यांना मनस्वी वाईट वाटले.

आमचा Valentine Week - मोठी तिची साऊली

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 13/02/2021 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
तीरगी की अपनी ज़िद है जुगनुओं की अपनी ज़िद | ठोकरों की अपनी ज़िद है हौसलों की अपनी ज़िद || - प्रबुद्ध सौरभ महान व्यक्तीला चांगल्या व्यक्तीपासून वेगळं करणारा हा एकमेव गुण - जि़द! एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा हट्टीपणा. यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करण्याचा चिवटपणा. यश मिळवण्यासाठी वाटेल ते आव्हान स्वीकारण्याचं धाडस. महान लोकांची एक जमात असते ती संकटांच्या नजरेला नजर भिडवून त्याच्याशी दोन हात करणार्‍यांची. पण काही लोकं तर त्याही पुढे जाऊन आव्हानांसमोर, संकटांसमोर धैर्यानी सोडा.... उर्मटपणानी, माजात उभी राहतात.

अडगळीतला साप (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 13/02/2021 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीतला साप (कथा) तसा तो दोन दिवसांपूर्वीच माझ्या नजरेस पडला होता. पण तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या रात्रीच्या मंद प्रकशात, मला बहुतेक त्याची शेपटी दिसली असावी. पण मी अर्धवट झोपेच्या अवस्थेत असल्याने, त्याकडे निरखून पाहिले नाही. असेल एखादी दोरी, ती लोंबत असेल अशी बोळवण करून, मी झोपलो होतो. खरेतर सकाळी उठल्यावर, वर पत्र्याकडे पाहणे माझे काम होते. त्या पत्र्याच्या कोपऱ्यावर, रात्री आपण काहीतरी पाहिले होते. तेव्हा ती आपल्याला दोरी वाटली, पण सकाळी उठल्यावर तेथे दोरी असायला हवी होती. पण घाईगडबडीत मी ते सगळे विसरून गेलो. आणि तो तिथेच वरती, त्या पत्र्याच्या अडगळीत, तसाच बसून राहिला होता.