Skip to main content

क्षितीज

लेखक शाल्मलि यांनी रविवार, 04/01/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
अदम्य इच्छा ही मनत क्षितीज होण्याची, असते जेथे ओढ वेडया धरतील नभाला भेटण्याची; मात्र तो असतो फक्त एक अभास तरी आहे वेडया मनला अजुनही कोणाची आस?

मौजा ही मौजा

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 04/01/2009 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपण 'नाही ' ला घाबरतो. विचारायचे असते,पण नकार मिळेल ह्या भितीने विचारतच नाही. १९९४ साल असावे. भारतात "फ्लाय बाय कंप्युटर" ची बोईंग विमाने सुरु झाली होती. कुटुंबासकट गोव्याला कुलदैवताला जायचा बेत रचला. विमानाची तिकीटे काढली. चेक इन करेपर्यंत ३०३ बोईग आहे हे माहित नव्हते. विमानात शिरल्यावर एकंदरीत स्टाइलने खुश झालो. बायको तर अवाक झाली. टेकऑफ घेतल्यावर चिरंजिवांनी (वय सुमारे साडे पाच)कॉकपीट बघायचा हट्ट धरला. खरे तर मला पण बघायचे होते. मी उठलो. लगेच बायकोने लगेच आहेर दिला. "वेड लागले आहे का? गप्प बसा. असे कोणालाही पायलट आत घेत नाही. अपमान कशाला करुन घेताय"? मी बसलो. मुलाला धीर निघेना.

आपल्या देशावर येऊन गेलेल्या मोठ्या संकटानंतर 31st celibration कितपत योग्य ठरले?

लेखक उर्मिला०० यांनी रविवार, 04/01/2009 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रमैत्रिणिंनो, २६नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश दु:खाच्या खाईत लोटला गेला.आपण आपल्या खुप देशवासीयांना गमावले.मुंबईकरांनी तर हे दहशतवादाचे तांडव उघड्या डोळ्यांनी पाहिले.प्रत्यक्ष अनुभवले.

लग्न करुन तु सासरी गेली आहेस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/01/2009 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
तु मी अन ममा, आपला ग्रुप होता.. त्यात आपल्या दोघांचा Secrete groupहोता. आता आपला ग्रुप फुटला आहे, कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तुझ्या रुमच्या दारावर लावलेल पोस्टर It is my Mess and i Love it पलंगावर पुस्तके उघडी, कपडे पडलेले, बाजुला ड्राईंग बोर्ड,त्या वर ड्राईंग शीटसचे भेंडोळे कॉंम्प चालु, अन त्यात तुझा अभ्यास चालु ममान तुला पसाऱ्या बद्दल दटावणे,मग चिडचिड, मी हळुच तुझी बाजु घेणे.."सासरी काय होईल देव जाणें" तिच पुट्पुटणे....आता सार शांत आहे... कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तुझ्या कॉलेजची अन मी कारखान्याला जाण्याची एकच वे

मोबाईल निरक्षरांच्या दुनियेत!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 04/01/2009 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल वापरणं हे आधुनिकपणाचं लक्षण आहेच, पण अनेकदा आधुनिक म्हणवणारेही त्याचा योग्य उपयोग करून घेत नाहीत, असं दिसतं. ऑफिसात, घरी, बाहेर, थिएटरमध्ये, सार्वजनिक ठिकाणी...इत्यादी इत्यादी. मोबाईलचं आगमन झाल्यानंतर अनेक वर्षं तो सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच होता. अगदी आमच्या ऑफिसातही ऑफिसच्या खर्चाने काहींना मोबाईल मिळाले, तेव्हा आम्हाला त्याचं कोण अप्रूप होतं! मीटिंग रूमवर एक नोटीस लिहिलेली असायची..."मीटिंग चालू असताना मोबाईल बंद ठेवा, अथवा "सायलेंट'वर ठेवा.' ही "सायलेंट'ची काय भानगड, ते कळायचं नाही. विचारण्याची गरजही वाटली नाही.

रुई माछ भापे - (वाफवलेला रोहु मासा)

लेखक पांथस्थ यांनी रविवार, 04/01/2009 00:51 या दिवशी प्रकाशित केले.

साहित्यः * कोणत्याहि मोठ्या माशाचे ६-८ तुकडे (रोहु, कतला, सुरमई...मी रोहु आणि हलवा वापरला आहे) * ४ मोठे चमचे पिवळी मोहरी * ८-१० हिरव्या मिरच्या * ४ मोठे चमचे मोहरीचे तेल * मीठ * केळिची पाने

रवा इडली

लेखक रेवती यांनी शनिवार, 03/01/2009 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: एक वाटी अख्खी उडीद डाळ (साल नसलेली), अडीच वाट्या जाड रवा, मीठ, एक टेबलस्पून तेल, पाणी कृती : उडीद डाळ किमान पाच तास पाण्यात भिजवा. नंतर डाळ वाटून घ्या व पाणी घालून पातळ करा. एका कढईत रवा भाजून घ्या पण रंग बदलू देवू नका. रवा कोमट झाल्यावर वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात घाला. कालवून घ्या व पाण्याचं प्रमाण गरज वाटल्यास याचवेळेस वाढवा. मिश्रण पातळ असले पाहीजे कारण रवा नंतर पाणी शोषून घेतो. चवीनुसार मीठ व एक टेबलस्पून तेल घाला. नीट मिसळून उबदार जागी ठेवून द्या. साधारण आठ ते दहा तासात पीठ फुगून येते.