नमस्कार मिपाकर,
खालील शास्त्रीय प्रयोग करण्यास मदत हवी आहे.
शेवटच्या क्षणी बहीणीच्या मुलाने विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याचे ठरवले. भाच्याला प्रयोग करण्याकरीता काही उमेदवार मिळाले. पण तरीही संख्या खूप कमी आहे. (जेमतेम १०-१२) . जर मिपाकरांनी खालील प्रमाणे चाचण्या घेऊन आपली निरिक्षणे नोंदवली तर प्रयोगासाठी खूप मदत होईल.
प्रयोग - खाली दिलेल्या चित्रातील रंग ओळखून प्रत्येक चाचणी देण्यासाठी किती वेळ लागतो , चाचणी देणार्याचे वय आणि स्त्री कि पुरूष हे नमूद करायचे आहे. शब्दांचा फक्त रंग ओळखायचा आहे. शब्द वाचायचे नाहीत. रंग मोठ्याने म्हणायचे.