कौतुकाची थाप!
आपण करत असलेल्या कामाचे किंवा जोपासत असलेल्या छंदाचे जर कुणी थोडेसे जरी कौतुक केले तरी किती छान वाटते नाही!! एकदम एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला आणि आपल्यात देखील निर्माण होते!!
आपल्याला कामाच्या ठिकाणी देखील बढती/पगारवाढ/बोनस यांपैकी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात आपल्याला कौतुकाची थाप किती हवीशी वाटते किनही... तसंच आपण घरात, कलाकुसरीच्या एखाद्या गोष्टीत जे काही करतो त्यासाठी देखील ती कौतुकाची थाप तितकीच महत्वाची असते, नाही का!!
मिसळपाव
