लेखकअविनाशकुलकर्णीयांनी सोमवार, 30/03/2009 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
४-५ वर्षाचाच असेल,कोप~यात शांत बसलो होतो,
"बाबा तुला नविन आई आणणार आहेत" कोणीतरी बोलत होत.
बाबा अन आई घरात आले, गळ्यात हार होते.नविन कपडे.
सारे गेल्यावर तिने माझ्याकडे बघुन विचारले..हा कोण?
"हा आमचा मक्या",बाबा..
लेखकजयवीयांनी सोमवार, 30/03/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
सोपं जगायची सवय झाली की ....
कठीण उत्तरं नकोशी होतात
थोडीशी बेरीज, वजाबाकी करुन
उत्तरं कशीबशी जुळवता येतात.
उगाच ती क्लिष्ट आकडेमोड कशाला
सापडतोच कुठला तरी वशिला
चढ उतार नकोच असतात
आडवळणं मग शोधली जातात
तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत
आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत
मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरुन
खरी वाट सोयिस्करपणे विसरुन
सवयी त्याच अंगवळणी पडतात
आणि खरे राजमार्ग ओसाड पडतात.
जयश्री अंबासकर
लेखकविनायक पाचलगयांनी सोमवार, 30/03/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा पंधरावा आणि अंतिम लेख
मी आणि स्टेज
(माझा आत्तापर्यंत झालेला स्टेजप्रवास)
तशी अंगात स्टेजवर जावुन बडबडायची होउस दांडगी ,त्यामुळे दिसली स्पर्धा की घे भाग अस नेहमीच व्ह्यायच(नंबर यायचा नाही हा भाग सोडा,पण बोंबलायचो)अगदी बालवाडी पासुन .तेव्हाचे फोटो अजुन आहेत, आता ते पाहिल्यावर माझे मलाच हसु येते पण चालायचेच स्वतःवर हसण्यात जी मजा असते ती दुसर्याला हसण्यात नाही हे मात्र खरे ..असो , तर असे करत मी ४थीत आलो ,आणि कधी नव्हे ते मला शाळेसमोर भाषण करायची संधी मिळाली विषय होता ल
लेखकमराठमोळायांनी रविवार, 29/03/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
उस्फुर्त प्रेरणा
देवानं तोतया कवींना असं का बनवलं?
ऊठ सुट येता जाता काहीही लिहाव
सगळेच स्वतःला कलाकार समजतात
पण मिपाकरांनीच का ते वाचाव?
प्रतिसादासाठी गळे काढावे, कधी कंपुबाजी म्हणुन नाचावे
प्रत्येक विडंबन म्हणजे पाणचटपणावर फोडणी
दळभद्री मणभर खीर, कुणाला पचलीच नाही
पण तोतया कवींच्या राजालाच का बरं खुमखुमी!
कुणी झोपेत कविता लिहितं
कुणी नाइलाजानं कवी बनतं
कुणी शब्द चोरुन कविता पाडत असते.
अशा कवितांपेक्षा विडंबनांना जास्त चव नसते?
कुणी "लिहू नका' सुचवू पाहतं
क्वचित कुणी थेट हल्ला करतं
कारण खर्या कवी कवियित्रींचे कवीपण
ह्या गर्दीत कुठेत
लेखकउमेश कोठीकरयांनी रविवार, 29/03/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
गे आई!
नको वध करू माझा तुझ्याच या चिमण्या जीवाचा
आकांत तुझ्याच उदरी तुला पाहवेल का ग माझा?
मातृत्व तुझे मिळावे म्हणूनी मी देवाकडे हट्ट धरिला
जन्मत:च माझा मृत्यूदिन तू का ग ठरविला?
मुलगी म्हणूनी दु:स्वास का ग?