साखरेचे खाणार त्याला..!
तसा मी लहानपणापासूनच गोडघाशा. साजूक तुपातला शिरा, केळ्याचे काप घातलेला सत्यनारायणाचा शिरा असेल तर विचारूच नका, माझा य-य आवडता पदार्थ आहे! (आई सत्यनारायणाच्या प्रसादासाठी मोठ्या पातेल्यात आणि माझ्या खादाडीसाठी वेगळा छोट्या पातेल्यात शिरा काढून ठेवायची आणि लहानपणी मला कधीच तीर्थप्रसाद देण्यासाठी बसवले जात नसे! :S ) (पण इथे एक धोक्याचा इशारा द्यायला मी विसरेन असे वाटते त्याआधीच सांगतो - मुगाचा साजूक तुपातला शिरा हा पदार्थ मी एकदाच खाल्ला -आणि अक्षरशः मुगदळासारखा पुढचा संपूर्ण दिवस बसून होतो! एवढा जड पदार्थ मी आयुष्यात पुन्हा खाल्ला नाही.
पाहायचं आहे
पाहायचं आहे हळूच तुला
माझी वाट पाहताना
डोळ्यांची माझ्या वाटेवर
अधीर नजर रेंगाळताना
पहायचं आहे हळूच तुला
माझ्या आठवणीत रमताना
आठवण काढत काढत
तु गालात लाजताना
पहायचं आहे हळूच तुला
माझ्यासाठी अश्रू ढाळताना
काळजातले अश्रू ढाळत
वाहणारे प्रेम पाहताना
पहायचं आहे हळूच तुला
मी स्वप्नात येताना
स्वप्न पाहत पाहत
गोड भाव फुलताना.
Taxonomy upgrade extras
अदभुत
3
विरह
हिरव्या हिरव्या वनांत या
जरि पानोपानी छाया ग,
दृष्टि समोरी तूंच नाहि तर
हिरवळ डोळां जाळी ग |
सहा रसांचे स्वाद लेऊनी
अमृत जरि मम पात्रीं ग,
घांस द्यावया तूंच नाहि तर
ठसका कंठी रुतला ग |
फुलापरी ही कोमल शय्या
जरी निरव या रात्री ग,
स्पर्शावाचुनि मोरपिशी तव
उरांत भडका उठला ग |
Taxonomy upgrade extras
राणीचा ८० वा वाढदिवस...
![]() |
| From DQ TURNS 80 |
लाल भोपळ्याची तुपावरची भाजी.
साहित्य :
पाव किलो लाल भोपळयाचे छोटे तुकडे
किसलेल ओल खोबर पाव वाटी
चविपुरते मिठ
फोडणी : तुप २ चमचे, जिर, २ मिरच्यांचे तुकडे
प्रथम वरील फोडणी द्यायची व भोपळ्याचे तुकडे घालायचे. वाफेवर शिजवत ठेवायचे. अर्धवट शिजल्यावर मिठ टाकायचे. जास्त शिजवू नयेत शिजले की वरून खोबर टाकायच.
ह्या भाजीत हळद हिंग घालत नाहीत त्यामुळे ही उपवासालाही चालते व भोपळ्याचा आणि तुपाचा छान वास येतो.
पालकचे रायते
साहित्य :
१ जुडी पालक निवडून, स्वच्छ धुवून
१ मिरची
१ अर्धा वाटी दही
चविपुरते मिठ, साखर
फोडणीसाठी : २ चमचे तुप, जिर, कढीपत्ता.
प्रथम पालक, मिरची थोड्याश्या पाण्यात शिजवावे. शिजल्यावर स्मॅश करून त्यात दही, मिठ, साखर घालायची व त्यावर वरील फोडणी घालायची. झटपट व चविष्ट रायते तयार.
टिप : फोटो काढलेला नाही त्यामूळे इथे देता आला नाही.
शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)
मी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा मराठी जनतेच्या नेत्रांमध्ये झणझणीत अंजन घालणारा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दोनदा पाहिला. माझ्या आई-बाबांना (त्यांची प्रकृती ठीक नसून देखील) हा चित्रपट दाखवायला आवर्जून घेऊन गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना, आप्तेष्टांना हा चित्रपट अवश्य बघण्यास उद्युक्त केले. त्यातील अफजल खानाच्या वधाचा प्रसंग जिवंतपणे उभा करणारा जोशपूर्ण पोवाडा बघून माझ्यादेखील धमन्यांमधले रक्त, तेवढ्या काळापुरते का असेना, पण सळसळले. माझा चार वर्षाचा पुतण्या शिवाजी महाराजांचा परमभक्त आहे.
मिसळपाव
