Skip to main content

अतिशय छान उपक्रम.....

लेखक उमेश__ यांनी शुक्रवार, 19/06/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्य युवा धोरण जाहीरनामा
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेना संचालनालयामार्फत ज्या विविध योजना राबविल्या जातात, त्या योजनांमधील जवळपास ८०% योजना या क्रीडा क्षेत्राशी संबंधित असून युवक कल्याणविषयक फार कमी योजना राज्य शासन राबवित आहे. मुळात महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्या (२००१ च्या जनगणनेनुसार - ९,६८,७८,९२७ यातील १३ ते १५ वर्ष वयोगटातील युवांची लोकसंख्या ४,१३,४७,८२१) ४२.६८% लोकसंख्या ही युवांची असून या वर्गातील लोकसंख्येकरिता, त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने कुठलेही धोरण ठरविलेले नाही.

बीट चि पुरि

लेखक मसक्कली यांनी शुक्रवार, 19/06/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
सहित्य:- बीट खिसलेल १ वाटी, लसुण-९-१० पाकळ्या, हिरव्या मिरच्या ६-७ , कोथिम्बिर चिरलेलि , हळ्द , मीट चविप्रमाने , जिर, ओवा, गव्हाचे पीट, तेल . क्रूती:- खिसलेले बीट चमचा भर तेल ताकून प्यान मधि थोड परतुन घेने.ओल्सर पना कमि होयि पर्यन्त,१-२ मीनिट. लसुन्,मिरचि,हळ्द्,जिर्,मिक्सर मधुन पेस्ट करुन घ्यावे.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ९

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 19/06/2009 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

ओला कचरा,गांडूळखत,ठाणे, आणि चौकशी

लेखक कोंबडी यांनी शुक्रवार, 19/06/2009 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
ओला कचरा आमचा ओल्या कचयाचा प्रयोग वर्षभर चालू आहे. स्वयंपाकघरात तयार होणारा बराचसा ओला कचरा आधी दिवसभर वाळवून मग दोनेक महिने कुंड्यांमध्ये कुजवून तयार होणारं काळं कंपोस्ट हे मातीला छान पर्याय आहे हे अनुभवलं. गांडूळ खत याआधी एकदा गांडुळं आणून पाहिली होती, पण काही दिवसातच गांडुळांची अख्खी फौज गारद झाली. काय बिनसलं होतं कोणास ठाउक! दोनेक महिन्यापूर्वी पुन्हा "दोनशे ग्रॅम" गांडुळं आणली "इनोरा" तून ... ती नुसती जगलीच नाहीत तर त्यांनी आमच्या ओल्या कचयाचं काळं सोनं केलं!

नाना कुलकर्णी

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 19/06/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारच्या टळटळत्या उन्हात भटकताना मी अकोल्यातल्या एका चौकातील आळशी संकुलाच्या इमारतीवरचा झेंडा बघून मी आत शिरलो आणि जिना चढून थेट तिसऱ्या मजल्यावर गेलो. भाजपच्या त्या निवडणूक कार्यालयात पन्नासएक कार्यकर्ते हॉलमधल्या भल्यामोठ्या सतरंजीवर पहुडले होते. कुणी खांद्यावरचा रुमाल स्वतःभोवती पंख्यासारख्या फिरवत होते, तर कुणाच्या हातात वर्तमानपत्रांच्या घड्या होत्या. तिथून आणखी पुढे, आत गेलो. टेबलावर एक जण फायलींच्या ढिगाऱ्यात डोकं खुपसून बसला होता. सिल्क खादीचा झब्बा, जाड चौकोनी फ्रेमचा चष्मा... निवडणूक कार्यालयाची सारी जबाबदारी त्याच्यावरच असावी, असं व्यक्तिमत्त्व.

पिकलेल्या आंब्याचा मुरांबा.

लेखक रेवती यांनी शुक्रवार, 19/06/2009 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या सदस्या 'मस्त कलन्दर'ह्यांनी काही दिवसांपूर्वी पिकलेल्या आंब्याच्या मुरांब्याची कृती विचारली होती. माझ्या कृतीबरहुकूम मुरांबा केल्यावर पाक थोडा घट्ट झाल्याने पाककृती मनाजोगी जमली नाही; त्यामुळे इथल्या ग्रोसरी स्टोअरमधे मिळणार्‍या हापूससदृश आंब्याचा मुरांबा करुन बघितला. साखर आणि आंब्याच्या फोडी ह्यांचे प्रमाण बदलून बघितल्यावर हवा तसा मधाळ मुरांबा जमल्यासारखे वाटते. पहा बरे मंडळी!

मराठीद्वेष्ट्यांची बनवाबनवी लोकसत्ता- १७ जून २००९, विशेष लेख

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 19/06/2009 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीद्वेष्टय़ांची बनवाबनवी लोकसत्ता- १७ जून २००९, विशेष लेख गेले काही दिवस बीएमएमच्या (बॅचलर ऑफ मास मीडिया) मराठीकरणाने कार्यकर्त्यांना झपाटलंय. एका अभ्यासक्रमाचे मराठीकरण करण्यासाठी वर्षभर विविध पातळ्यांवर झगडावं लागतं, हे दु:खद तरीही अपरिहार्य आहे, याचं कारण विद्यापीठात आणि इतरत्र मुबलक आढळणारे झारीतले शुक्राचार्य. या सगळ्यांना सरळ करण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग वापरण्याचा पर्याय सुरुवातीपासूनच उपलब्ध होता. पण दोन कारणांनी तो नाकारणं श्रेयस्कर होतं. एक म्हणजे मराठी माणसाच्या आक्रमक, दहशतवादी चेहऱ्याबद्दल गळा काढणाऱ्या विचारवंतांना, माध्यमांना त्यामुळे आयतंच कोलीत मिळालं असतं.