Skip to main content

डॉ. गणेश देवींच्या हस्ते ४ पुस्तकांचे प्रकाशन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/07/2021 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘आदिम तालनं संगीत’ या माझ्या अहिराणी कवितासंग्रहाची व्दितीय आवृत्ती एकवीस वर्षांनंतर चेन्नईच्या नोशन प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झाली आहे. 1980 ते 2000 पर्यंतच्या पहिल्या आवृत्तीतील 153 (पहिली आवृत्ती डॉ. गणेश देवी यांनी बडोद्याच्या ‘भाषा केंद्रा’तून प्रकाशित केली होती.) आणि 2001 ते 2020 पर्यंतच्या 82 अशा एकूण 40 वर्षांतील 235 कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. या संग्रहाची मराठी व इंग्रजी भाषांतरंही प्रकाशित झाली असून मराठी भाषांतर स्वत: कवीने तर इंग्रजी भाषांतर प्रा. राजीव कुलकर्णी यांनी केलं आहे. दुसर्‍या आवृत्तीला (डॉ.

असेहि एक विलगीकरण

लेखक shashu यांनी मंगळवार, 13/07/2021 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबाग या मुख्य शहरापासून आमचे गाव साधारण 20 किलोमीटर आहे. तसेच मांडवा जेट्टी पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर एका कोपर्‍यात सासवणे गाव वसलेले आहे. आमच्या गावाला आणि आजूबाजूच्या गावांना सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या अशा समुद्रकिनारी पूर्वी स्थानिकांच्या वाडी, बाग घर होती याठिकाणी आता श्रीमंत लोकांनी जागा विकत घेऊन स्वतःचे बंगले बांधले आहेत व सुट्टीच्या दिवशी त्यांचे तिकडे येणे-जाणे होते तसेच अधूनमधून पार्ट्या होत असतात. या श्रीमंत लोकांमध्ये क्रिकेटर, फिल्मी दुनियेशी संबंधित लोक, तसेच मोठे उद्योगपती सामील आहेत.

अनुवादित पुस्तकं

लेखक पाटिल यांनी रविवार, 11/07/2021 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे. हा उद्योग करण्याचा हेतू असा की फार पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..‌ पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा आपल्याला झेपतेय की नाही वगैरे..

गोष्ट सांगा गणित शिकवा .... 12

लेखक राजा वळसंगकर यांनी रविवार, 11/07/2021 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्साहाच्या भरात रात्री बराच वेळ मुलांना झोप आली नाही. सबमरीन मध्ये प्रवास करण्याचा अनुभव असा किती जणांना असतो? बरं, त्यावर काही वाचायला पण फारसे मिळत नाही. 20,000 Leagues under the sea आणि U-boat सारखी पुस्तक कोण वाचतं आजकाल? आणि दुसऱ्या महायुद्धाचे चित्रपट आता जुने झाले! नाही म्हणायला The Ghazi Attack या हिंदी चित्रपटामुळे निदान सबमरिन असे काही असते हे तरी कळलं होत. प्रकाराची युद्धनौका माहित झाली होती. पण शेवटी तो हिंदी पिक्चर! किती माहिती मिळणार?

इंग्रजी भाषेचा अन्य भाषांवर प्रभाव

लेखक केदार भिडे यांनी शनिवार, 10/07/2021 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा शिकण्याचा अनुभव कथन करताना मराठी आणि जर्मन संभाषणात इंग्रजी शब्दांचा वापर यावर एक निरीक्षण नोंदवले होते आणि तो विषय थोडक्यात आवरला होता. मात्र त्यानंतर अधिक शोध घेतला असता परिस्थिती जरा वेगळी असल्याचे जाणवले. १) जगातील भाषांची आकडेवारी एखादी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या किमान १० करोड आहे अशा केवळ १३ भाषा जगात आहेत [१]. इंग्रजी १३४ करोड ते जपानी १२ करोड अशी एक ते तेरा क्रमवारी आहे. चिनी भाषा दुसऱ्या क्रमांकावर ११२ करोड आणि हिंदी ६० करोड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

न मावळणाऱ्या सूर्याची गोष्ट

लेखक चौथा कोनाडा यांनी शुक्रवार, 09/07/2021 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
संजय गोरे कान कान दुखतोय म्हणून इ.एन.टी स्पेशालिस्ट डॉ सुधीर भालेराव यांच्या पुढ्यात बसलेले आहेत. गोरें बरोबर त्यांची मीरा पत्नी आणि मुलगा सचिन देखील आहेत. डॉ सुधीर भालेराव “गोरे, तुमच्या कानाला इन्फेक्शन झालंय. इ तुम्हाला इअर ड्रॉप्स आणि काही औषधाचे डोस लिहून देतो, ते घ्या.

चविष्ट - यू ट्युब चॅनेल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 09/07/2021 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर. आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत. तुमच्या कडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असेल.

चविष्ट - यू ट्युब चॅनेल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 09/07/2021 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मायबोलीकर. आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत. तुमच्या कडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असेल.

मिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 08/07/2021 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल फोटो अपलोड - जुलै २०२१


मिपावरचा फोटो धागा मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही जोरात आहे. ज्यांनी अजून फोटो दिले नाहीत त्यांनी द्यावेत.

पण फोटो इथे कसे द्यावेत अडचण वाटत असेल तर हा एक प्रयत्न.

फोटो देण्याची प्रक्रिया थोडक्यात अशी आहे --

मिसळपाव साईटवर स्वत:ची अशी स्टोरेज मेमरी सभासदांसाठी नाही. त्यामुळे आपल्या फोन / camera / pc मधले फोटो
A) कोणत्यातरी photo hosting / photo sharing / social media site वर अपलोड करावे लागतात.