सरगोंड्यांची झिंग
- डॉ. सुधीर रा. देवरे
विरगावला पद्मनाभ स्वामींची समाधी आहे. ह्या समाधीकडे जाण्याचा रस्ता अतिशय छान उतारवळणाचा आहे. दर वर्षी आषाढी आमावस्येला वा दीपअमावस्येला (जिला आपल्या भागात गटार अमावशा म्हणतात) तिथं यात्रा भरते. म्हणजे मी लहान होतो तेव्हा भरत असे. यात्रेच्या दिवशी तिथं लळितही साजरं होत असे. ‘लळित’ म्हणजे एक प्रकारचं नाटक असतं. भारूड सादर करायची कला म्हणजे ‘लळित’. आता ते होणं बंद झालं. त्यात भाग घेणारे कलावंतही एकेक करत वारले.
दीपअमावस्येच्या आठ दिवस आधीपासून समाधीत भागवत बसायचा.
मिस्ड कॉल
मिस्ड कॉल
विनू आणि गोट्या शेताच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडत होते.
“ए पोरांनो कुठला गाव आहे हा?” दोन मध्यम उंचीच्या मध्यम वयाच्या बाप्यांनी प्रश्न केला.
“गावात नवीन दिसताय जणू, नाव नाय माहित? मग इथपोत्तर आलात कसे?” विनू आश्चर्यचकित झाला.
“मी आहे अल्फा१ आणि हा माझा मित्र झेटा२६. आम्हाला तहान लागली आहे. प्यायला पाणी मिळेल का?” स्वतःला अल्फ़१ म्हणणारा विचारत होता. आता गोट्या पुढे सरसावला.
“अल्फा पाव्हणं, हे आहे पाळदे बुद्रुक! तुम्हाला दुसरा बाजीराव माहिती आहे का? नाही माहीत? सोडून द्या. तुम्ही असं करा समोर मळयात विहिरीवर मोट चालू आहे. तिथे पाणी प्या.
६० वर्षांपूर्वी...
बर्लिनच्या भिंतीने शीतयुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव टाकला होता.
लोकशाही, भांडवलशाही व्यवस्थेमुळे ‘पश्चिम जर्मनी’ आणि ‘पश्चिम बर्लिन’मध्ये वेगाने आर्थिक विकास होत गेला. पश्चिमकडील लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही होते. या बाबी साम्यवादी ‘पूर्व जर्मनी’ आणि ‘पूर्व बर्लिन’मधील नागरिकांच्या नजरेत येऊ लागल्या. आपल्याही परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची इच्छा सामान्य जर्मन नागरिकाला होती. त्यामुळं पूर्वेकडून पश्चिमेकडे होणारे पलायन पूर्णपणे रोखण्यासाठी ‘पूर्व जर्मनी’च्या साम्यवादी राजवटीने दोन्ही बर्लिनच्या सीमेवर तारेच्या कुंपणाच्या जागी भिंतच बांधण्याचे ठरवले.
मिसळपाव