अभियांत्रिकीचे दिवस-३.. सबमिशन्स
पहिल्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षेच्या तडाख्यात, निम्मी-अर्धी जनता जबर जखमी व्हायची. पण कसेतरी बॅकलॉग घेऊन, रडत खडत दुसऱ्या वर्षाचा जुगाड लागायचा. उरलेली जी जनता गचका खायची त्यांची व्हॅकन्सी डिप्लोमाच्या पोरांनी भरून काढली जायची.
ज्याप्रमाणे घरात नवीन आलेल्या सुनेला तिची सासू वेगवेगळ्या आयडिया काढून, घरात मिसळून घ्यायची टाळाटाळ करते, त्याच प्रकाराची एक आवृत्ती रेग्युलरची पोरं ह्या डिप्लोमाच्या पोरांच्या बाबतीत सादर करायची.
"आम्ही तुमच्या आधीपासून इथं आहोत.
वास्तव- चिंतन- तत्वज्ञान मंडनाची कादंबरी (‘मी गोष्टीत मावत नाही’)
- डॉ. रवींद्र नेवाडकर
मी एक सामान्य वाचक आहे. “मी गोष्टीत मावत नाही” या डॉ. सुधीर देवरे यांच्या हटके कादंबरीवर एक वाचक म्हणून प्रतिक्रिया देत आहे. मी देवरे सरांच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया म्हणून काहीतरी लिहीत असतो, हेच माझे साहित्य लिखाण संचित आहे.
हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली आणि मला विश्राम बेडेकर यांचे आत्मचरित्र “एक झाड आणि दोन पक्षी” याची आठवण झाली. त्यात लेखकाने आपले जीवनचरित्र लिहितांना एक वेगळाच फॉर्म निवडला आहे. माणसाचे दोन मने असतात. एक जीवनाचा अनुभव घेते तर दुसरे त्याचे विश्लेषण व चिंतन करते. चिंतन करणाऱ्या मनाने अनुभव घेणाऱ्या मनाचे जीवन कथन केलेले आहे.
भारांच्या जगात...५
सगळं सगळं ठीक होतं
भा. रा. भागवतांची पुस्तकं मिळवता मिळवता कधी सेंचुरी मारली कळलेच नाही. या प्रवासात अनेक लोकांनी सर्वतोपरीने मदत केली. एखादे दुर्मिळ पुस्तक मिळवायला, स्वत:च्या कलेक्शनमधून काढून द्यायला आणि काहींनी चक्क ती मी येत नाही तोपर्यंत अगदी जपून ठेवली होती. अशातच कधी काही पुस्तके गहाळ झाली, काही देतो म्हणून नंतर यू-टर्न घेऊन गेले. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कळाली. आयुष्य सुंदर आहे. फक्त हवे असणारे पुस्तक कधी ना कधी मिळाले पाहिजे.
माझ्या स्नेही मित्रांनी काही पुस्तके माझ्यासाठी घेतली होती, त्यात मला काल भारांचं एक दुर्मिळ पुस्तक मिळालं, ‘सगळं सगळं ठीक होतं’.
हंपी एक अनुभव - भाग 3
विजयनगर ही राजा कृष्णदेवराय यांची राजधानी होती. सहाजिकच महाराजांच्या इतमामाला शोभेल असाच तामझाम इथे पाहावयास मिळतो. अर्थात हे म्हणत असताना एक सत्य विसरणे शक्यच नाही की माहाराज कृष्णदेवराय अत्यंत सृजनशील राजे होते. त्यांना केवळ उत्तम स्थापत्य निर्माणाची आवड होती असं नसून ते सर्वच क्रीडाप्राकारांचे भोक्ते होते. याची कितीतरी उदाहरणं जागोजागी दिसून येतात. मागील भागामध्ये मी ज्या पुष्कर्णी उल्लेख केला आहे त्या पुष्कर्णीच्या बाजूलाच एक अत्यंत मोठा तरण तलाव निर्माण केला आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर आंतरराष्ट्रीय तरण स्पर्धेसाठी अत्यंत योग्य असा हा तरण तलाव आहे.
'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय', वाचावेच असे पुस्तक
अक्षरनामा मध्ये आलेला लेख (लिंक शेवटी) वाचून मला या पुस्तकाचा परिचय झाला. तेव्हाच हे पुस्तक वाचायचे असे माझ्या मनात नोंदवून ठेवले होते. आमच्या गावात विठ्ठलाचे देऊळ आहे आणि तिथे आषाढ महिन्यात उत्सवही असतो. गेले वर्ष आणि या वर्षी कोविड साथीमुळे त्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही आषाढ म्हटले की विठ्ठल हे समीकरण माझ्याच नव्हे तर समस्त मराठी मनात पक्के आहे. त्यामुळे यावर्षी आषाढ महिना जवळ आला तसं या पुस्तकाची मला आठवण आली आणि लगेच खरेदी करून वाचूनही काढले. सर्व पुस्तक आतुरतेने वाचून काढले. त्यातील मला आकलन झालेले काही मुद्दे खालील प्रमाणे.
तंत्रशिक्षण २०२१-२२ (पूर्वार्ध)
प्रसंग एक.
रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा.
सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात.
'' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?''
पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..''
''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..''
''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे.
निसर्गरम्य तोरणमाळ
नुकतीच काही कामानिमित्त माहेरी फेरी झाली. आम्ही सहा बहिणी व एक भाऊ असा मोठा परिवार आहे. सर्व बहिणी जळगाव जिल्ह्यातच आहेत. त्यामुळे मी गावी येणार आहे असे समजले कि बहिणी, भाचे कंपनीची भेटायला येण्याची लगबग सुरु होते. मी तेथे पोहोचायच्या आधीच वाड्यात सर्व मंडळी जमा झालेली असते. एक दिवस सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्यात निघून जातो. यावेळी जवळपासच्या एखाद्या पर्यटन स्थळी सहलही करण्याचे ठरले होते. बच्चे कंपनी धरून चांगला पंधरा जणांचा ग्रुप जमला. ठिकाण ठरले चार साडेचार तासांवरील तोरणमाळ.
सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे एक निसर्गरम्य ठिकाण.
दैवाचा रिव्हर्स पंगा(इतरत्र पूर्व प्रकाशित)
दैवाचा रिव्हर्स पंगा
विक्रम भालेराव हे “पॉवरकॉन” कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होते. मी अस ऐकले आहे की सॉफ्टवेअर कंपन्यांमधून मॅनेजरला मांजर म्हणतात. पण भालेराव मांजर नसून वाघ होते. ते कायम कुणावरतरी हल्ला करून त्याला फाडून खायच्या मूड मध्ये असत. हे असे का? त्याला अनेक कारणे असावीत. तुम्ही खोदून चौकशी केलीत तर त्यांच्या हाताखाली काम करणारे एकमुखाने सांगतील, “सरांचे काय आहे तसे ते स्वभावाने फार चांगले आहेत. ते कुणावर आरडा ओरड करतील त्याचा नेम नाही, पण ते मनात काही ठेवत नाहीत. ऑफिसमधून संध्याकाळी घरी जाताना मन कसे निर्झरासारखे स्वच्छ!
मिसळपाव