Skip to main content

बिल्डर कसे व्हावे ......

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
बिल्डर कसे व्हावे............. (व्यंग) नमस्कार !!........ आज आपणास मार्गदर्शन करणार आहे बिल्डर कसे व्हावे. काही जणांच्या मते बिल्डर बनणे हि फारच किचकट गोष्ट आहे . आम्ही म्हणतो कठीण आहे पण जर आपण इतर यशस्वी बिल्डर पाहिलेत व त्यांचा पायावर पाय ठेवून जर बांधकाम व्यवसायाची माहिती घेतलीत, तर नक्कीच हा व्यवसाय फलदायी व क्लेश रहित आहे. इथे आपणास मुद्देसूद व सकल मार्गदर्शन केले आहे, पण अर्थात हे आजकालच्या जगतातले शिक्षण आहे, व ते आजकालच्या प्रमाणेच अवलंबिले पाहिजे. बाकी आपल्या तोंडी गरज आहे ती फक्त अरेरावीच्या भाषेची.....

"पुस्तकी" विनोद!!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 20/02/2010 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
(वेगळ्या प्रकारच्या एका विनोदाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. कसा वाटला ते जरूर कळवा. यात कुणालाही आणि कशालाही दुखावण्याचा हेतू नाही.. तसे वाटल्यास हसून मोकळे व्हा - क्षणाचा सोबती) एका पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेली सूचना: या पुस्तकातल्या कथेत लेखकाने व्यक्त केलेल्या मतांशी स्वतः लेखक तसेच प्रकाशक, मुद्रक आणि विक्रेते हे सर्व सहमत असतीलच असे नाही. वाचकांनीही सहमत असावे असे नाही. तसेच या पुस्तकातील पात्रे, घटना, व्यक्ती हे सर्व सत्य आहेत. ते वाचकास खोटे वाटत असतील तर तो दोष वाचकाचा आहे आणि हा योगायोग मानू नये. कारण, माझा योगायोगावर विश्वास नाही.

कोडी पचडी - चिकनचे लोणचे

लेखक विंजिनेर यांनी शनिवार, 20/02/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
ही आंध्रदेशीय पाककृती अनेक वेळा करून - "ट्राईड अँड टेस्टेड" अशी आहे. अनेक पायर्‍या असल्यामुळे कदाचित किचकट आणि वेळखाऊ वाटण्याची शक्यता आहे पण जर त्या पायर्‍या जशाच्या तशा करत गेलात तर निकाल हमखास बरोबर येणार हे नक्की(न झाल्यास पैसे परत :) ). अजून एक म्हणजे हा पदार्थ एखादी निवांत दुपार हाताशी असेल तरच करा.

साअरडो पावासाठी विरजण

लेखक चिंतातुर जंतू यांनी शनिवार, 20/02/2010 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
काहींचा हा प्रयोग फसला असल्याचे वाचले, म्हणून मला अनेकदा हमखास जमलेली पाककॄती देत आहे. साअरडो पावासाठी विरजण लावणं भारतात खूप सोपं आहे, पण हवाबंद पाश्चिमात्य घरांत थोडी काळजी घ्यावी लागते. पूर्वसूचना: ही कॄती काही दिवसांची आहे. भारतात २-३ दिवसांत होते. हिवाळ्यात, थंड हवेच्या प्रदेशात हमखास फसणार. कॅलिफोर्निआत जमेल.
  1. कणकेचा लिंबाएवढा गोळा भिजवून घेणे. टीपः मीठ अजिबात न वापरणे. त्याने कवके मरतात. नळाच्या पाण्यात क्लोरिन अधिक असू शकते. त्यामुळेही कवके मरतात. ते टाळण्यासाठी पाणी न झाकता २४ तास ठेवावे, व मगच वापरावे. पाणी नंतर उडून जाते, त्यामुळे भिजवताना थोडे जास्त वापरावे.

किस्से कॅफेतले

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 20/02/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये 'बिकांना' माझ्या कॅफेत घडलेले काही गंमतीशीर किस्से सांगितले होते. ते किस्से लिहुन काढ म्हणुन बिका मागे लागले होते पण मी नेहमीप्रमाणेच आळस केला. काल सुहासनी विषय काढलाच त्यामुळे पुन्हा उत्साह आला आणी काही किस्से लिहुन काढले. चला तर मह लुटुया लुत्फ ... किस्सा १ :- वेळ :- सकाळी ११.२५ साधारण एक २२/२३ वर्षाची युवती आत डोकावुन बघते. युवती :- एस्क्युजमी, तुमच्याकडे युनिव्हर्सिटिचा फॉर्म भरुन मिळेल का ? मी :- एक्स्टर्नल ?? युवती :- हो ! किती पैसे होतील ? मी :- तुम्ही बसुन भरणार असाल तर तासाप्रमाणे जे होतील ते, प्ल्स प्रिंट आउटसचे पैसे. मी लागली तर थोडीफार मदत करेन.

झाकोळ

लेखक स्मृती यांनी शनिवार, 20/02/2010 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
रिक्त म्हणू की संपृक्त मनाची ही अवस्था शांत निवांत तृप्त स्वस्थ अस्वस्थता.. नाविन्याची ओढ नाही जीवनाशी तेढही नाही मिळालं न मागता कसली मागणीही नाही विरक्तीचा विचारही नाही संसाराची आसक्तीही नाही येतो असा क्षण कधी 'मी का आहे' हा प्रश्नही नाही स्मृती चित्रे
काव्यरस

राज ठाकरे डोंबिवलीत

लेखक सुमीत भातखंडे यांनी शनिवार, 20/02/2010 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
३ फेब्रुवारी २०१० रोजी राज ठाकरे यांची डोंबिवली येथे सभा झाली. सभा नेहमीसारखीच सॉलिड झाली. मराठीचा नेहमीचा मुद्दा तर होताच, पण त्याबरोबरच सध्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे काही प्रकार चालू आहेत त्याचाही उत्तम समाचार घेतलाय. टॅक्सी परवान्यांचा इश्यु, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी केलेलं घुमजाव याबद्दल राज बोललेच, पण त्याचबरोबर ह्याप्रकारानंतर विधानसभेत विरोधी पक्षाबरोबरच राष्ट्रवादींनीही झाल्या प्रकाराचा विरोध केल्याबद्दल राजनी त्यांचं अभिनंदनही केलं. राज जे नेहमी सांगत आलेले आहेत, की जे चांगलं असेल त्याचं कौतुक करूच मग तो रायव्हल पक्ष का असेना, त्याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आल.

‘स्त्रियांना आता काय हवे?’ - एक बुद्धीवादळ

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 19/02/2010 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
‘स्त्रियांना आता काय हवे?’ या शीर्षकाखाली नीलिमा भावे यांचा लोकसत्तच्या २३ जाने २०१० च्या http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=42176:… अंकात एक लेख आहे. मला तो आवडला याचे कारण स्त्री-शोषणाचे नेहमीचे रडगाणे न गाता खुले पणाने स्त्रीमुक्तीचा सकारात्मक आढावा या ले़खात आहे. मला या लेखातील आवडलेली वाक्ये - - ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ असा सामना आता इतिहासजमा झाला आहे.