Skip to main content

श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी!!!

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 07/03/2010 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस पुणे, मुंबईत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर शहरात सुद्धा असेलच. दिवसा सुद्धा आणि विशेषकरून रात्री अंधार पडल्यावर या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या रात्री च्या मोठमोठ्याने ओरडण्याने झोपमोड सुद्धा होते. लहान-थोर सगळ्यांनाच या भटक्या कुत्र्यांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने वाहनांचे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याचा संभव असतो. पायी चालणाऱ्या सर्वांनाच कुत्र्यांचा त्रास होतो. कुत्रा चावून लचका तोडून व्यक्तीला मरण ओढावू शकते.

अरूणाचल प्रदेश

लेखक विकास यांनी रविवार, 07/03/2010 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच टाईम्स ऑफ इंडीया आणि इकॉनॉमिक टाईम्स मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे आपल्या तत्पर परराष्ट्रमंत्रालयाने जागतिक बँकेस अरूणाचल प्रदेशसाठी निधी मागणार नाही अशी ग्वाही दिली आहे आणि चीनने हे परराष्ट्रमंत्र्यांचे विधान अधिकृत करण्याची मागणी बँकेकडे केली आहे. श्री.

सूर्याची सावली...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 07/03/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख : सूर्याची सावली गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला. पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता... 'रमेश, नानाजी गेले'...

वसई पेटली......

लेखक विकि यांनी रविवार, 07/03/2010 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
नैसर्गिक दृष्ट्या समृध्द असणार्‍या ,अतिशय सुरेख अश्या वसई-विरार महानगरपालीकेतून ५३ गावे वगळावी यासाठी तेथील आमदार विवेक पंडित यांनी बेमुदत उपोषण केले.त्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी ५ मार्चला पोलीसांनी ज्या पध्द्तीने बळाचा वापर केला.स्रिया,वृध्द,लहान मुले,तरुण मुले ,मुली यांवर घरात घुसून बघाणार्‍यालाही चीड यावी असा अमानुषपणे लाठीमार केला,त्याचा निषेध करायलाच हवा.दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून लाठीमाराचे दृष्य पाहताना इतिहासात वाचलेल्या इंग्रज सरकारच्या जुलुमाची आठवण झाली.एखादे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस ज्या पध्द्तीने वागतात ते लोकशाहीला धरून आहे का?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.महाराष

नंदाच्याई

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 06/03/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
नंदाच्याई... आम्ही लहानपणापासून त्यांना "नंदाच्याई'च म्हणत आलो. त्यांच्या मुलीचं नाव "नंदा', म्हणून त्यांना "नंदाच्या आई' असं नाव पडलं, हे आम्हाला खूप उशीरा कळलं. आमच्या शेजारीच राहायच्या त्या. अगदी घरासमोरच. आमच्या आवाराच्या मालकांनी दोन खोल्यांची जागा या आखाडे कुटुंबाला राहायला दिली होती. नंदाचे बाबा- म्हणजे नंदाच्याईंचे पती- हमाली करायचे. त्यांची स्वतःची हातगाडी होती. (हातगाडी म्हणजे दोन चाकांची, एका बाजूने ओढायची लांबलचक लाकडी गाडी. त्यावर माल ठेवून ओढून नेतात.

स्वारी गोरखगडावर

लेखक योगेश२४ यांनी शनिवार, 06/03/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे ह्या महिन्यात तरी गोरखगडला जायचे का?" कंटाळुन शेवटी मेल माझ्याकडुन सर्व मित्रांना गेला. त्याला कारण असे होते की बर्‍याच दिवसांपासुन गोरखगडचा ट्रेक करायचा विचार होता. पण मुहूर्त काही सापडत नव्हता. या ना त्या कारणांमुळे हा बेत पुढेच ढकलला जात होता. पण हा ट्रेक करायचाच हा बेत मनात पक्का होता. त्यातच गडावरचा सचित्र लेख वाचनात आला आणि बस्स्स ठरविले कि ह्याच महिन्यात गोरखगड सर करायचा.