Skip to main content

सा S S प!!!

लेखक मीनल यांनी सोमवार, 19/04/2010 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
होळी विशेषांक -हास्यगाऽऽरवा यात मी लिहिलेल्या अजगर या लेखात `जर-तर` ची गोष्ट होती. कल्पनाविलास करून हसवण्याचा प्रयत्न केला होता. पण आताचे लेखन हे प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे. --- इथे अमेरिकेत स्प्रिंग सिझन सुरू झाल्यावर निसर्गातील चैतन्य जणू आमच्यातही उफाळून आले. आमची बागही हरवीगार करण्याची इच्छा झाली. मागच्याच आठवड्यात नर्सरीत जाऊन छान फुलांची २ मोठी झाडे आणली. टोमॅटो, बारीक मिरची आणि काकडीची इवली इवली रोपे आणली. त्यासाठी ज्यात रोगप्रतिकारक औषधे, फर्टीलाझर्स आहेत अशी महागाईची माती आणली.

कथा: सत्संग गुंतवणूक

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी सोमवार, 19/04/2010 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे ५:३० झाले होते. महाराज अद्याप आले नव्हते. सत्संगी बाबांची वाट बघत होते. तोच रोल्स-राईस मधून बाबांचे आगमन झाले. सर्व सत्संगी उठून उभे राहिलेत. महाराज आसनस्थ झाले. महाराजांनी हाताने खुणावून सर्वांना बसावयास सांगीतले. सत्संग सुरू होण्यापूर्वी नामस्मरण करण्यात आले. श्रीराम जय राम जयजय राम! सर्व सत्संगी नामस्मरणात एकरूप झाले. त्यानंतर सत्संग सुरु झाला. महाराज सांगू लागले- "ह्या अनंत कोटी ब्रम्हांडात एका चैतन्याव्यतिरिक्त काही नाही. चैतन्य हेच आपले स्वरुप आहे. चैतन्य स्वरुप आपल्या मध्येच आहे. त्यामुळेच आपले चलन वलन चालू राहाते. शरिरात चैतन्य नसेल तर शरीर जड बनते.

कॉफी शॉप सेशन

लेखक अरुंधती यांनी रविवार, 18/04/2010 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
''रेखे, पोचलीस का गं कॉफी शॉपमधे?'' सुमाचा आवाज ऐकून रेखाने आपला मोबाईल स्पीकर मोडवर ऑन केला. ''तुला काय वाटतंय? तूच ऐक आता... '' रेखाचे वाक्य संपते न संपते तोच मधू व साक्षी दोघींनीही ''सुमे, कुठं अडकली आहेस? अगं कित्ती उशीर लावशील? पोटात कावळे कोकलताहेत, लवकर ये... फाजीलपणा करू नको फार!!! '' अशा आवाजात एकच गजर केला. हसत हसतच कॉल संपवून त्यांनी रेखाकडे पाहिले. रेखा हसत होती खरी, पण त्यात नेहमीचा मोकळेपणा नव्हता. जणू सुमा यायचीच वाट की रेखाच्या मनात कोंडलेली वाफ बाहेर पडायच्या तयारीत होती. सुमा, रेखा, मधू व साक्षी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी!

निवेदन...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/04/2010 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मायबापहो, गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने मी मिपापासुन दूर आहे. माझ्याही आयुष्यात बर्‍याच त्रासदायक गोष्टी घडल्या/ घडत आहेत. येणारे काही दिवस मी या गोष्टींतच व्यस्त असेन असे वाटते. या आणी अश्याच अजून काही कारणांमुळे मला मिसळपावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही असे दिसते. दिवसेंदिवस येणारे नवनवीन लेखकांचे तसेच प्रस्थापितांचे लेखन मिपाला समृद्ध करत आहे हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण मिपाला असेच समृद्ध करत राहाल अशी आशा करतो. यापुढे माझ्याऐवजी नीलकांत सर्व व्यवस्थापन पाहील असे मी येथे जाहीर करत आहे.

"अक्सुमो..!!"(भारतीय रवा पिझ्झा...)

लेखक डावखुरा यांनी रविवार, 18/04/2010 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १)कांदा,टमाटे,कोथिंबिर... कांदा,टमाटे,कोथिंबिर २)बारीक शेव (पिवळी),टमाटा सॉस,पिझ्झा चटणी... बारीक शेव (पिवळी),टमाटा सॉस,पिझ्झा चटणी ३)पिझ्झा तयार करण्याची पुर्वतयारी: अ]पिझ्झा चटणी: दोन कांदे,५-६ पाकळ्या लसुण,१ टेबल स्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ..

मोनालिसा

लेखक मॅन्ड्रेक यांनी रविवार, 18/04/2010 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या छंदातुन केलेला एक प्रयत्न. मॉडेल - माझी कन्या -किन्नरि

वैकुंठ

लेखक बाबुराव यांनी रविवार, 18/04/2010 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय तुकाराम, काल तु सपनात आला अन् म्हणला, चल वैकुंठाला. मी हापकुनच गेलो हातापायाला दरदरुन घाम फुटला. च्यामारी तुक्या, तुला काय सवसारात इंट्रेस नव्हता. तु बरा आन तुव्हा इट्टल बरा. माहं तसं नव्ह रं दादा, पोरासोरायचं शिक्षान, म्हातारा-म्हतरी, त्यायच्या हौशी-मौजी, अजुन लय गोष्टी राह्यला आन तु म्हणतो चल वैकुंठाला. आपल्याच्यानं काय होनार नाय. तुव्ह मी काय ऐकणार नाय. टाळ चिपळ्याच्या आवाजात आरामात झोपलो. पर, माह्याच तसबीरीजोळ माहं गणगोत काहून रडून राह्यलं हे मातर कळत नव्हतं ?

चित्रपटातील आपल्या मनात राहिलेला एक प्रसंग.....!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी रविवार, 18/04/2010 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सुट्टीचा आनंद घेणे चालू असल्याने संस्थळावर चित्रपटविषयक धागे भरपूर प्रमाणात दिसत आहेत; त्यात ही एक छोटीशी भर. चित्रपट पाहून झाल्यानंतर बरेच दिवस त्याचे कथानक, कलाकारांचा अभिनय, चित्रीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातील मधुर गाणी आपल्या मनात रुंजी घालत असतात व ज्यावेळी एकमेकाबरोबर संवाद साधत असताना या बाबीशिवाय अचानक असेही आपण म्हणतो कि, "अर्रे त्याप्रसंगत अमिताभ किती हळवा दाखविला आहे रे, इतके दिवस झाले तरी सिलसिला मधील तो प्रसंग मी विसरू शकत नाही." इ. इ.

बावळ्ट्पना

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 18/04/2010 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी वाशिला एक प्रदर्शन बघायला गेले होते...